पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले । परि ऐसे भक्त विपोइले । बहुवस नाहीं ॥ २ ॥ न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः । माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५ ॥ चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्ता जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६ ॥ सम० -- मार्ते न भजती पापी मूढ जे पुरुषाधम । जे भ्रष्टबुद्धि मायेने पावले देत्यभाव जे ॥ १५ ॥ भजती सुकृती मातें अर्जुना ते चतुर्विध । आरोग्यकाम जिज्ञासु अर्थार्थी आणि आत्मवित् ॥ १६ ॥ आर्या - माया भ्रष्ट ज्ञानहि मानसिं जे धरिति दैत्यभावातें । दुष्कृति मूढ नराधम पावति मज न बळरामभावातें ॥ १५ ॥ भजती भावें मातें नर कौंतेया चतुर्विध प्रकृती । अर्थार्थी जिज्ञासु आर्त ज्ञानी असे महा सुकृती ॥ १६ ॥ ओव्या- पापी मूर्ख जाण । मज नेणती अधम जन । मायेनें हरपलें ज्ञान । असुरभाव पावले ॥ १५ ॥ लोक चतुर्विध भजती मज । जे नर आहेत सृकृतांचे बीज तत्व इच्छिती सहज । दुःखी, अर्थकामी, जिज्ञासु, ज्ञानी जे बहुतां ऐकांअवांतर | अहंकाराचा भूतसंचारु । जाला म्हणोनि विसरु | आत्मबोधाचा ॥ ३ ॥ ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे | पुढील अधोगतीची लाज नेणवे । आणि करितात जें न करावें । वेदु म्हणे ॥२॥ पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागी आले पांडवा । तो कार्यार्थ आघवा । सांडूनियां ॥ ५ ॥ इंद्रियग्रामींचे राजविदीं । अहंममतेचिया जल्पवादीं । विकारांतरांची मांदी | मेळवूनियां ||६|| दुःखशोकांच्या घोईं । मारिलियाची सोच नाहीं । हें सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥ ७ ॥ म्हणोनि ते मातें चुकले । ऐक चतुर्विध मज भजले । जिहीं आत्महित केलें । वाढतें गा ॥ ८ ॥ तो पहिला आर्त म्हणिजे । दुसरा जिज्ञासु बोलिजे । तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥ ९ ॥ या मार्गानें जे माझी भक्ति करतात, ते माझ्या या मायेला तरून जातात. परंतु असे भक्त विरळा, ते फारसे आढळत नाहींत. २ कारण, त्या एका भक्तांखेरीज इतर बहुतांना अहंकाराचे वारें भरतें आणि त्यामुळे त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडतो. ३ वेद म्हणतात, असा अहंकाराचा संचार झाला म्हणजे नियमाचा ( म्हणजे इंद्रियनिग्रहाचा ) आडपडदा सुटतो, भावी अधःपाताची लाज वाटत नाहींशी होते, आणि प्राणी जं करूं नये तें करतात. ४ अर्जुना, ज्या कार्याच्या सिद्धीसाठीं आपण या शरीराचा आश्रय केला आहे, तें कार्य अजीबात सोडून, ५ प्राणी इंद्रियरूपी गांवाच्या राजमार्गात अहंकाराची बडबड करीत नाना प्रकारच्या विकारांचा घोळका जमवतात, ६ आणि मग दुःखशोकाचे तडातड तडाखे सूं लागले कीं त्यांच्या स्मृतीचा भ्रंश होतो. या सर्वाचं कारण काय, तर ही प्रकृतिमाया. ७ म्हणून ते जीव मला विसरले आहेत. ज्यांनीं आत्महित साधलें आहे, अशा माझ्या भक्तांमध्यें चार प्रकार असतात; ते असे -१ आर्त, २ जिज्ञासु, ३ अर्थार्थी, व ४ ज्ञानी. ८, ९ १ विरळा. २ एका भक्तांवाचून इतर. ३ घोळका ४ घायनी, प्रद्दारांनी.