पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा २०३ हैं एकेक किती सांगावें । आतां वस्तुजाताच आघवें । मजपासूनि जाणावें । विकार असे || ५२ ॥ ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाञ्च ये । मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ १२॥ सम० - आतां सवादि जे भाव ते मिथ्या सर्प दोर मी । कीं मी रज्जू न त्या सर्पी मजरज्जूंत सर्प तो ॥ १२ ॥ आर्या-सास्विक राजस तामस मजपासुनियांच भाव हे सारे । त्यांमार्जी मी न वर्से मजमाज असति भाव हे सारे ॥ १२ ॥ ओवी - सात्विक राजस तामस भाव । मजपासूनि झाले सर्व । तें मज आधीन आहे तव । तयांमाजी मी नाहीं ॥१२॥ जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व । ते ममरूपसंभव । वोळखें तूं ॥ ५३ ॥ हे जाले तरी माझ्या ठायीं । परी तयांमाजीं मी नाहीं । जैसी स्वप्नींच्या डोहीं । जागृति न वुडे ॥ ५४ ॥ जैसी रसाचीच सुघट | वीजकणिका घनवट । परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥ ५५ ॥ मग तया काष्ठाच्या ठायीं । सांग पां वीजपण असे काई । तैसा मी विकारी नाहीं । जरी विकारला दिसें ॥ ५६ ॥ पैं गगनीं उपजे आभाळ । परी तेथ गगन नाहीं केवळ । अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ॥ ५७ ॥ मग त्या उदकाचेनि आवेशें । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे । तिये विजुमाजीं असे । सलिल कायी ।। ५८ ।। सांगें अमीस्तव धूम होये । तिये धूमी काय अग्नि आहे | तैसा विकारु हा मी नोहें । जरी विकारला असें ॥ ५९ ॥ त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् । मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३ ॥ सम० - या सींगुणांचिया भावें मोहिलें विश्व है मज । नेणें जो मी आत्मरज्जू गुण-सर्पापलीकडे ॥ १३ ॥ आर्या-भाव तिन्ही हे पावत झाले जग है इहींच मोहास । नेणें मातें पार्था त्रिगुणपरा सर्व काम देहास ॥ १३ ॥ ओवी - त्रिगुण मजपासोनि झाले । तेथूनि है विश्व रचिलें । तेणें भुलोनि मज चूकले । नेणती परम अव्यय ॥ १३ ॥ योगिश्रेष्ठ परमात्मा. ५१ आतां, याप्रमाणें एक एक गोष्ट तुला कोठवर सांगावी ? सारांश एवढाच, कीं, हें सर्व वस्तुमात्र माझ्यापासूनच विस्तार पावलें आहे. ५२ जे कांहीं सात्त्विक किंवा राजस तामस विकार असतात, तेही माझ्या स्वरूपापासूनच संभवतात. हैं तूं नीट ध्यानीं आण. ५३ हे विकार उत्पन्न झाले तरी ते माझ्या ठायीं उत्पन्न होतात, परंतु, ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेच्या डोहांत जाग्रदवस्था असत नाहीं, तद्वत् या विकारांत मी मात्र असत नाहीं. ५४ रसद्रव्याचाच बनलेला भरदार बीजकण असो, परंतु कोंबाच्या, डाहाळ्यांच्या रूपानें कठिण लांकूड त्याच बीजकणापासून होतं, ५५ आणि मग त्या लांकडांत कोठें तरी बीजाचा गुण असतो का ? त्याप्रमाणेच जरी माझ्या ठिकाणीं विकार उत्पन्न झालेले दिसले, तरी त्या विकारांत मी नसतो. ५६ आकाशांत अभ्रं येतात, परंतु अभ्रांत आकाश नसतें. ५७ मग त्या पाण्याचा क्षोभ झाला, म्हणजे तेजाचा लखलखाट दिसतो, त्या लखलखणाऱ्या विजेंत पाणी असतें, असें म्हणतां येईल काय ? ५८ अरे, विस्तवापासून धूर उत्पन्न होतो, पण त्या धुरांत विस्तव असतो का ? सांग. त्याप्रमाणें माझ्यावर विकार घडतात, पण ते विकार म्हणजे कांहीं मी नव्हें. ५९ १ क्षोभानें,