पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा २१९ तिया पुनरपि केली दृष्टि | यादवेंद्रा ॥ ९६ ॥ मग विनविलें सुभटें । हां हो जी ये एकवटे । सातही पढ़ें अनुच्छिष्टें । नवलें आहाती ॥ ९७ ॥ न्हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचे उगाणे | काय श्रवणाचेनि आंगवणें । वोलों लाहाती ॥ ९८ ॥ परि तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा | आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥ ९९ ॥ कानाचेनि - गवाक्षारें | बोलाचे रश्मी अभ्यंतरें । पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठेलें ॥ २०० ॥ तेवींचि अर्थाची चाड मज आहे । ते सांगतांही वेळु न साहे । म्हणूनि निरुपण लवलाहें । कीजो देवा ॥ १ ॥ असा मागील पडताळा घेउनी | पुढां अभिप्राय दिठी सूनी । तेवींचि माजी शिरउनी । आर्ती आपुली ॥ २ ॥ कैसी पुसती पाहे पां जाणिव | भिडेचि तरी लंघों नेदी शिंव । एन्हवीं श्रीकृष्णहृदयासि खेंवै । देवों सरला ॥ ३ ॥ अहो श्रीगुरूतें जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें । हें एकचि जाणें आघवें । सव्यसाची ॥ ४ ॥ आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञ श्रीहरीचें बोलणें । हैं संजयो आवडलेपणें । सांगेल कैसें ॥ ५ ॥ तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट महाटी । जैसी कानाचे आधीं दृष्टि । उपेगा जाये ॥ ६ ॥ बुद्धीचिया जिभा । वोलाचा "" पुन्हां आपली दृष्टि यादवेंद्र श्रीकृष्णाकडे वळविली. ९६ मग तो वीरश्रेष्ठ विनविता झाला :- "देवा, हीं एकत्र असलेली सातही पदें ( म्हणजे शब्द ) कोणीही न चाखलेलीं आणि अपूर्व आहेत. ९७ असें नसतें, तर नीट एकाग्र लक्ष दिलें असतां श्रवणाचे द्वारें अनेक मोठमोठ्या सिद्धांतांचेही उलगडे झाल्यावांचून राहातात काय ? ९८ परंतु हैं प्रकरण कांहीं तशांतलें नाहीं. हा एकंदर अक्षरांचा थाट पाहिला, आणि प्रत्यक्ष विस्मयालाही विस्मय वाटला ! ९९ कानाच्या खिडकीवाटे तुमच्या वाणीचे किरण अंतःकरणाला पोंचले नाहींत, तोंच मी चमकलों आणि माझें लक्ष ढळलें ! २०० तेव्हां मला अर्थ जाणण्याची फार आवड आहे, पण ती बोलून दाखवायलाही वेळ नाहीं, म्हणून देवा, लवकर सर्व विवेचन करा. १ अशा रीतीनें मागची चांचणी घेऊन आणि पुढील हेतूवर धोरण रोखून, आणि मध्येच आपल्या आवडीचें घोडें दामटून, २ अर्जुनाची प्रश्न करण्याची हातोटी कशी खुबीची आहे ! आणि असें करतांना शिष्टाचाराची मर्यादाही त्यानें उल्लंघिली नाहीं, नाहींतर, त्यानें दोन्ही बाहू पसरून श्रीकृष्णांना गळामिठीच मारली असती ! ३ अहो, गुरुमहाराजांना प्रश्न करणें असेल, तेव्हां याच पद्धतीचें अवलंबन करावें, ही गोष्ट त्या एकट्या अर्जुनालाच माहीत होती. ४ आतां अर्जुनाचा प्रश्न आणि त्यावर श्रीकृष्णांचे उत्तर, हीं दोन्ही संजय कशी कोडकौतुकानें सांगेल, ५ तिकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावें. हें सर्व सरळ मराठींत सांगण्यांत येईल; यांतील हेतु असा आहे, कीं, कानानें श्रवण घडण्याच्या पूर्वीच दृष्टि उपयोगाला यावी. ६ बुद्धीच्या जिभेनें अक्षराच्या गाभ्यांतील अर्थरस चाखण्याच्या आधींच अक्षरांच्या केवळ १ अपूर्व चमत्कार. १ राहिलें, संपले. ३ गळामिठी,