पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा २०९ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७॥ सम० - ज्ञानी त्यांत सदायुक्त एकवीं भक्ति थोर तो त्यास मी प्रिय की स्वास्मा तोही आत्मा मम प्रिय ॥ १७ ॥ आर्या-त्यांत विशिष्टज्ञानी करितो जो एकभक्ति मुक्त्यर्थ । तो ज्ञानीही प्रिय मज त्या प्रिय मी नित्ययुक्त इत्यर्थ ॥१७॥ ओवी - ध्यांमध्ये नित्ययुक्त म्हणोनी । मम मत श्रेष्ठ ज्ञानी । ज्ञानियासि आवडे म्हणोनी । ज्ञानी तो मज प्रिय ॥ १७ ॥ तेथ आर्त तो आतींचेनि व्याजें । जिज्ञासु तो जाणावयालागीं भजे | तिजेनि तेणें इच्छजे । अर्थसिद्धि ॥ ११० ॥ मग चौथियाच्या ठायीं । कांहींचि करणें नाहीं । म्हणोनि भक्त एक पाहीं । ज्ञानिया जो ॥ ११ ॥ जे तया ज्ञानाचेनि प्रकारों । फिटलें भेदाभेदाचें कडवसें । मग मीचि जाहला समरसें । आणि भक्तही तेवींचि ॥ १२ ॥ परि आणिकांचिये दिठी नावे | जैसा स्फटिकुचि आभासे उदक । तैसा ज्ञानी नव्हे कौतुक | सांगता तो ॥ १३ ॥ जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे । तेवीं भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥ १४ ॥ जरी पवन हालवून पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे । एन्हवीं गगन तो सहजें । असे जैसें ॥ १५ ॥ तैसें शारीरें हन करें। तो भक्त ऐसा गमे । परी अंतरप्रतीतिधर्मे । मीचि जाहला ।। १६ ।। आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें । मी आत्मा ऐसें तो जाणे । म्हणऊनि मीही तैसेंचि म्हणें । उचंबळला सातां ॥१७॥ हां गा जीवापैलीकडिलिये खुणे । जो पावोनि वावरों जाणे । तो देहाचेनि वेगळेपणें । काय वेगळा होय ॥ १८ ॥ यांपैकी 'आर्त' हा दुःखनिवारणाच्या निमित्तानें, 'जिज्ञासु' हा ज्ञानलालसेनें, आणि 'अर्थार्थी ' हा द्रव्यप्राप्तीच्या इच्छेनें, माझा भक्त होतो. ११० परंतु चवथ्या प्रकारचा जो भक्त राहिला, त्याला कोणतीच वासना तृप्त करून घ्यावयाची नसते, म्हणून 'ज्ञानी' हाच माझा खरा भक्त; ११ कारण त्या ज्ञानाच्या प्रकाशानें भेदभावाचा अंधार नाहींसा होऊन, तो मद्रूप झालेला असतो आणि तसाच माझा भक्तही होऊन राहातो. १२ परंतु सामान्य जनांच्या नजरेला जशी स्वच्छ स्फटिकाची शिला ( तीवरून वाहणाऱ्या पाण्याच्या चलनवलनानें ) क्षणमात्र पाण्यासारखी भासते, तसाच प्रकार या ज्ञानी पुरुषाचा होतो; हा कांहीं एक चमत्कारिक वर्णनप्रकार आहे असें नाहीं. १३ वारा शांत होऊन आकाशांत मिसळला, म्हणजे त्याचें आकाशाहून वेगळें असें 'वारेपण' उरत नाहीं, त्याप्रमाणें जर तो ज्ञानी माझ्याशीं एकत्य पावला, तर तो 'भक्त आहे,' या विधानाला सवडच राहात नाहीं. १४ जर वारा हालवून पाहिला, तरच तो गगनावेगळा आहे, असा प्रत्यय येता, नाहीं तर तो स्वभावतःच गगनरूप असतो. १५ त्याचप्रमाणें जेव्हां तो ज्ञानी शरीरद्वारा कर्म आचरतो, तेव्हां तो भक्त आहे, असा लोकांना अनुभव येतो; परंतु तो स्वतःच्या आत्मानुभवाच्या सहज गुणाने मट्टप झालेला असतो. १६ आणि आपल्या ज्ञानाच्या प्रकाशानें तो 'मी आत्माच आहे,' असें जाणतो, व या कारणास्तव मीही प्रेमानें उचंबळून त्याला 'आत्मा'च म्हणतों. १७ अरे, जो जीवपणाच्या पलीकडली आत्मस्वरूपाची खूण ओळखून व्यवहार करूं शकतो, तो केवळ भिन्न देहधारी झाला म्हणून काय परमात्मतत्वापासून वास्तविक वेगळा होतो ? १८ २७