पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीज्ञानेश्वरी मिती नेणिज । भरे आदिशून्याचा गाभारा | नाणेयांसी ॥ २४ ॥ ऐसे एकैतुकं पांचभौतिक | पडती बहुवस टांक | मग तिये समृद्धीचे लेख | प्रकृतीचि धरी ॥ २५ ॥ जें आंखूनि नाणें विस्तारी । पार्टी तयाची आटणी करी | माजी कर्माकर्माचिया व्यवहारी । प्रवर्तु दावी || २६ || हें रूपक परी असो । सांगों उघड जैसे परियेसों । तरी नामरूपाचा अंतिसो । प्रकृतीच कीजे ॥ २७ ॥ आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं । विंवे येथ ऑन नाहीं । म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥ २८ ॥ मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥ सम० - धनंजया नसे कांहीं मजहूनि पलीकडे । वोविलें मजमध्यें हैं विश्व सूत्री जसे मणी ॥ ७ ॥ आर्या - मजदुनि अन्य निराळें नाहीं दुसरें धनंजया कांहीं । माझे ठायीं प्रथिले सर्वहि सूत्री मण्यापरी पाहीं ॥ ७ ॥ ओंवी - यापरतें कांहीं । अर्जुना दुसरें नाहीं । मीच अवघे ठायीं । जैसा सूत्रीं मणि पदीं तंतू ॥ ७ ॥ हैं रोहिणीचं जळ | तयाचें पाहातां येई जैं मूळ । तें रश्मि नव्हती केवळ | होय तें भानु ।। २९ ।। तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी । जें उपसंहरूनि कीजेल ठी । तें मीचि आहे ॥ ३० ॥ ऐसें होय दिसे न दिसे । हें मजचिमाजीं असे । मियां विश्व धरिजे जैसें । सूत्रें मणि ॥ ३१ ॥ सुवर्णाचे मणी केले | ते सोनियाचे सुतीं वोविले | तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥ यांच्या वर्गवारीची एकंदर संख्या चौन्याशीं लक्ष आहे. शिवाय मुख्य वर्गात आणखी जे पोटवर्ग आहेत, त्यांची तर गणतीच नाहीं. अशा अपरंपार प्राणिरूपी नाण्यांनीं निर्गुण, निराकार, अव्यक्त, बीजाचा गाभारा भरून जातो. २४ अशा प्रकारें पंचमहाभूतांची सारख्या तोलाचीं इतकीं विपुल नाणीं पडतात, कीं, एकट्या प्रकृति मायेलाच त्यांची गणती करतां येते. २५ ज्या नाण्याची आंखणी करून ती तयार करतं, तेंच नाणें ती नंतर आटवून टाकते; मात्र, मध्यंतरींच्या अवस्थेत ती त्याच्या द्वारे कर्माकर्माचा व्यवहार चालविते. २६ परंतु हा रूपकालंकार आतां पुरे. आतां साध्या सरळ शब्दांनी हे सहज कळेल असें सांगतों. ही प्रकृति ( म्हणजे मायाच ) हा नामरूपानें प्रतीत होण्यास विश्वाचा पसारा मांडते. २७ आणि ही प्रकृति तर माझ्यांतच समरस होऊन असते; म्हणून या सर्व जगाचा आदि, मध्य, आणि अंत, मीच आहे. २८ हे जे मृगजळ आपल्याला दिसतें, त्याचें मूळ कारण जेव्हां शोधण्यांत येतें, तेव्हां तें कारण नुसते किरण नसून, प्रत्यक्ष सूर्यच आहे, असे आढळते. २९ त्याप्रमाणेच, अर्जुना, या प्रकृति मायेपासून झालेली ही सृष्टि ज्या वेळीं आंवरली जाऊन, तिची मूळस्थितींत ठाकठीक घडी बसेल, तेव्हां ती मद्रपच होईल. ३० अशा प्रकारें उत्पन्न होऊन विलयास जाणारें हैं विश्व माझ्या ठायींच असतें. तांत जसे मणि ओवलेले राहावे, त्याप्रमाणेच हें विश्व माझ्या ठिकाणी राहते. ३१ सोन्याचे मणि जसे सोन्याच्या तारेनें गुंफावे, त्याप्रमाणें हें विश्व अंतर्बाह्य मीच धारण करीत असतों. ३२ १ संग्रहाला २ एकसारखे, एका तोलाचे. ३ पसारा. ४ दुसरी गोष्ट, भिन्नत्व, ५ मृगजळ. ६ मूळस्थितीत व्यवस्था.