पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी पैं आदिचेनि अवसरें | विरूढे गगनाचेनि अंकुरें । जें अंतीं गिळी अक्षरें | प्रणवपीठींचीं ॥ ४० ॥ जंव हा विश्वाकार असे । तंव जें विश्वाचिसारिखें दिसे । मग महाप्रळयदशे | कैसेंही नव्हे ॥ ४१ ॥ ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्ववीज । हें हातातळीं तुज । देईजत असें ॥ ४२ ॥ मग उघड करूनि पांडवा । जैं हें आणिसी सांख्याचिया गांवा । तैं ययाचा उपेगु बरवा | देखील ॥ ४३ ॥ परि हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु बोलों संक्षेप | जाण तपियांच्या ठायीं तप । तें रूप माझें ॥ ४४ ॥ वळियांमाजीं बळ । तें मी जाणें अढळ । बुद्धिमंतीं केवळ | बुद्धि ते मी ॥ ४५ ॥ भूतांच्या ठायीं कामु । तो मी म्हणें आत्मारामु । जेणें अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥ ४६ ॥ एहवीं विकाराचेनि पैसें । करी कीर इंद्रियांचिऐसें । परी धर्मास वेखासें । जावों नेदी ॥ ४७ ॥ जो अंप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा । तेवींचि नियमाचा दिवटा । सर्वे चाले ॥ ४८ ॥ कामु ऐशिया बोजा प्रवर्ते । म्हणोनि धर्मासि होय पुरतें । मग मोक्षतीथींचें मुक्ते । संसारभोगी ॥ ४९ ॥ जो श्रुतिगौरवाच्या मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी । जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गी टेंके ॥ ५० ॥ ऐसा नियतु कां कंदर्पु । जो भूतां यां बीजरूपु । तो मी म्हणे वापु । योगियांचा ॥ ५१ ॥ 6 जें उत्पत्तिसमयीं आकाशाच्या कोंबाबरोबर विस्तार पावतें, आणि विश्वसंहाराच्या वेळीं अ, उ, म्,' हीं ओंकाराचीं अक्षरेही गिळून नाहींशीं करतें; ४० जो हैं दृश्यमान जग अस्तित्वांत आहे, तोंवर जें विश्वाकार भासतें, पण महाप्रळयाचा समय आल्यावर नाहींसें झालें तरी जें मुळींच नाहींसें होऊं शकत नाहीं; ४१ अशा प्रकारें जें स्वयंसिद्ध व अनादि विश्ववीज, तें मीच आहें, हें गूढ ज्ञान मी तुला सुलभ करून देत आहे. ४२ मग, अर्जुना, या ज्ञानाचा तूं जेव्हां आत्मानात्मविचाराशीं सांधा जोडशील, तेव्हां याची खरी थोरवी तुझ्या अनुभवास येईल. ४३ परंतु हें विषयांतर पुरे. आतां तुला हें तत्त्व थोडक्यांत सांगतों. तपस्व्यांचें तप तें माझेंच रूप समज. ४४ बळवंतांचें बळ व बुद्धिवंतांची बुद्धीही मीच. ४५ भूतमात्राच्या ठिकाणीं अर्थार्जन करून धर्माचा विपुल संग्रह करणारा जो शुद्ध काम-वासना आहे, तो म्हणजे आत्मस्वरूपांत रममाण असणारा मीच आहे. ४६ हा शुद्ध काम जरी सामान्यतः विकारांच्या प्रवाहानुरूप इंद्रियतृप्तीचें कर्म करतो, तरी तो इंद्रियांना धर्माविरुद्ध जाऊं देत नाहीं. ४७ हा काम कर्मसंन्यासाची आडवाट सोडून, विधियुक्त कर्माचरणाच्या राजमार्गाला लागतो, आणि नियमितपणाची मशाल याच्याबरोबर नेहमी असते. ४८ अशा सावधपणानं काम व्यवहारूं लागला, म्हणजे धर्माची पूर्तता होते, आणि मग संसाराचा उपभोग घेणारे पुरुषही मोक्षतीर्थाचे मुक्त जन होतात. ४९ वेदांनी गायलेल्या थोरपणाच्या मांडवावर जो काम विश्वाची वेल अशी चढवतो, कीं, तिच्यावर येणारी कर्माची पालवी फळभारानें ओथंबून अखेर मोक्षावर टेंकते, ५० अशा प्रकारचा, सर्व भूतांचा उद्भव करणारा जो बीजरूप काम, तो म्हणजे मी १ प्रवाहानें, विस्तारानें २ विरुद्ध ३ कर्मसंन्यासाचा. ४ आडमार्ग,