पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी वोतला भावो । म्हणोनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥ ३६॥ जयाचिये प्रतीतीचा वाखारां । पवीडु होय चरचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥ ३७ ॥ येर बहुत जोडती किरीटी । जयांची भजनें भोगासाठीं । जे आशातिमिरें दिठीं । विपयांध जाले ॥ ३८ ॥ कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः । तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २० ॥ सम- ज्या ज्या काम ज्ञान नेलें त्या त्या काम सुरांतरां । त्या त्या नेमेंचि भजती वश्य स्वप्रकृतीस जे ॥ २० ॥ आर्या-त्या त्या कामें हरले ज्ञान म्हणुनि अन्य देवता यजिती । त्या त्या नियमा धरुनी प्रकृतिस वश होउनी न त्या त्यजिती ॥ २० ॥ ओंवी - अभिलाषे ज्ञान गेलें । अन्यदेवता भजों लागले । स्वप्रकृतिवश झाले । त्या त्या नेमेंकरूनियां ॥ २० ॥ आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा । कीं तयाचिये घणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥ ३९ ॥ ऐसे उभयतां आंधारीं पडले | म्हणोनि पासींचि मातें चुकले । मग सर्वभावें अनुसरले | देवतांतरां ॥१४०॥ आधींच प्रकृतीचे पाइक । वरी भोगालागीं तंव रंक | मग तेणें लोलुपत्वें कौतुक | कैसेनि भजती ॥ ४१ ॥ कवणी तिया नियमबुद्धि | कैसिया हन उपचारसमृद्धि । कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥ ४२ ॥ यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयाचितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥११॥ सम० - जो जो जी जी तनू भक्त श्रद्धेनें म्हणतो भजरें । त्या त्यास अचळ श्रद्धा त्या त्या रूपींच देतसें ॥ २१ ॥ आर्या - जो जो ज्या ज्या देवा इच्छी पूजावयासि भक्तीनें । तेथें त्याला देतों अचळश्रद्धेस कपटयुक्तीनें ॥ २१ ॥ ओवी - जे ज्या देवार्ते भजती । श्रद्धेनें सिद्धी इच्छिती । तयांची मनकामनातृप्ती । त्या देवतेनें मी करीं ॥ २१ ॥ अनुभवरसानें त्याचें अंतरंग आपोआप दाहून गेल्यामुळें तोच श्रेष्ठ भक्त व खरा ज्ञानीही ठरतो. ३६ त्याच्या आत्मानुभवाची वखार एवढी विस्तृत असते, कीं, तींत स्थावरजंगमात्मक सर्व सृष्टजात समावूं शकतें. बा अर्जुना, असा महात्मा फारच दुर्लभ असतो. ३७ जे कामिक भावनेने माझी भक्ति करतात आणि जे आशेच्या अंधारांत आंधळे झालेले असतात, असे इतर भक्त वाटेल तेवढे मिळतात. ३८ फळाच्या हांवरेपणानें त्यांच्या अंतःकरणांत कामाचा ( म्हणजे विषयवासनेचा ) प्रवेश झाला, कीं, ज्ञानाचा दिवा कामाच्या झपाट्यानें मालवला जातो. ३९ अशा प्रकारें आंतबाहेर ते गर्द अंधारांत बुडाले म्हणजे जवळ खेटून असणाऱ्या मला ते चुकतात, आणि मग सर्व जीवेंभावें इतर देवतांच्या भजनीं लागतात. १४० असे पुरुष आधींच मायेचे दास झालेले असतात, तशांत त्यांना विषयभोगाचा होकटा लागून ते गयांवयां झालेले असतात, तशा लंपटपणाने ते इतर देवतांची भक्ति केवढ्या कोडकौतुकानें करतात ! ४१ ते आपल्याच बुद्धीनं कितीतरी नियमनिर्बंध घालतात, पूजाद्रव्यांची काय जमवाजमव करतात, आणि शास्त्रोक्त विधीनं किती काळजीपूर्वक त्या देवतांना द्रव्यार्पण करतात ! ४२ १ वाव, जागा. २ घर्षणानें, झटक्याने,