पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा २११ बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते । वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९ ॥ सम० - बहू जन्माचिया अंतीं ज्ञानी मार्ते भजे असा । कीं वासुदेव हें सर्व तो थोर अति दुर्लभ ॥ १९ ॥ आर्या - बहु जन्मांचे अंर्ती पावे तो ज्ञानवंत भवशमना । जग वासुदेवरूपी पावे तो दुर्लभ प्रशस्तमना ॥ १९ ॥ ओवी — बहुत जम्म कष्टोनी । ज्ञान पावे कृपेंकरूनी । वासुदेव सर्व जाणोनी । तो मज ऐसा दुर्लभ ॥ १९॥ जे तो विपयांची दाट झाडी । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं । चुकावृनि आला पाडीं । सहासनेचिया ॥ २७ ॥ मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा । अप्रवृत्तीचा अव्हांटा | डावलैनि ।। २८ ।। आणि जन्मशतांचा वाहर्तेपणा । तेवींचि आशेचिया न लेचि वाहणा । तेथ फलहेतूचा उगाणा | कवणु चाळी ।। २९ ।। ऐसा शरीरसंयोगाचिये राती | माजीं धांवतां सडिया आयती । तंव कर्मक्षयाची पाहाती । पाहांट जाली ॥ १३० ॥ तैसीच गुरुकृपा उखी उजळली | ज्ञानाची वोतपली पडली । तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये ॥ ३१ ॥ ते वेळीं जयाकडे वीस पाहे । तेउता मीचि तया एकु आहें । अथवा निवांत जरी राहे । तही मीचि तया ॥ ३२ ॥ हें असो आणिक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं । जैसें सवाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ॥ ३३ ॥ तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतुवारी । हें सांगिजेल बोलवरी । तैसें नव्हे ॥ ३४ ॥ म्हणोनि असो हैं इयापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणें संसेंरलेनि करी । आपु विश्व ॥ ३५ ॥ हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा .२ विषयांच्या गर्द रानांतील कामक्रोधरूपी विकारांची संकटें चुकवून, तो निर्मळ वासनेच्या पहाडावर येते।. २७ मग, वा वीरश्रेठा अर्जुना, तो सत्संगतीला लाभून, कर्मसंन्यासाच्या आड वाटेला डावें घालून, सरळ सत्कर्मयोगाच्या राजमार्गाला लागतो. २८ मग हा शेंकडों जन्मपर्यंत त्याच वाटेने प्रवास करतो. या प्रवासांत तो आशेचें पायतणसुद्धां पायांत घालीत नाहीं, मग तेथें फलहेतूचा हिशेब कसला आला आहे ? २९ अशा रीतीनें जन्मोजन्मीं शरीरधारण करण्याच्या मायेच्या रात्रिकाळांत तो एकटा वासनासंग सोडून कर्मयोगाच्या वाटेनें वेगानें चालला आहे, तों कर्मक्षय होतांच ज्ञानाची पहांट होते. १३० त्याच वेळीं गुरुकृपेचा उषःकाल होतो, ज्ञानाच्या किरणाची तिरीप पडते, आणि मग त्याच्या दृष्टीला भेदभावरहित एकत्वाची संपत्ति प्रकट होते. ३१ अशा अवस्थेत तो ज्या ज्या दिशेला बघतो, तिकडे तिकडे मीच त्याला दिसतों, आणि, तो कांहीं न बघतां निश्रेष्ट व शांत राहिला, तरीही मीच एक त्याला अंतर्यामीं भासमान असतो. ३२ हें वर्णन पुरे. माझ्यावांचून त्याला कोठंही कांहींही असत नाहीं. जसें पाण्यांत बुडलेल्या भांड्याला आत बाहेर पाणीच असतें. ३३ तसा तो माझ्यामध्यें निमग्न झाल्यामुळें त्याला आतबाहेर मीच असतों, पण ही अवस्था शब्दांनीं वर्णन करण्यासारखी नाहीं. ३४ म्हणून आतां इतकेंच सांगतों, कीं, अशा रीतीनें ज्ञानसंपत्तीची वखार त्याला उघडी झाली म्हणजे तो तें ज्ञानद्रव्य व्यवहारांत चालवून, तो सर्व विश्व आपलेसे करतो. ३५ हे सर्व सृष्टजात श्रीवासुदेवच आहे, या १ पहाडावर. २ आड मार्गाला ३ डाव्या घालून, चुकवून. ४ वाटसरू, प्रवासी. ५ हिशोब, गणना ६ एकटा, वासना- संगहीन. ७ वाद. ८ उपःकाल, ९ तिरीप १० वाट दिशा. ११ वखार, कोटी. १२ त्या ज्ञानाने व्यवहार करून,