पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० सार्थ श्रीज्ञानेश्वरी न चाखतां गाभा । अक्षरांचिया भांवा । इंद्रियें जिंती ॥ ७ ॥ पहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें । परि वरचिला बरवा काई डोळे । सुखिये नव्हती ॥ ८ ॥ तैसें देशियेचिया हवांवा । इंद्रियें करिती राणिवा । मग प्रमेयाचिया गांवा । लेसां जाइजे ॥ ९ ॥ ऐसेनि नागरपणें । बोल निमे तें बोलणें । ऐका ज्ञानदेव म्हणे | निवृत्तीचा ॥ २९० ॥ आकृतिसौंदर्यानें इंद्रियें तरतरीत होतात ! ७ असें पहा, मालतीच्या कळ्यांचा सुवास नाकाला संतुष्ट " करतोच, पण त्या कळ्यांच्या बाह्याकृतीच्या सुत्रकतेनें डोळ्यांचेंही पारणं फिटत नाहीं का ? ८ त्याचप्रमाणें मराठीच्या सौंदर्यानें इंद्रियांना सामर्थ्य येतें, आणि मग सिद्धांताच्या ठावठिकाणाला त्यांना नीटपणें जातां येतें. ९ तेव्हां अशा प्रकारच्या भाषासौंदर्यानें मी, जें शब्दाला केवळ अप्राप्य आहे, तेंच स्पष्ट करणार आहें, म्हणून सावधान ऐका, असें श्रीनिवृत्तिनाथांचा दास ज्ञानदेव श्रोत्यांस विनवीत आहे. २१० १ सुंदरपणार्ने, २ तरतरीत होतात. ३ सौंदर्यानें. ४ राज्य, सत्ता, सामर्थ्य.