पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवी २१७ परब्रह्मे फळे । जया पिकलेया रस गळे | पूर्णतेचा ॥७६॥ ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे । कर्माचें काम सरे । विरमे मन ।। ७७ ।। ऐसा अध्यात्मलाभु तया । होय गा धनंजया | भांडवल जया । उद्येमीं मी ॥ ७८ ॥ तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळंवाडी । तेथ भेदाचिया दुबळवांडी | नेणिजे तया ॥ ७९ ॥ साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३० ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥ -अधिभूता अधियज्ञा सह जो अधिदैव मी । त्या मातें जाणती प्राणप्रयाण तेचि जाणती ॥ ३० ॥ आर्या - मी साधिदैव पार्था साधिमखहि साधिभूत मीच असें । जाणति जे मज अंर्ती जाणति मज नित्ययुक्त तेचि असे ३० ओंवी - अधिभूत अधिदैवत माझे ठायीं । जाणती यज्ञवेत्ते यज्ञासही । मरणकाळीं मज जाणितलें पाहीं । ते योगयुक्त झाले३ • सम०- जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें । धरूनि अधिदैवतें । शिवतलें गा ॥ १८० ॥ जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियन्नुही दृष्टी रिंगें । ते तनूचेनि वियोगें । विहये नव्हती ॥ ८१ ॥ एन्हवी आयुष्याचे सूत्र बिघडतां । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतेयाचिया चित्ता । युगांत नोहे ॥८२॥ परी नेणों कैसें पैं गा । जे जडोनि गेले माझिया अंगा । ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥ ८३ ॥ एन्हवीं तरी जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंतःकरण - । युक्त योगी ॥ ८४ ॥ तवं इये शब्दकुपिकेतळीं । नोडवेची अवधानाची अंजुळी । जे नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता आणि मग ज्यांच्यांतून पूर्णतेचा रस थत्रथव पाघळत आहे, असें परब्रह्मरूपी सबंध पक्व फळ त्यांच्या हाती पडतें. ७६ त्या वेळीं सर्व जग कृतकृत्यतेच्या धन्यतेनें दाटून जातें, आत्मज्ञानाचें कौतुक पूर्णतेला पावतें, कर्माची आवश्यकता संपते, आणि मन सुखशांत होऊन जातें. ७७ अर्जुना, ज्यांनी मला आपल्या व्यवहारांतले भांडवल केलें, त्यांना असा आत्मबोधाचा लाभ घडतो. ७८ त्यांच्या वृत्तींतील समावस्थेच्या वाढीबरोबर ब्रह्मैक्याच्या शेतवाडीचाही व्याप पसरत जातो, आणि मग भेदभावाचें भिकारपण कोठेंच उरत नाहीं. ७९ ज्यांनी ही मायामय जड सृष्टि माझेंच स्वरूप आहे अशा अनुभवाच्या हाताने मला साधिभूताला ' धरून, सर्व देवतांचें जें अधिमान आहे अशा माझ्या ' अधिदैव' स्वरूपाला जे जे येऊन पोंचले, १८० आणि मग ज्यांना पूर्ण ज्ञानाच्या बळानें माझें अधियज्ञ म्हणजे परब्रह्मस्वरूप दिसूं लागलें आहे, ते या देहाचा पात झाला असतां दुःखी होत नाहींत. ८१ नाहींतर, आयुष्याची दोरी तुटली असतां, प्राणिमात्राची नुसती खळबळ उडून जाते, ती इतकी, कीं, जबळ असणान्या जित्या जिवालाही आज कल्पांतच ओढवला, असें वाटू लागतें. ८२ परंतु तें कसें काय असेल तें असो, पण जे माझ्या स्वरूपाला बिलगले, ते त्या अंतकाळींच्या तगमगींतही मला विसरत नाहींत. ८३ सामान्यतः असें समजावें, कीं जे इतक्या पूर्णतेला गेले, तेच खरे युक्तचित्त, तेच खरे योगी. " ८४ श्रीकृष्ण याप्रमाणे शब्दरूपी शिशींतून वाणिरस ओतीत होते, परंतु अर्जुनाची अवधानरूपी ओंजळ १ ब्यापारति, व्यवहारति २ शेतवाडी. ३ भिकारपण. १८