पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ६ ॥ तैसें अर्जुनाचिया वोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवें । परियेसें गा बरवें । जें पुसिलें तुवां ॥ ७ ॥ किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा । म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥ ८ ॥ कृष्ण कोपोनि ज्यासि मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारी । मा कृपेनें उपदेश करी । तो कैशापरी न पवेल ॥ ९ ॥ जें कृष्णचि होइजे आपण । तैं कृष्ण होय आपुलें अंतःकरण | मग संकल्पाचें आंगण । वोळगती सिद्धि ॥ १० ॥ परि ऐसें जें प्रेम । अर्जुनींचि आधी निस्सीम । म्हणऊनि तयाचे काम | सदा सफळ ॥। ११ ॥ या कारणें श्री अनंतें । तें मनोगत तयाचें पुसतें । होईल जाणूनि आइतें । वोगेरूनि ठेविलें ॥ १२ ॥ जें अपत्य थानीं निगे । तयाची भूक ते मातेसीचि लागे । एन्हवीं तें शब्दे काय सांगे । मग स्तन्य दे ये ॥ १३ ॥ म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं । परि तें असो आइका काई । जें देव बोलते जाले ॥ १४ ॥ श्रीभगवानुवाच— अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते । भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ॥ ३ ॥ सम० – अक्षर ब्रह्म जें शुद्ध अध्यात्मस्वात्मभाव जो । भूतभौतिकउत्पत्ति करिजे सृष्टिकर्म तें ॥ ३ ॥ आर्या - अक्षर परम ब्रह्म स्वभाव अध्यात्म वदति मुनिवर्ग । पंच महाभूतांचा विकार तें जाण कर्म तनुसर्ग ॥ ३ ॥ ओवी - अक्षर तेंचि ब्रह्म । सद्भाव तोचि अध्यात्म | भूतभावांचे विसर्ग कर्म । तें कर्म जाणिजे ॥ ३ ॥ तरी तें बरळणेंसुद्धां व्यर्थ होत नाहीं. ६ तद्वत्, अर्जुनाच्या तोंडून हे शब्द निघण्याचा अवकाश, तोंच देव म्हणाले, " अर्जुना, तूं जें विचारलेंस, त्याचीच फोड नीट ऐक. " ७ अर्जुन हा एक कामधेनूचाच वत्स होता, आणि त्याच्यावर कल्पवृक्षाच्या मांडवाची प्रसन्न सावली होती, मग त्याच्यापुढें मनोरथसिद्धि आपण होऊन आवडीनें आली, तर त्यांत आश्चर्य ते कसलें ? ८ अहो, श्रीकृष्णांनी ज्याला क्रोधावेशानें मारिलें, तोही परब्रह्मसाक्षात्काराला पात्र होतो, मग त्याच श्रीकृष्णांनी ज्याला अत्यंत आवडीनें ब्रह्मोपदेश केला होता, त्याला ब्रह्मसाक्षात्कार कां लाभणार नाहीं ? ९ जेव्हां आपण कृष्णरूप होतो, तेव्हां कृष्णच आपले अंतःकरण होतो, आणि अशा स्थितीत सिद्धि आपण होऊनच आपल्या संकल्पाच्या घरीं चालून येतात. १० परंतु अशा प्रकारचें अलोट प्रेम केवळ एका अर्जुनांतच होते, म्हणून त्याचे मनोरथ नेहमीं सफळ होत. ११ म्हणून भगवंतांनीं ' हा आतां असा प्रश्न करणार आहे,' असें त्याचें इंगित अगोदरच जाणून, उत्तराचं वाढप अगदीं सज्ज करून ठेविलें होतं ! १२ तान्हुले स्तनाकडे वळलें, कीं, त्याची भूक आईला भासू लागते; खरोखर पाहिलें, तर तें तान्हें बाळ कांहीं " मला आमा दे" म्हणून तिला शब्दांनी सांगतें, आणि मग ती त्याला पाजण्याला घेते, असा कांहीं प्रकार घडत नाहीं. १३ म्हणून कृपासागर गुरूच्या ठिकाणी इतकें भक्तप्रेम आढळलें, तर त्यांत कांहींच नवल नाहीं. असो, आतां देव काय म्हणाले, तें श्रवण करा. १४ १ मांडव. २ गठितात, प्रवेशतात. ३ वाइन ४ स्तनांतील दूध. ५ सच्छिद्र, फुटकें.