पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 अध्याय सातवा २०५ संकल्पजळाचा उभेडा । सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥ ६९ ॥ जे सृष्टिविस्ताराचेनि वोधें । चढत काळकळनेचेनि वेगें । प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें । तटें सांडी ॥ ७० ॥ जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें । घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ॥ ७१ ॥ जे देपाच्या आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजी प्रमादादि तळपत । महामीन ॥ ७२ ॥ जेथ प्रपंचाची वळणें । कर्माकर्माचीं वोभाणें । वरी तरताती बोसाणें । सुखदुःखांचीं ॥ ७३ ॥ रतीचिया वेटा । आदळती कामाचिया लाटा | जेथ जीवनसंघटा । सैंघ दिसे ||७४ || अहंकाराचिया चळिया | वरि मदत्रया- चिया उकळिया । जेथ विपयोर्मीच्या आकळिया । उल्लाळ घेती ॥ ७५ ॥ उदयास्तांचे लोंढे | पाडीत जन्ममरणांचे चोंढे । जेथ पांचभौतिक बुडबुडे । होतीजाती ॥ ७६ ॥ सम्मोह विभ्रम मासे । गिळितात धैर्याचीं ऑबिसें । तेथ देव्हडे भोंवत वळसे | अज्ञानाचे ॥ ७७ ॥ भ्रांतीचेनि खडळें । वैले आस्थेचे अवगाळे' । रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्ग गाजे ॥ ७८ ॥ तमाचे धाँरसे वार्ड । सत्त्वाचें स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड | मायानदी ॥ ७९ ॥ फवाऱ्यावरोवर ज्या मायानदीचा लहानसा महाभूतरूपी बुडबुडा उत्पन्न झाला; ६९ नंतर जी सृष्टि रचनेच्या प्रवाहानें व कालक्रमानें चढत्यावाढत्या वेगानें कर्ममार्ग व मोक्षमार्ग या दोन उंच तटांवरून उथाव जाऊन सैरावैरा उसळली, ७० मग सत्त्व, रज व तम या गुणत्रयाच्या वर्षावानें तुडुंब भरल्यामुळें जिच्या मोहरूपी लोंढ्यानें यम ( मनोनिग्रह ) व नियम ( इंद्रियनिग्रह ) हीं शहरें वाहून नेलीं, ७१ जिच्यामध्यें जिकडे तिकडे द्वेषाचे भोंवरे गरगरत असतात, मत्सराचीं वांकणें आड येतात, आणि उन्मादप्रभृति भयंकर मासे तळपतात; ७२ जिच्यांत प्रपंचाचे वळसे व गुंते पुष्कळ आहेत, आणि कर्माकर्माच्या लोंढ्यावर सुखदुःखाचा केरकचरा व काटणपाचोळा तरंगत असतो, ७३ ज्या नदींत विषयविलासरूपी बेटावर वासनांच्या लाटा फुटत असतात, आणि तेथें जीवरूपी फेणाचे पुंजके अडकलेले दिसतात; ७४ ज्या नदींत अहंपणाच्या चाळ्यानें, विद्यामद, धनमद व बलमद, या तिघांच्या उकळ्या येतात, आणि तेथें विषयवासनांच्या लाटा उसळतात; ७५ ज्या नदीत उदयास्तांच्या लोंढ्यांनीं जन्ममरणाचे डोह पडतात, आणि त्यांत पंचभूतात्मक सृष्टीचे बुडबुडे एकसारखे उठतात व फुटतात; ७६ ज्या नदीमध्ये मोहभ्रमादि मासे धैर्याचं मांस तोडून गिळतात, आणि मग वेडे वांकडे अज्ञानाचे वळसे खात ते गरगर भोवंडत राहतात; ७७ ज्या मायानदीत भ्रमाच्या गढूळपणानें श्रद्धेची दलदल बनते, आणि रजोगुणाच्या खळखळाटाचा आवाज स्वर्गापर्यंत ऐकूं जातो; ७८ ज्या मायानदींत तमोगुणाचे प्रवाह पुष्कळ व जोराचे असतात आणि सत्त्वाचें संथपण तरून जाण्याच्या कामी बोजड ठरतें, अशी ही मायानदी एकंदरीत फारच दुष्ट व कठिण आहे. ७९ १ उमासा, फवारा. २ चळवळी, लाटा. ३ डोह. ४ मांस. ५ भरून गेलें. ६ दलदल ७ जोराचे प्रवाह, ८ पुष्कळ मोठे,