पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० सार्थ श्रीज्ञानेश्वरी उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् | आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८॥ सम० - तेही थोर परि ज्ञानी मी मदात्माचि मानितों । मातें स्वसद्गतीर्तेची भजतो युक्तचित्त जो ॥ १८ ॥ आर्या-सर्वहि उदार पार्था ज्ञानी आत्माचि माझिये मतिला मान्य असे युक्तारमा पावे अश्रित मलाच सद्गतिला ॥ १८ ॥ ओवी - सर्व हे उदार असती । त्यांमाजी ज्ञानी ते माझा आत्मा होती । म्हणूनि आश्र े असती । माझिया ते सुर्खे ।। १८ ।। म्हणोनि आपुलाल्या हिताचेनि लोभें । मज आवडे तोही भक्त झोंबे । परी मीचि करी वालमें | ऐसा ज्ञानिया एक ॥। १९ ॥ पाहें पां दुभतेयाचिया आशा । जगचि धेनूसि करितसे फांसा । परि दोरेंवीण कैसा । वत्साचा वैळी ।। १२० ।। कां जे तनुमनप्रमाणें । तें आणिक कांहींचि नेणे । देखतयांतें म्हणे | हे माय माझी || २१ ॥ तें येणें मानें अनन्यगति । म्हणूनि नूही तैसी प्रीती । यालागीं लक्ष्मीपती । बोलिले साचें ॥ २२ ॥ हें असो मग म्हणितलें । जे कां तुज सांगितले । तेही भक्त भले | पॅडियंते आम्हां || २३ || परि जाणोनियां मातें । जे पाहों विसरले मागौतें । जैसें सागरा येऊनि सरितें । मुरडावें ठेलें ॥ २४ ॥ तैसी अंतःकरणकुहरीं जन्मली । जयाची प्रतीतिगंगा मज मीनली । तो मी हे काय वोली | फार करूं || २५ || एन्हवीं ज्ञानिया जो म्हणिजे | तो चैतन्यचि केवळ माझें । हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणें बोलों ॥ २६ ॥ म्हणून केवळ आपला कार्यभाग साधण्याच्या लोभानें, वाटेल तो पुरुष भक्त म्हणून मला चिकटू लागतो; परंतु मीच ज्याच्या आवडीचा विषय झालों आहे, असा एक ' ज्ञानी ' भक्तच होय. " १९ ( श्रीकृष्ण म्हणाले तें कांहीं खोटें नाहीं, कारण, ) असें पहा, कीं, दुभतें लाभावें म्हणून सर्व ठिकाणी लोक गाईच्या पायाला भाला घालतात, परंतु पायाला दोर न बांधतांच वासराला त्याचा भाग कसा बरें मिळतो ? १२० याचें कारण असें कीं तनमनजीवानें त्या वासराला दुसरें कांहींच ठाऊक नसतें. तें तिला पाहतांच म्हणते, 'हीच माझी आई ! ' २१ अशा रीतीनें तें अर्भक आपल्यावांचून अगदीं अनाथ व अनाश्रित आहे, असें पाहून ती गायही त्याच्यावर तशीच एकांतिक प्रीति करित. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले तें अगदीं खरें आहे. २२ असो. भगवान् पुन्हां म्हणाले, “ अर्जुना, दुसरे जे तीन भक्त मी तुला सांगितले, तेही आपल्यापरी चांगलेच आहेत आणि मलाही ते आवडतात. २३ परंतु माझं ज्ञान झाल्यावर, जे पुन्हां मागें फिरण्याचेंच विसरले, जशी नदी समुद्राला येऊन ठेपली म्हणजे तिचें मांगें मुरडणंही संपते, २४ तशीच ज्याच्या अंतःकरणांत उद्भवलेली अनुभूतिगंगा माझ्या स्वरूपसागरांत येऊन मिसळली, तो भक्त म्हणजे मीच या भाषेचा आणखी विस्तार कशाला करूं ? २५ खरोखर म्हटले म्हणजे जो ज्ञानी, तो माझं निव्वळ चैतन्य, प्रत्यक्ष आत्मा आहे. हैं वास्तविक बोलण्यासारखे नाहीं, पण काय करावें ? जें बोलू नये, तेंच बोलून चुकलों ! २६ १ प्रेम, आवड. २ पाश, दोरी, भाला. ३ अन्नाचा हिस्सा ४ आवडते.