पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४ ॥ सम० – व्यक्त मी मज ते ऐसें अव्यक्ता मूढ मानिती । नेणतां परवस्तु जे मी अत्युत्तम अध्यय ॥ २४ ॥ आर्या-अव्यक्ता मज आतां व्यक्तिस ऐसेंचि मानुनी भ्रमती । उत्तम माझा अव्यय नेणुनियां परम भाव ते कुमती ॥ २४ ॥ ओंवी—मार्ते कोणी नेणती । अव्यक्त व्यक्तीं आलें म्हणती । माझा उत्कृष्टभाव नेणती । मूढपणे ॥ २४ ॥ परी तैसें न करिती प्राणिये । वांयां आपल्या हिती वाणिये । जे पोंहताति पाणियें । तळहातिंचेनि ॥ ५१ ॥ नाना अमृताच्या सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे । आणि मनीं तरी आठविजे । थिलरोदकातें ॥ ५२ ॥ हें ऐसें कासया करावें । जे अमृतींही रिगोनि मरावें । तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ॥ ५३|| तैसा फळ हेतूचा पांजरा। सांडूनियां धनुर्धरा । कां प्रतीतिपाखीं चिदंबरा | गोसाविया नोहावें ॥ ५४ ॥ जेथ उंचावलेनि पैवाडें । सुखाचा पैसारु जोडे । आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥ ५५ ॥ तया उमपा माप कां सुवावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें । सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ॥ ५६ ॥ परि हा बोल आघवा । जरी विचारिजतसे पांडवा | तरी विशेषें या जीवां । न चोजवे गा ॥ ५७ ॥ नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः । मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५ ॥ सम०—–झांकलों योगमायेने सर्वां प्रकट मी नसें । मातें नेणे मूढलोक जो अनादि अनंत मी ॥ २५ ॥ आर्या - मी न दिसें सर्वांला मायेनें आसतों सदा गूढ । मज अव्यया मला ते म्हणवुनि पार्था न जाणती मूढ ॥ २५ ॥ ओवी - मी सर्वांस प्रगट नाहीं । योगमायेनें वेष्टिलों पाहीं । अज अव्यय असोनही । मूढ नेणती ॥ २५ ॥ कां जे योगमायापडळें । हे जाले आहाती आंधळे । म्हणोनि प्रकाशाचेनि दिर्हवळें । न देखती मातें ॥ ५८ ॥ न्हवीं मी नसें ऐसें । काय वस्तुजात कारण, परंतु सामान्य प्राणी असें करीत नाहींत, आणि वृथा आपल्या हिताचा तोटा करून घेतात, ते तळहातांत पाणी घेऊन पोहण्याचा प्रयत्न करितात, ( वास्तविक पोहणारानें तळहातानें पाणी लोटून दिले पाहिजे, तरच तो पोहेल. ) ५२ अमृताच्या समुद्रांत बुडी मारावी, आणि मग तोंड मात्र कां मिटून धरावें आणि मनांत डबक्यांतील पाण्याची आठवण करून कशाला झुरावें ? ५२ अमृतामध्यें शिरून मरण बळेंच ओढवून कां बरें घ्यावें ! त्याच्यापेक्षां अमृत होऊन अमृतांतच कां राहू नये ? ५३ त्याप्रमाणेच, वा अर्जुना, हा फळहेतूचा पिंजरा सोडून अनुभवाच्या पंखांनी ज्ञानाकाशांत भरारून आपण त्याचे स्वामी होऊन कां राहूं नये ? ५४ "त्या उंच ठिकाणी उड्डाण केल्याच्या पराक्रमानें सुखाचा असा मोकळा विस्तार आपल्याला लाभतो कीं मग आपल्या आनंदाच्या भरांत वाटेल तशी भरारी मारावी ! ५५ त्या उमाप आत्मसुखाला माप घालण्याचा प्रयत्न कां करावा ? अव्यक्त, निराकार, अशा मला व्यक्त, साकार, कां मानावें ? माझें स्वरूप प्राण्यांच्या ठायीं स्वतः सिद्ध असतांही त्याच्यासाठीं नसतीं साधनें करण्याच्या भरीं भरून कां मरावें ? ५६ पण, अर्जुना, असे प्रश्न जर विचारले, तर या जीवाला ते फारसे आवडत नाहींत. ५७ हे जीव प्रकृतिमायेच्या झांपडीनें आंधळे झाले आहेत, म्हणून प्रकाशाच्या उजेडानें ते मला पाहू शकत नाहींत. ५८ नाहींतर, मी ज्यांत नाहीं, अशी एकतरी वस्तू आहे का ? अरे, कोणत्या १ तोटा करणारे. २ पिंजरा, सांपळा. ३ पराक्रमाने. ४ विस्तार ५ ज्याला मापतां येत नाहीं अशा त्याला माप कां घालावें ? ६ मरावें. ७ आवडे. ८ दिवसबळानें, उजेडानें.