पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी वाढविला । अहंकारें ॥ ६७ ॥ जो धृतीसि सदां प्रतिकृछु । नियमाही नागवे सळु | आशारसें दोंदिल | जाला सांता ॥ ६८ ॥ असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनी धनुर्धरा । विपयाचे वोवेरां । विकृतीसीं ॥ ६९ ॥ तेणें भावशुद्धचिया वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे | मग चिरिले अव्हांटे | अप्रवृत्तीचे ॥ १७० ॥ तेणें भूतें भांबावलीं । म्हणोनि संसाराचिया आर्डवामाजीं पडिलीं । मग महादुःखाच्या घेतलीं । दांडेवैरी ॥ ७१ ॥ येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् । ते इन्द्रमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ २८ ॥ सम० - ज्यांच्या अंतरिंचीं गेलीं पापें पुण्यक्रियाबळें । मातें भजति ते इंद्र-मोहत्यागे दृढव्रत ॥ २८ ॥ आर्या-ज्यांचं पाप निमाले लोकीं जे फार पुण्यवंत जन । ते द्वंद्वमोहविरहित करिती माझे दृढव्रती भजन ॥ २८ ॥ ओंत्री – ज्यांचे पाप गेलें । ते द्वंद्व मोहनिर्मुक्त झाले । माझे भजनीं निघाले । दृढबुद्धी करूनियां ॥ २८ ॥ ऐसे विकल्पाचे वा । कांटे देखोनि सणणे । जे मतिभ्रमाचें पासावणें । घेतीचिना ॥७२॥ उजू एकनिष्ठेच्या पाउली । रगडूनि विकल्पाचिया भाली। महापातकांची सांडिली । अटवी जिहीं ॥ ७३ ॥ मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले। वॉटवधेयां ॥७४॥ जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये । ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ ३९ ॥ सम० - नाशावया जरा मृत्यु यत्न ज्यांचे मदाश्रयें । ते ब्रह्म जाणती कीं ते सर्व अध्यात्म कर्मही ॥ २९ ॥ आर्या-वाराया जन्मजरा योगी करिती प्रयत्न जे सकळे । माझा आश्रय करुनी अध्यात्म ब्रह्मकर्म त्यांस कळे ॥२९॥ अवी- जरामरणनाशार्थी । आश्रयें मम यत्न करिती । ते ब्रह्म जाणती । कर्म अध्यात्म अवघें ॥ २९ ॥ ए-हवीं तरी पार्थी । जन्ममरणाची निमें कथा । ऐसिया प्रयत्नांतें आस्था | विये जयाची ॥ ७५ ॥ तया तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्र या लेकराला 'अहंकार' आजोबांनी वाढविला. ६७ हा पोर मनोधैर्याचा शत्रु झाला. इंद्रियनिग्रहाच्या लगामी राहीना इतका दांडगा बनला. मग तो ' आशेच्या' दुधानें गलेलठ होऊन, ६८ आणि असंतोषाच्या मद्यानें तर्र बनून, विषयाच्या खोलींत विकृतीच्या संगती राहू लागला. ६९ मग त्यानें शुद्ध भावनेच्या वाटेंत संकल्पविकल्पांच्या कांट्यांचा पेर घातला, आणि अनुचित कर्माच्या आडवाटा वाहत्या केल्या. १७० 'इंद्रमोहाच्या' या करणीनें सर्व जीव गोंधळून गुरफटून गेले, म्हणून तर ते संसाराच्या अरण्यांत येऊन पडले आहेत, आणि महादुःखाच्या ओझ्याखाली दडपून गेले आहेत.७१ अशा खोट्या संकल्पविकल्पांच्या तीक्ष्ण कांट्यांना पाहून, जे 'द्वंद्वमोहाच्या वाऱ्यासही उभे राहात नाहींत, ७२ जे सरळ एकनिची पावले टाकीत संकल्पविकल्पांच्या कांट्यांना पायातळीं रगडीत, महापातकांच्या रानांतून पार होतात, ७३ आणि मग जे पुण्याच्या बळानें धांव ठोकतात आणि माझ्या समीप येऊन ठेपतात, त्यांची गोष्ट काय सांगावी ? ते कामक्रोधादि वाटमाऱ्यांच्या हातून निर्बंध सुटून जातात. ७४ मग, अर्जुना ही जन्ममरणाची गोष्ट आपोआपच संपते. ज्यांच्या निप्रेला आतां सांगितलेल्या प्रयत्नाचे फळ येते, ७५ त्यांना त्यांचा तो प्रयत्न केव्हांतरी एक वेळ सिद्धि देतो, आणि १ खोलींत, २ पाडले, वाहते केले. ३ रानांत. ४ काठीनें. ५ खोटे. ६ तीक्ष्ण. ७ वाटमान्यांना. ८ संपे.