पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय सातवा श्रीभगवानुवाच- मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः । असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १॥ ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वश्याम्यशेषतः । यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥ २ ॥ सम० – सप्रेम मन मद्रूपीं योगाभ्यासीं मदाश्रित । सर्वस्वीं जाणसी मातें जसें तें स्पष्ट आइक ॥ १ ॥ विज्ञानेसि तु ज्ञान हैं मी निःशेष सांगतों । जें जाणोनि पुन्हा येथे जागणें तें उरेचिना ॥ २ ॥ आर्या- माझी आसक्ति मनीं मदाश्रयें योग करुनि निर्वाण । निश्चित समग्र मातें जाणसि तें ऐक सांगतों जाण ॥ १ ॥ विज्ञानज्ञान तुला कथितों साकल्य वदति जे शिष्ट । ज्यातें जाणोनि पुन्हा जाणायाचेहि नुरवि अवशिष्ट ॥ २ ॥ ओव्या- अर्जुना अवधारीं । मन माझे ठायीं ठेवोनि योग करीं । तुझे संशय नासतील जयापरी । तें सांगेन आतां ॥ १ ॥ ज्ञानविज्ञानसहित । तुज सांगेन समस्त । जें जाणित लिया निश्चित । जाणों न उरे ॥ २ ॥ आइका मंग तो श्रीअनंतु । पार्थातें असे म्हणतु । पैंगा तूं योगयुक्तु । जालासि आतां ॥ १ ॥ मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातींचें रत्न जैसें । तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं ॥ २ ॥ एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें । तरी पैं आधी जाणावें । तेंचि लागे ॥ ३ ॥ मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे | जैसी तीरीं नाव न डळे | टेकली सांती ॥ ४ ॥ तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउली निघे । तर्क आयणी नेघे । आंगीं जयाच्या ||५|| अर्जुना तया नांव ज्ञान | येर प्रपंच हें विज्ञान । तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६॥ श्रोते हो, श्रवण करा. मग ते श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले, “अर्जुना, तूं आतां खरोखरच योगयुक्त झाला आहेस. १ तळहातावर ठेवलेल्या रत्नाप्रमाणे मला तूं सर्व बाजूंनी जाणशील, असें 'ज्ञान' व 'विज्ञान' म्हणजे प्रपंचज्ञान, हीं तुला आतां सांगणार आहें. २ आतां कदाचित् तूं आपल्या मनांत म्हणशील, कीं, 'या प्रापंचिक विज्ञानाला घेऊन मला काय करावयाचें आहे ? ' तर आधीं प्रपंचाचंच ज्ञान करून घेणं अवश्य आहे. ३ नंतर ज्ञानाच्या प्रसंगों या प्रापंचिक जाणतेपणाची डोळेझांक होते. ज्याप्रमाणे किनान्यावर टेकलेली होडी डळमळत नाहीं, ४ त्याचप्रमाणे जेथे प्रापंचिक जाणतेपणाचे पाऊल शिरत नाहीं, जेथून विचारही माघाराच फिरतो, ज्याची वाट तर्कालाही सांपडत नाहीं, ५ त्याला बाबा अर्जुना, 'ज्ञान' हे नांव आहे. ज्ञानाहून वेगळा जो प्रपंच, तो 'विज्ञान' होय, आणि हा 'प्रपंच खरा आहे,' ही कल्पना 'अज्ञान' समजावी. ६ १ असतो.