पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ८९ ॥ जें सात्त्विकाचेनि वैडपें । गेलें आध्यात्मिक खैरखें । सहजें निडारले वाफे । चतुरचित्ताचे ।। ४९० ।। वरी अवधानाचा वाफँसा । लाधला सोनयाऐसा । म्हणोनि पेरावया विसा | श्रीनिवृत्तीसी ॥ ९९ ॥ ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरूंनी केले कोडें । माथां हात ठेविला तें फुडें । वीजचि बाइलें ॥ ९२ ॥ म्हणऊनि येणें मुखें जें जें निगे । तें संतांच्या हृदयीं साचि लागे । हें असो सांगों श्रीरंगें | बोलिलें जें ॥ ९३ ॥ परि तें मनाच्या कानीं ऐकावें । बोल बुद्धीच्या डोळां देखावे | हे सांटोवाटी घ्यावे | चित्ताचिया ॥ ९४॥ अवधानाचेनि हातें । नेयावे हृदयातोते । हे रिझवितील आयणीतं । सजनाचिये ॥ ९५ ॥ हे स्वहितातें निवविती । परिणामातें जीवविती । सुखाची वाहती । लाखोली जीवां ॥ ९६ ॥ आतां अर्जुनेंसीं श्रीमुकुंदें | नागर बोलिजेल विनोदें । तें वोवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ॥ ४९७ ॥ फुटतील. ८९ कारण, सात्विक भावनांच्या वृष्टीनें आत्मभावनेचीं टेंपें विरघळून श्रोत्यांच्या चतुर चित्ताचे वाफे बीजधारणाला सज्ज झाले आहेत. ४९० त्यांत, चित्ताच्या एकतानतेचा सोन्यासारखा उबारा लाभल्यामुळे श्रीनिवृत्तिनाथांना सिद्धांतबीज पेरण्याचा हुरूप आला आहे. ९१ हा निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणतो, श्रोते हो, मला या पेरणीच्या कार्यात सद्गुरूंनीं धोटें केलें आहे, आणि माझ्या मस्तकावर हात ठेवून माझ्या आंत पेरण्याचं वीं घातले आहे. ९२ म्हणून या माझ्या मुखानें जं जं बाहेर पडतें, तें तें संताच्या हृदयांत नेमकेंच शिरतें. पण हें विषयांतर आतां पुरे. श्रीकृष्णांनीं अर्जुनाला काय सांगितले तें आतां कथन करितों. ९३ पण तें श्रीतृजनांनीं मनाच्या कानांनीं ऐकावें, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावें, आणि आपलें चित्त मला देऊन माझे बोल त्यांनी घ्यावे, असा हा अदलाबदलीचा व्यवहार झाला पाहिजे. ९४ मग सावधानपणाच्या हातानें हे बोल उचलून हृदयांच्या आंत भरावे, म्हणजे हे सज्जनांची आवड पुरवतील. ९५ हे बोल आत्मकल्याणाला हस्तप्राप्य करतात, परिणामाला सजीवता आणतात, आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतात. ९६ आतां अर्जुनावरोवर श्रीकृष्णांनीं जें सुंदर व चतुर संभाषण केलें तेंच, मी ओवीछंदांत गुंफून सांगणार आहे. ४९७ 1200000000000003 १ वर्षावाने २ देवें. ३ उबारा ४ हुरूप, उल्हास, ५ घोटे, ६ घातलें. ७ बदला. ८ सुंदर,