पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा २१३ पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी । तयाची ते चाड पुरी | पुरविता मी ॥ ४३ ॥ देवदेवी मीचि पाहीं । हाही निश्चय त्यासि नाहीं । भाव ते ते ठायीं । वेगळाला घरी ॥ ४४ ॥ स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते । लभते च ततः कामान्मयैव विहितान् हि तान् ॥ २२ ॥ सम० - त्या श्रद्धेनें त्यांस पूजी त्यांत जो अन्यसेवक । त्यांपासूनहि जे पावे काम ते म्यांच निर्मिले ॥ २२ ॥ आर्या-त्या श्रद्धेच करुनि तो त्यां इतरां देवतांसचि भजोन । म्यांच दिले फळ घे त्या देवांपासोनियांहि समजोन ॥ २२ ॥ ओवी - श्रद्धेकरूनि अन्य देवतीं । त्यांची आराधना करिती । जे इष्टकामना पावती । तयां अचळ श्रद्धा मीच असें ॥ २२ ॥ मग तिया श्रद्धायुक्त | तेथींचें आराधन जें उचित | तें सिद्धीवरी समस्त । वर्तों लागे ॥ ४५ ॥ ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे । परी तेंही सकळ निपजे | मजचिस्तव ॥ ४६ ॥ अन्तवतु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् । देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ २३ ॥ सम० - अंतवंत फळें त्यांचीं अल्पबुद्धीस होति जीं । मेल्या ते पावती त्यांतें मद्भक्तहि मजप्रति ॥ २३ ॥ आर्या-परि त्या अल्पमतीचें पार्था फळ नाशवंत तूं समज । देवार्चक देवातें पावति मद्भक्त पावताति मज ॥ २३ ॥ ओवी - हीनबुद्धि मागती । ते नाशवंत फळ पावती । जयांचे भजन तयां तेचि गती। मज भजती ते मज पावती ॥२३॥ परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेवाहेरी न निघती । म्हणोनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥ ४७ ॥ किंबहुना ऐसें भजन तें संसाराचेंचि साधन | येर फलभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥ ४८ ॥ हैं असो परौतें । मग हो कां आवडतें । परि यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥ ४९ ॥ येर तनुमनप्राणीं । जे अनुसरले माझेचि वाणीं । ते देहाच्या निर्वाणीं । मीचि होती ॥ १५० ॥ आतां, जो जो असा भक्त ज्या ज्या देवतेच्या भजनाची आवड धरतो, त्याची त्याची ती आवड मीच पूर्ण करतों. ४३ सर्व देवदेवतांमध्यें मीच आहें, हाही निश्चय त्याच्या बुद्धीला झालेला नसतो, म्हणून निरनिराळ्या देवदेवता खरोखरच निरनिराळ्या आहेत, असा भेदभाव त्याच्या अंतर्यामी असतो. ४४ असो, अशा श्रद्धेनें सज्ज होऊन तो इष्ट देवतेचें यथाविधि आराधन करतो आणि कार्यसिद्धि होईपर्यंत तें तो अखंड चालवतो. ४५ अशा भक्तानें जें फळ मनांत धरलें, तेंच फळ त्याला मिळतें, परंतु तें फळही माझ्यापासून उत्पन्न झालेले असते. ४६ परंतु, हे जे भक्त आपल्या कोत्या संकल्पाच्या व विचाराच्या बाहेर कधीच पडत नाहींत, त्यांना माझें ज्ञान मुळींच नसते, म्हणून त्यांना जें फळ मिळतें, त्याचा केव्हां तरी अंत व्हावयाचा असतो; तं शाश्वत नसतें. ४७ इतकेच नव्हे, तर असल्या भक्तीनें केवळ संसारावेंच साधन घडतें, कारण आत्मानुभवावांचूनचे हे सर्व फळभांग क्षणभर भासणाऱ्या स्वप्नासारखेच होत. ४८ पण हा विचार बाजूला ठेवला, तरी तो ज्या देवतेचं आवडीनें भजन करतो, त्याच देवतेच्या स्वरूपाला तो पावतो. ४९ पण जे दुसरे तनमनजीवाने माझ्या मार्गाला लागले, ते देहपात होतांच मद्रूप होतात. १५० १ मार्गाला.