पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा २१५ असे । पाहें पां कवण जळ रसें । रहित आहे ॥ ५९ ॥ पवन कवणातें न शिवेचि । आकाश के न समायेचि । हें असो एक मीचि । विश्व आहें ॥ १६०॥ वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन । भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ १६ ॥ सम० – जीं गेलीं त्यांस मी जाणे होती त्यांसहि अर्जुना । भूतें होणारही जाणे मातें कोणीच नेणती ॥ २६ ॥ आर्या- भूतें आणि भविष्य जाणें मी वर्तमानही भूतें । परि त्यांमार्जी कोणी जाणे मातें कदापि न विभूतें ॥ २६ ॥ ओवी - पूर्वी जीं झालीं भूतें । आतां वर्तमान जीं वर्ततें । भविष्यही मज कळतें । मला कोणी नोळखे कीं ॥ २६ ॥ येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं । आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥ ६१ ॥ कां भविष्यप्रमाणें जियें ह्रीं । तींही मजवेगळीं नाहीं । हा बोलचि एन्हवीं कांहीं । होय ना जाय ॥६२॥ दोरा चिया सापासी । डोंबो वडियो ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिध्यात्वें ।। ६३ ।। ऐसा मी पांडुसुता । अनुस्यूत सदा असतां । या संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥ ६४ ॥ इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत । सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥ २७ ॥ सम० - प्रियेच्छा अप्रियद्वेषे द्वंद्वमोहॅकरूनियां । सर्व भूतें सृष्टिकाळीं मोह पूर्वील पावती ॥। २७ ॥ आर्या - इच्छाद्वेषभवाच्या पडोनियां द्वंद्वमोहजाळातें । सर्वहि भूतें पार्था पावति मोहास सृष्टिकाळातें ॥ २७ ॥ ओवी – इच्छाद्वेषापासून । द्वंद्वमोह उपजला तेथून । ते भूतसृष्टीचे आदि जाण । मोहातें पावती अर्जुना ॥ २७ ॥ तरि तेचि आतां थोडीसी । गोठी सांगिजेल परियेसीं । जैं अहंकारा तनूंसीं । वार्लभ पडिलें ॥ ६५ ॥ तेथ इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेपेंसीं मांडिली । वरोडिक ॥ ६६ ॥ तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोह जाला । मग तो आजेयानें जळांत रस नाहीं ? ५९ कीं वारा कोणाला स्पर्श करीत नाहीं ? किंवा आकाश कोणत्या स्थळीं असूं शकत नाहीं ? पण हें पुरे. सर्व विश्वांत मीच एकटा भरलेला आहें. १६० अर्जुना, आजपर्यंत जे भूतमात्र होऊन गेले, ते मद्रूपच होऊन राहिले आहेत आणि चालू घटकेस जे भूतमात्र आहेत, ते सर्व मीच आहेत. ६१ आणि भविष्यकाळीं जीं भूतें उत्पन्न व्हावयाची आहेत, तींही माझ्यापासून भिन्न नाहींत. हीही केवळ मायेची भाषाच आहे. नाहीं तर कांहींही खरोखर होत नाहीं आणि जात नाहीं. ६२ दोरावर भ्रमानें भासणारा साप जसा काळा आहे, कीं कबरा आहे, की लालसर आहे, हें कोणासही ठरवितां यावयाचें नाहीं, तसेंच भूतमात्राविषयीं आहे, कारण तें सर्व मूळांतच मिथ्या आहे. ६३ अशा प्रकारें, बा अर्जुना, मी सर्व भूतमात्रांत अखंड व ओतप्रोत भरलेला असतां, हे जीव ज्या संसारांत गुरफटले आहेत, त्या संसाराचें भाष्य निराळेंच आहे. आतां या संसाराची कथा थोडक्यांत सांगतों, ती ऐक. जेव्हां 'अहंकार' व 'काया ' यांचें प्रेम जडलें, ६५ तेव्हां 'इच्छा' ही मुलगी जन्माला आली. नंतर ही मुलगी तारुण्याच्या भरांत भाली, तेव्हां तिनें 'द्वेषा' बरोबर शरीरसंबंध केला. ६६ मग या 'इच्छाद्वेष' जोडप्यापासून 'द्वंद्वमोह' (म्हणजे सुखदुःख, हर्षशोक, लाभालाभ, इत्यादिकांपासून होणारा अज्ञानभाव ) जन्मला. १ काळा, २ कवड्या, कबरा. ३ लालसर ४ प्रेम, ५ विवाह संबंध.