पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २२३ मग म्हणितलें सर्वेश्वरें । जें आकारीं इये खोंकरें । कोंदले असत न खिरे' । कवणे काळीं ।। १५ ।। ए-हवीं सर्पूरपण तयाचें पहावें । तरि शून्यचि नव्हे स्वभावें । वरि गगनाचेनि पालवें । गाळून घेतलें ॥ १६ ॥ जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेंही न गळे | तें परब्रह्म ||१७|| आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणे । आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥ १८ ॥ ऐशिया आपुलियाची सहज स्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा ॥ १९ ॥ मग गगनीं जेविं निर्मळें । नेणों कैंची एक वेळे । उठती घनपटळें । नानावर्णे ॥ २० ॥ तैसे अमूर्ती तिये विशुद्धे । महदादि भृतभेदें । ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती ॥ २१ ॥ पैं निर्विकल्पाचिये बरैडी । फुढे आदिसंकल्पाची विरूढी । आणि ते सवेंचि मोडोनि ये ढोंढ़ीं । ब्रह्मगोळकांच्या ॥ २२ ॥ तया एकेकाचे भीतरी पाहिजे । तंव बीजाचाचि भरिला देखिजे । माजीं होतियाजातिया नेणिजे । लेख जीवां ॥ २३ ॥ मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास । हें असो ऐसी बहुवस | सृष्टि वाढे ॥ २४ ॥ परि दुजेनविण एकला । परब्रह्मचि संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥ २५ ॥ तैसें समविपमत्व नेणों कैचें । वांयांचि चराचर रचे । पाहातां प्रसवतिया मग सर्वेश्वर म्हणाले, “ जें सच्छिद्र शरीरांत असतांही कधीकाळींसुद्धां झिरपत नाहीं, १५ उलट पक्षीं, ज्याचें बारीकपण इतके आहे, कीं त्याला शून्यही म्हणतां येत नाहीं, तशांत जें आकाशाच्या पदरांतून गाळून काढलेलें आहे, १६ पण असें विरळ व पातळ असतांही जें या प्रपंचाच्या झोळीतून ढवळलें तरीही गळत नाहीं, तें 'परब्रह्म' होय. १७ आणि आकार जरी उत्पन्न झाला, तरी जं जन्माचा विकार जाणत नाहीं आणि आकार लोपला असतांही जें कधींही लुप्त होत नाहीं, १८ अशा प्रकारें जें ब्रह्मतत्त्व आपल्या स्वयंसिद्ध अवस्थेमध्यें निरंतर असतें, त्याला, बा अर्जुना, ' अध्यात्म' हें नांव आहे. १९ मग स्वच्छ आकाशांत कोइन कशीं कोणाला माहीत, पण एकदम नानारंगांचीं जशीं मेघपटले उद्भवतात, २० तशीच त्या निराकार शुद्ध ब्रह्मापासून प्रकृति, अहंकार, इत्यादि भिन्न भिन्न भूतें निपजून ब्रह्मांडाची रचना होण्यास आरंभ होतो. २१ निर्विकल्प ब्रह्माच्याच माळजमिनींत, 'अहं बहु स्याम् या प्रथम संकल्पाचें बीज रुजून मूळ फोडतें, आणि मग ते लवकरच ब्रह्मांडाच्या घडांनी भरगच्च भरून लवून जाते. २२ प्रत्येक ब्रह्मांडाच्या गोळ्यांत नीट पाहिले, तर तो मूळ बीजांनीच म्हणजे ब्रह्मत्वानेंच भरलेला दिसतो, परंतु मध्यंतरी होणाऱ्या व लोपणाऱ्या जीवांची गणतीही करवत नाहीं. २३ मग ते ब्रह्मांडांचे निरनिराळे अंशही भराभर ' अहं बहुः स्याम् ' या आदिसंकल्पाचा जप करतात, आणि मग ही नानाप्रकारची अफाट सृष्टि वृद्धि पावते. २४ परंतु या सर्वांचे ठिकाणी एकमेवाद्वितीय परब्रह्मत्र ओतप्रोत भरून राहिले असतं, आणि हें अनेकत्व, हा भेदभाव, त्याच्यावर केवट पुरासारखा आलेला असतो. २५ तसंच या सृष्टींत समविषम भाव कसे उद्भवले तेंही कळत नाहीं. या स्थावरजंगमात्मक विश्वाची रचना उगाच करमणुकीसाठी झाली, असें म्हणावें तर तींत उत्पन्न १ गळे. २ सूक्ष्मपण, बारीकपणा. ३ पदराने, वस्त्रानें, ४ पातळ, सूक्ष्म ५ रचना. ६ माळ जमिनींत, ७ घडांनीं. ८ भराभर.