पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आतां अज्ञान अवघें हरपे | विज्ञान निःशेष करपे । आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाइजे ॥ ७ ॥ जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन तुटे । हें जाणणे सामोठें । उरों नेदी ॥ ८ ॥ ऐसें वर्म जें गूढ । तं किजेल वाक्यारूढ । जेणें थोडेन पुरे कोड | बहुत मनींचें ॥ ९॥ मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३ ॥ सम०—- मनुष्यांच्या सहस्रांत मोक्षयत्नी नर क्वचित् । यत्नेहि सिद्ध जे त्यांत जाणे तस्व असा क्वचित् ॥ ३ ॥ आर्या - मनुजांच्याहि सहस्री विरळा करि यान सिद्धिचा सवें । यत्नहि कर्त्या सिद्धांमाजी विरळाचि जाणतो तत्रं ॥३॥ ओंवी--मनुष्यांचिया सहस्रांमध्यें । सिद्धीतें पावती एखादे । ऐसिया सिद्धसहस्रांमध्यें । मज जाणे एखादा ॥ ३ ॥ पैंगा मनुष्यांचिया सहस्रशां । माजीं विपाइलेयांचि एथ विसा । तैसें या विसेकरां बहवस | माजी विरळा जाणे ॥ १० ॥ जैसा भरलेया त्रिभुवना । आंतु एकएक चाँगु अर्जुना । निवडुनि कीजे सेना । लक्षवरी ॥ ११ ॥ कीं तयाही पाठीं । जे वेळीं लोह मांसातें घांटी । ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं । एकुचि वैसे ||१२|| तैसे आस्थेच्या महापुरीं । रिघताती कोटिवरी । परी प्राप्तीच्या पैलतीरीं । विपाइला निगे ॥ १३ ॥ म्हणऊनि सामान्य गा नोहे । हें सांगतां वेडिल गोठी आहे । परी तें बोलों येईल पाहें । आतां प्रस्तुत ऐकें ॥ १४ ॥ भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ४ ॥ सम० - - पंचभूतें मन बुद्धी अहंकारहि आठवा । माझी प्रकृति हे ऐशी अष्टधा भेद पावली ॥ ४ ॥ आर्या--क्षिति जळ तेज समीरण आणिक आकाशही अविच्छिन । मन बुद्धि अहंकार प्रकृति अशी जाण अष्टधा भिन्न ॥ ४ ॥ ओवी - पंचभूतें मन बुद्धि श्रेष्ठ । ऐसीं हीं अहंकार आठ । ऐसी प्रकृति जुनाट असे वेगळाली ॥ ४ ॥ तेव्हां आतां 'अज्ञान' लोपून जावें, 'विज्ञान' नम्र व्हावें, आणि आपण केवळ 'ज्ञानस्वरूप होऊन रहावें. ७ असें झालें, म्हणजे वक्त्याचें बोलणेंच खुंटतें, श्रोत्याचा श्रवणाचा हव्यासही संपतो, आणि लहानमोठे ही भेद्भावनाही उरत नाहीं. ८ अशा प्रकारचें हें गूढ रहस्य मी तुला सांगणार आहे; हे थोडेंस जरी कळले, तरी मनाचें पुष्कळ समाधान होते. ९ , हजारों माणसांमध्ये या गोष्टीचा छंद विरळा एखाद्यालाच असतो, आणि अशा या छंदाला लागलेल्या पुष्कळ माणसांतही खरा जाणता विरळाच दिसतो. १० अर्जुना, सर्व जगांत शोधून एकेका निधड्या शूरास निवडून जशी सैन्याची लक्षावधि भरती करण्यांत येते, ११ किंवा अशा रीतीनं सैन्यांत भरती केल्यावरही जेव्हां रणांगणांत खणखणणाऱ्या तरवारी मांसाचे काप उडवूं लागतात, त्या वेळी जसा विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एकादाच बसतो, १२ तसे ब्रह्मज्ञानाच्या हव्यासांत कोट्यवधि पुरुष उड्या घेतात, परंतु त्याचें पैलतीर क्वचित् एकादाच गांठतो. १३ म्हणून ही गोष्ट कांहीं साधी नाहीं; अरे, ही सांगण्याला फार गहन व कठिण आहे. परंतु ती तुला सांगण्याचा मी प्रयत्न करतों, तर ऐक. १४ १ क्वचित् एकाद्यास २ छंद, आवड. ३ पुष्कळ जगांत ४ निधडा शूर. ५ लाखों गणती. ६ नंतर. ७ कापतें. ८ आसनावर. ९ गहन, कठिण.