पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी परी उदकीं जाली बांबुळी । ते उदकातें जैसी झांकोळी । कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ॥ ६० ॥ हां गा स्वप्न लटिकें म्हणों ये । परि निद्रावशें वाणलें होये । तंव आठवु काय देत आहे । आपणपेयां ॥ ६१ ॥ हें असो डोळ्यांचें | डोळांचि पडळ रचे । तेणें देखणेपण डोळ्यांचें । न गिळिजे कायि ॥ ६२ ॥ तैसी हे माझीच विंवली | त्रिगुणात्मक साउली । कीं मजचि आड वोडवली | जवनिका जैसी ॥ ६३ ॥ म्हणऊनि भूतें मातें नेणती । माझीं परी मी नव्हती । जैसीं जळींचीं जळीं न विरती । मुक्ताफळें ॥ ६४ ॥ पैं पृथ्वीचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे । ए-हवीं तोचि अमिसंगें सिजे । तरी वेगळा होय ॥ ६५ ॥ तैसें भूतजात सर्व । हे माझे कीर अवयव । परी मायायोगें जीव- । दशे आले ॥ ६६ ॥ म्हणोनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहं- ममताभ्रांती | विषयांध झाले ॥ ६७ ॥ दैवी होषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४ ॥ सम० - मी देव माझी त्रिगुणा हे माया तरवे न जे । मातेंचि जे भजति ते मायेतें तरताति या ॥ १४ ॥ आर्या—दैवी ही त्रिगुणमयी माझी माया जगांत दुस्तर ती । येती शरण मला जे त्यांची माया समूळ निस्तरती ॥ १४ ॥ ओवी - माझी माया हे त्रिगुण । व्यजावया अशक्य जाण । जे करिती माझें भजन । मम मायेतें ते तरती ॥ १४ ॥ आतां महादादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया । मी होइजे हें आया । कैसेनि ये ॥ ६८ ॥ जिये ब्रह्माचळाचा आंघाडा । पहिलिया परंतु, पाण्यांत उत्पन्न झालेली शेवाळ जशी पाण्याला झांकते, किंवा अभ्रांनीं जसें आकाश उगाच व्यापिलें जातें, ६० किंवा स्वम जरी खोटें म्हणतां येतें, तरी जोपर्यंत निद्रेची सत्ता आहे, तोपर्यंत तें जसें खरें वाटतें आणि त्या वेळीं आपल्याला आपली स्वतःचीही आठवण राहात नाहीं, ६१ किंवा डोळ्यावर डोळाच मोतीबिंदूसारखें पडळ उत्पन्न करतो, आणि तेंच पडळ जसें डोळ्याची दृष्टि नष्ट करतें; ६२ अशी ही त्रिगुणमयी माया माझी सावली आहे आणि ती माझ्या आत्मस्वरूपाच्या आड जणू काय पडदाच झाली आहे. ६३ म्हणून हे प्राणिमात्र मला ओळखीत नाहींत. ते मजपासूनच झाले आहेत, पण ते म्हणजे कांहीं मी नव्हें. पाण्यांतच उत्पन्न झालेलीं मोत्यें जशी पाण्यांत विरघळत नाहीत; ६४ किंवा मातीचा घट बनविला आणि तो जर लागलीच पुन्हां मातीशीं मिसळला तर तिच्याशीं एकजीव होऊन जातो, परंतु त्याच घटाला अग्निसंस्कार करून भाजला, तर तो मातीहून भिन्न स्वरूपाचा होतो; ६५ त्याप्रमाणें हे सर्व भूतमात्र माझेच अंश आहेत परंतु प्रकृतिमायेच्या योगानें ते जीवदशेला आले आहेत. ६६ म्हणून, हे माझे आहेत, पण 'मी ' नव्हत; हे माझेच आहेत, पण माझें स्वरूप ओळखीत नाहींत; कारण अहंकार, ममता, आणि भ्रम, यांच्यामुळे विषयांध झाले आहेत. ६७ आतां, अर्जुना, महत्तत्त्व इत्यादि जी ही माझी माया, तिच्यापार जाऊन माझ्या मूळ स्वरूपाला कसे मिळावे, हा प्रश्न आहे. ६८ परब्रह्मरूपी पर्वताच्या शिखरावर मूळसंकल्परूपी पाण्याच्या १ शेवाळ २ अप्र कड्यावर.