पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ८५ ॥ जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जियें नानार्थरसें रसाळें । बहकताती परिमळें | भावाचेनि ॥८६॥ सहज कृपा मंदानिळें । कृष्णडुमाचीं वचनफळें । अर्जुन श्रवणाचिये खोळे | अवचित पडिलीं ॥ ८७ ॥ तियें प्रमेयाचीं हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाच्या सागरीं चुवुकळिलीं । मग तैसींच कां घोळिलीं । परमानंदं ॥ ८८ ॥ तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुनाचे अनिमिष डोळे । घेतात गळाळे | विस्मयामृताचे ॥ ८९ ॥ तिया सुखसंपत्ति जोडलिया । मग 'स्वर्गा वांती वांकुलिया । हृदयाच्या जीवीं गुतकुलिया । होत आहाती ॥ १९०॥ ऐसें वैरचिलीचि बरवा । सुख जावों लागलें फावा । तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥ ९१ ॥ झडकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें । प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहे ॥ ९२ ॥ तंव विचाराचिया रसना न दाटती । वरी हेतूच्या दशनीं न फुटती । ऐसें जाणोनि सुभद्रापति । चुंवीचिना ॥ ९३ ॥ मग चमत्कारला म्हणे । इयें जळींचीं मा तारागणें । कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥ ९४ ॥ इयें पढें नव्हती फुडिया | गगनाचिया घडिया | येथ आमुची मति बुडालिया । थाव न निघे ॥ ९५ ॥ वांचूनि जाणावयाची के गोठी । ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी | कांहीं पुढें सरून तो रस घेत नव्हती, कारण या वेळीं अर्जुनाची स्वारी क्षणमात्र मागच्याच श्लोकावर रेंगाळत होती. ८५ विपुल अर्थरसानें दाटलेलीं व सद्भावनेचा सुगंध दरवळणारीं, अशीं तीं परब्रह्माचें प्रतिपादन करणारीं वचनफळें जेव्हां कृपाप्रसादाच्या मंद झुळकीनें श्रीकृष्णरूपी वृक्षावरून एकाएकी अर्जुनाच्या कानांच्या झोळीत पडलीं, ८६, ८७ तेव्हां तीं जणूं काय महासिद्धांताचींच बनवलीं होतीं, किंवा ब्रह्मरसाच्या सागरांत बुचकळलीं होतीं, आणि मग परमानंदांत घोळून काढलीं होतीं, अशीं वाटली ! ८८ त्यांच्या मोहकपणानें अर्जुनाचे अनिमिष नेत्र विस्मयामृताचे घटाघट घोट घेऊं लागले ! ८९ मग त्या अलौकिक सुखाचा आस्वाद घेऊन अर्जुन स्वर्गालाही टुक्कू दुक्कू करूं लागला, आणि त्याच्या अंतरात्म्याला आनंदाच्या गुदगुल्या होऊं लागल्या. मग अशा केवळ बाह्य दर्शनाच्या सौंदर्यानेंच अर्जुनाचें सुख उतास जाऊं लागलें, तेव्हां त्याला त्या वचनफळाचा रस चाखण्याची उत्कट उत्कंठा झाली. ९१ तर्कबुद्धीच्या हातांत तीं वचनफळें त्वरेनें घेऊन, तो तीं अनुभवाच्या तोंडांत एकदमच चिणूं लागला. ९२ परंतु ती विचाराच्या जिभेला रुचतना, आणि हेतूच्या दांतांना फुटतना ! तेव्हां त्या सुभद्रानाथानें त्यांना चुफण्याचा नादच सोडला ! ९३ मग अर्जुन चमकून मनांत म्हणूं लागला, अरे हीं काय पाण्यांतलींच नक्षत्रे आहेत ? अक्षरांच्या बाहेरच्या थाटमाटानें मी काय हा फसून गेलों ! ९४ हीं कसली अक्षरं ? ह्या तर नुसत्या आकाशाच्या घड्या आहेत ! येथे आमच्या मतीनं कितीही उंच उड्डाण केले, तरी तिला काय थांग लागणार आहे ? ९५ पण असा थांग लागल्यावांचून या वचनाचा अर्थ समजण्याची गोष्ट बोलावयास नको !” अशा प्रकारची विवंचना मनांत करून अर्जुनानें . १९० १ दरवळतात. २ दाखवितात. ३ वरवरची, बाह्यांगाची.