पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा २०७ जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तांगा न लगे । वरि कांहीं तरों ये योगें । तरी विपाय तो ॥ ९१ ॥ ऐसें तरी जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें तरणें । हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ।। ९२ ।। जरी अपथ्यशीळा व्याधि | कळे साधूं दुर्जनाची बुद्धि । कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ||१३|| जरी चोरा सभा दाटे । अथवा मीना गळु घोंटे। ना तरी भेंडा उलटे । विवसी जरी ॥ ९४ ॥ पाडस वागुर कैरांडी । कां मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥ ९५ ॥ म्हणऊन गा पांडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तेवीं मायामय हे सरिता । न तरवे जीवां ॥ ९६ ॥ येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले । तयां ऐलीच थडी सरलें । मायाजळ ॥ ९७ ॥ जयां सद्गुरुतारूं फुडें । जे अनुभवाचे कासे गाढे । जयां आत्मनिवेदन तरांडें । आकळलें ॥ ९८ ॥ जें अहंभावाचें वोझें सांडुनी । विकल्पाचिया झुळका चुकाउनी । अनुरागाचा निरुता होउनी । पणिढाळु ॥ ९९ ॥ जयां ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा । मग निवृत्तीचिया पैलतीरा । झेंपावले जे ॥ १०० ॥ ते उपरतीच्या वांवीं सेलर्त । सोहंभावाचेनि थावें पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥ १॥ जेथें वैराग्याचें तरांडें शिंरूं शिकत नाहीं, जेथें विवेकाचा दोर पोचत नाहीं, जेथे योगसाधनानें कांहींसें तरतां येतें, पण तेंही विरळाच ! ९१ अशा या मायानदीला तरून जाण्याचें जीवाला सामर्थ्य आहे, अशा म्हणण्याला उपमा तरी कसली द्यावी ? ९२ पथ्य न करणाऱ्या रोग्याचा रोग जर बरा होईल, जर दुर्जनाची बुद्धि कशी आवाक्यांत आणावी हें कळेल, किंवा जर हाती आलेली सिद्धि लोभट मनुष्य टाकू शकेल, ९३ जर चोराला भरसभेत घुसवेल, किंवा माशाला गळ गिळवेल, किंवा भ्याड पुरुष जखणीवर उलटून उसळेल, ९४ किंवा जर हरिणाचें वासरूं जाळें तोडील, किंवा जर मुंगी मेरु पर्वत चढून पलीकडे जाईल, तरच जीवाला मायानदीचें पैलतीर दृष्टी पडेल ! ९५ म्हणून, बा अर्जुना, ज्याप्रमाणें बाईलवेड्याला बायको धाकांत ठेवितां येत नाहीं, त्याचप्रमाणें जीवाला ही मायानदी तरून जातां येत नाहीं. ९६ जे एकनिष्ठ अनन्यभावाने मला भजतात, तेच एकटे ही नदी तरून जातात; त्यांना पैलतीराला जावेंच लागत नाहीं, कारण, त्यांच्या पुढेच ऐलतीरींच मायाजळाचा खडखडाट होतो ! ९७ ज्यांना सद्गुरुरूपी खासा तया सांपडला आहे, ज्यांनीं अनुभवाची कास बळकट मारली आहे, आणि आत्मबोधाचा तराफा ज्यांच्या हातीं आला आहे, ९८ अहंकाराचं जड ओझें फेंकून देऊन, आणि संकल्पविकल्पाचीं वारीं चुकवून, आणि विषयासक्तीच्या ओघाची धार टाळून, ९९ ज्यांनी, ऐक्याचा उतार गांवून, आत्मबोधाची सांगड साधली, आणि मग जे नैराश्याच्या पैलतीराला झपाट्याने गेले, १०० ते वैराग्याचे हात सपासप मारीत, ' अहं ब्रह्मास्मि या श्रद्धेच्या सामर्थ्यानें तरंगत, शेवटीं निवृत्तितटाला अनायासें येऊन ठेपतात. १ १ छोडी. २ दोर. ३ विरळा, अपवाद. ४ भ्याडाला ५ तोडील. ६ पाण्याची धार. ७ हातांनीं. ८ सळ्या मारीत. ९ सामर्थ्याने १० अनायासें.