पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा १९९ तरी अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ।। १५ ।। आणि इयेतें प्रकृति म्हणजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे । इयेस्तव || १६ || हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं । तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ॥ १७ ॥ आप तेज गगन । मही मारुत मन । बुद्धि अहंकार हे भिन्न । आठे भाग ॥ १८ ॥ अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५ ॥ सम०—– अपर कार्यरूपा हे मूळ प्रकृति ते परा । चिदशे जीव जे झाली जाणिजेतें जिणें जग ॥ ५॥ आर्या-- जीवस्वरूप दुसरी प्रकृति परम जाण सांगतों तुज गां । तूं ऐक महाबाहो धरिती जे यास दास ते मज गा ॥५॥ ओवी - यांही हुनी आणीक असे प्रकृती । जीवभूतां ते महाबाहो धरिती । उत्पत्तिप्रलयस्थिती । तयांमाजी ॥ ५ ॥ या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्थी । तिये नाम व्यवस्था | जीव ऐसी ॥ १९ ॥ जे जडातें जीववी । चेतनेतें चेतवी । मनाकरवी मानवी । शोकमोहो ॥ २० ॥ पैं बुद्धीच्या अंगी जाणणें । ते जिये जवळिकेचें करणें । जिया अहंकाराचे विंदाणें । जगचि धरिजे ॥ २१ ॥ एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय । अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६ ॥ सम० - ईपासूनीच हीं भूतें मूळ चिच्छक्ति जाण ही । उत्पत्ति प्रळयस्थान सर्वांचा जाण मी तसा ॥ ६ ॥ आर्या- प्रकृतीपासुनि भूतें सर्वहि होताति हाचि निर्धार । परि मी सकळ जगाच्या उत्पत्ति-स्थिति-लयांसि आधार ॥ ६ ॥ ओंवी - सर्वभूतांची योनी । वर्ते तथा अधिनी । असती झाली मजपासुनी । सर्वांचे उत्पत्तिप्रळयस्थान मी भएँ ॥ ६ ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे । तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥ २२ ॥ चतुर्विध ठसा । उमटों लागे ऑपैसा । मोला तरी सरिसा । परि थरचि अनान ॥ २३ ॥ होती चौन्यांशीं लक्ष थरा । येरा पार्था, ऐक. आपल्या देहाची जशी सांवली पडावी, तशी ही महत्तत्व वगैरे माया माझी सांवलीच आहे. १५ या मायेलाच 'प्रकृति' हें नांव आहे. ही माया अप्रभेदात्मक आहे आणि हीच हैं लोकत्रय प्रसवते. १६ हिचे आठ भेद कोणते अशी शंका तुला येईल, तर ऐक. १७ आप, तेज, आकाश, पृथ्वी, वायु, मन, बुद्धि, अहंकार, हे या प्रकृतीचे आठ भेद. १८ या आठ भेदांची जी सारखेपणाची स्थिति, ती, अर्जुना, माझी 'परम प्रकृति ' समज. हिलाच 'जीव' हें नांव आहे, १९ कारण हीच निर्जीव शरीराला जिवंत करते, चलनवलन उत्पन्न करते, आणि मनाला शांकमोहादि विकार भासवते. २० बुद्धीचें जें जाणतेपण तेंही या परम मायेच्याच सहवासाचें फळ, आणि हिच्यापासून उद्भवणाऱ्या अहंभावानंच हे जग अस्तित्वांत राखले जाते. २१ ती सूक्ष्म प्रकृति जेव्हां आवडीनें स्थूळ महाभूतांच्या अंगांना घडविते, तेव्हां भूतसृष्टीची ( म्हणजे प्राणिमात्राच्या उत्पत्तीची ) टांकसाळ सुरू होते. २२ या टांकसाळींतून निघणा-य प्राणरूपी टांकाचे चार उसे आपोआप उमटू लागतात. जरायुज, अंडज, स्वेदज, व उद्भिज, असे हे चार प्रकारचे ठसे आहेत. यांची किंमत सारखीच आहे, पण त्यांची वर्गवारी मात्र भिन्नभिन्न आहे. २३ १ प्रश्न, शंका, २ सहवासाचे ३ करणीर्ने ४ सारखा. ५ भिन्नभिन्न.