पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंवती सत्यलोकींचे हुडे । घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ॥ ८० ॥ तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न धरिती वोभाणें । ऐसा मायापूर हा कवणें । तरिजेल गा ॥ ८१ ॥ येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय तें ऐक ॥ ८२ ॥ एक स्वयंबुद्धीच्या वाहीं । रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं । एक जाणिवेचे डोहीं । गवेंचि गिळिले || ८३ || एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतल्या अहंभावाचिया धोंडी । ते मदमीनाच्या तोंडीं । सगळेचि गेले ॥ ८४ ॥ एकीं वयसेचें जोड बांधलें । मग । मन्मथाचिये कासे लागले । ते विपयमगरीं सांडिले । चघळूनियां ॥ ८५ ॥ आतां वार्धक्याच्या तरंगा | माजीं मतिभ्रंशाचा जरंगा । तेणें कवळिजताती पैं गा | चहूंकडे ॥ ८६ ॥ आणि शोकाचा कडा उपडत । क्रोधाच्या आवर्ती दाटत । आपदागिधीं चुंविजत । उधवला ठायीं ॥ ८७ ॥ मग दुःखाचेनि वरवर बोंबले । पाठीं मरणाचिये रेंवे वले | ऐसे कामाचे कासे लागले । ते गेले वायां ॥ ८८ ॥ एकीं यजनक्रियेची पेटी' । बांधोनि घातली पोटीं । ते स्वर्गसुखाच्या कपाटीं । शिरकोनि ठेले ॥ ८९ ॥ एकीं मोक्षी लागावयाचिया आशा | केला कर्मवाद्यांचा भरवसा । परी ते पडिले वळसां । विधिनिषेधांच्या ॥ ९० ॥ हिच्यांतला जन्ममृत्यूच्या उसळीबरोबर सत्यलोकींचे किल्लेकोट खचून जातात, आणि ब्राह्मांडरूपी वाटोळे गोटे गडबडा लोळूं लागतात ! ८० या मायानदीच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळें अजून तिचा लोंढा थांबतच नाहीं ! मग या मायापूराला कोण बरें तरून जाईल ? ८१ यांत एक चमत्कार असा आहे, कीं, या मायानदीला तरून जाण्यासाठीं जो जो उपाय करावा, तो तो उलट अपकारालाच कारण होतो. हें कसें होतें, तें ऐक. ८२ एक स्वतःच्याच बुद्धीच्या हिमतीवर या नदींत शिरले, पण लवकरच त्यांची शुद्धीच गेली. दुसरे कोणी ज्ञानाच्या डोहांत गर्वाच्या तोंडीं पडले. ८३ दुसऱ्या कोणी वेदत्रयाच्या सांगडीबरोबरच अहंकाराच्या धोंडीही आपल्या भोंवतीं बांधून घेतल्या, आणि अशा स्थितींत उन्मादाच्या माशानें त्यांना संबंधच्या सबंध गिळिलें ! ८४ कोणीं तारुण्याच्या बळाचा आधार घेतला, पण ते विषयलंपटतेच्या नादी लागले, आणि विषय मगरांनी त्यांना अर्धवट चघळून टाकून दिलें ! ८५ आणि पुढें या नदींतील म्हातारपणाच्या लाटेंत जीं बुद्धिभ्रंशाचीं ( म्हणजे म्हातारचळाची ) जाळीं आहेत, त्यांमध्यें ते जिकडे तिकडे अडकतात. ८६ मग शोकाच्या खडकावर आपटत, रागाच्या भोवऱ्यांत गुदमरत, . ते जेथें वर डोकें काढतात, तेथें तेथें आपत्तीची गिधाडें त्यांचें कठोर चुंबन घेतात ! ८७ नंतर दुःखाच्या बरबटीने माखून ते मरणाच्या रेताडांत शेवटीं रुतून गडप होतात. विषयलंपटतेच्या कच्छपीं लागलेले पुरुष असे एकंदरींत फुकट जातात. ८८ दुसऱ्या कांहींनीं यज्ञविधानाचा ताफा करून तो आपल्या पोटाखाली बांधला आणि अशा उपायानें ते स्वर्गसुखाच्या भगदाडांत जाऊन अडकले. ८९ दुसऱ्या कांहींनी मोक्ष मिळविण्याच्या आशेनें कर्मरूपी बाहूंचा आधार घेतला, परंतु ते विधिनिषेधाच्या ( म्हणजे कर्तव्याकर्तव्याच्या ) भोंवऱ्यांत आयतेच सांपडले ! ९० १ बळ धरलें, २ जाळी. ३ वर डोके काढ़तांच, ४ चिखलाने, ५ बरबटले, ६ ताफा, पेटारा,