पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवां २०१ रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः । प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८ ॥ पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्वास्मि विभावसौ । जीवनं सर्वभूतेषु तपञ्चास्मि तपस्विषु ॥ ९ ॥ सम० - जळीं विभूति रस मी चंद्रसूर्यांत मी प्रभा । वेद प्रणव मी शब्द नभीं पौरुष मी नरीं ॥ ८ ॥ पृथ्वींत मी पुण्यगंध तेज तें मी हुताशनीं । जीवन प्राणिमात्रांत तप मी तापसांमधें ॥ ९ ॥ आर्या - रविचंद्रांत तिमी सर्वां वेदांत मीच ओंकार । उदर्की रसशब्द नभीं पुरुषांतहि मीच पौरुषाकार ॥ ८ ॥ मी भूत पुण्यगंधहि मी ज्वलित विभावसूंत तेज असें । तप मी तपस्वियांतहि जीवन भूतांत जाण मीच भर्से ९ मोंग्या – सर्व रसांची गोडी । चंद्रसूर्य माझी प्रौढी । पुरुषीं पुरुषत्वाची गाढी । ॐकार तो वेदीं जाण मी ॥ ८ ॥ मी पृथ्वीचा गंधविषय । अभींत जठराग्नि मी होय । जीवांचा जीवनठाय । तापसियांत तप मी ॥ ९ ॥ म्हणोनि उदकीं रसु । कां पवनीं जो स्पर्श । शशिसूर्य जो प्रकाशु | तो मीचि जाण ।। ३३ ।। तैसाचि नैसर्गिक शब्द | मी पृथ्वीच्या ठायीं गंधु । गगनीं मी शब्द | वेदीं प्रणव ॥ ३४ ॥ नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभावियें सत्त्व । तें पौरुष मी हें तत्त्व । वोलिजत असे ॥ ३५ ॥ अनि ऐसें ओहाच | तेजीं नामाचें आहे कवच । तें परतें केलिया साच । निजतेज तें मी ॥ ३६ ॥ आणि नानाविध योनि । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं । वर्तत आहाति जीवनीं । आपुलाल्या ॥ ३७ ॥ एकें पवनेंचि पिती । एके तृणास्तव जिंती । एक अन्नाधारें राहती । जळें एकें ॥ ३८ ॥ ऐसें भूतप्रति औनान । जें प्रकृतिवशे दिसे जीवन । तें आघवां ठायीं अभिन्न । मीचि एक ॥ ३९॥ बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् । बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १० ॥ बलं बलवतामस्मि कामरागविवर्जितम् । धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११ ॥ सम० - भूतें मिथ्यांबु मी सूर्य असें तद्वीज नित्य मी । बुद्धिमंतांत मी बुद्धी तेज तेजस्वियांत मी ॥ १० ॥ बलवंतांत बल मी कामरागविवर्जित । न धर्मासीं जो विरुद्ध कामही तो विभूति मी ॥ ११ ॥ आर्या - बुद्धि सुबुद्धांतचि मी भूतांचें बीज जें सनातन मी । तेजहि तेजस्व्यांतचि मी हें जाणोनियां सनात नमीं ॥१०॥ बलही बलवंतांचे पार्था जें कामरागवर्जित मी । धर्माविरुद्ध कांहीं भूर्ती मी जो न नेत अंधतम ॥ ११ ॥ ओव्या - सर्व भूतांचं बीज मी होऊन सर्व वर्तणूक मजपासून । बुद्धिवंताची बुद्धि आदिकरून । तेजस्वियांचे तेज मी १० बलवंतांचे जे बळ | कामरागविवर्जित सकळ । धर्माविरुद्ध भूर्ती मी केवळ । काम तो मीच जाण ॥ ११ ॥ यास्तव, बा अर्जुना, पाण्याचे ठायीं जो रसगुण, किंवा वाऱ्याचे ठायीं जो स्पर्शगुण, किंवा चंद्रसूर्याचे ठायीं जो तेजोगुण, तो मीच आहें, असें समज. ३३ त्याप्रमाणेंच पृथ्वीच्या ठायीं असणारा गंधगुण, आकाशाचे ठायीं असणारा शब्दगुण, आणि वेदाच्या ठायीं असणारा ॐॐकारस्वरूप प्रणव, हे सर्व म्हणजे स्वाभाविक शुद्ध असा मीच होय. ३४ मनुष्यामध्ये असणारं मनुष्यत्व, आणि ज्या अहंपणाच्या बळाला 'पौरुष' म्हणतात, तेंही मीच हें मुख्य तत्त्व तुला सांगण्यांत येत आहे. ३५ 'अग्नि' या नांवाचें जें तेजावर आवरण आहे, तें दूर केलें, म्हणजे जें केवलस्वरूप तेज उरतें, तें मीच आहे. ३६ आणि नाना प्रकारच्या योनींत जन्मास येऊन या त्रिभुवनांत भूतमात्र आपापल्या विशिष्ट मार्गानें निर्वाह करीत असतात; ३७ कोणीएक वायु पिऊन राहातात; कोणी गवतावर जीवयात्रा चालवितात; कोणी अन्नावर उपजीविका करतात; आणि कोणी पाण्यावर पोसले जातात. ३८ अशा प्रकारें निरनिराळ्या प्राण्यांना जं भिन्नभिन्न जीवनाचें साधन स्वभावतः असलेलें दिसतें, त्या सर्व साधनांच्या ठिकाणीं मीच एक अभिन्न स्वरूपानें वसत असतो. ३९ १ वरवरचें, बाह्म. २ जगतात. ३ भिन्नभिन्न. २६