पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १९५ येणें जाहलें मनोधर्मा । तो शरीरीचि परी महिमा । ऐशी पावे ॥ ४८० ॥ म्हणोनि याकारणें । तूतें मी सदा म्हणें । योगी होईं अंतःकरणें । पांडुकुमरा ॥८१॥ योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना । श्रद्धावान्भजत यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ४७ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्टोऽध्यायः ॥ सम० - स्वरूपनिष्ठ चित्तें जो यां सवां योगियांमधें । भक्तियोगें भजे मातें तो योगी थोर संमत ॥ ४७ ॥ आर्या - सवां योग्यांमध्यें मातें मव्रतमनें हरोनि तम । श्रद्धावंत भजे जो तो मज अतिमान्य जाण युक्ततम ॥ ४७ ॥ ओवी — योगीश्वरांमाझारीं । अंतःकरण ठेवी निर्धारीं । तो भक्त अवधारीं । तो योगी मज मानला ॥ ४७ ॥ अगा योगी जो म्हणिजे। तो देवाचा देव जाणिजे । आणि सुखसर्वस्व माझें । चैतन्य तो ॥ ८२ ॥ तेथ भेजता भजन भजावें । हें भक्तिसाधन जें आघवें । तो मीचि जाहलों अनुभवें । अखंडित ॥ ८३ ॥ मग तया आम्हां प्रीतीचं । स्वस्वरूप बोलीं निर्वचें । ऐसें नव्हे गा साचें । सुभद्रापती ॥ ८४ ॥ तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा | हेचि होय ॥ ८५ ॥ ऐसें भक्तचकोर चंदें । त्रिभुवनेकनरेंदें । बोलिलें गुणसमुझें । संजयो म्हणे ॥ ८६ ॥ तेथ आदिलापासूनि पार्था । ऐकिजे ऐसीचि आस्था । दुणावली हैं यदुनाथा । भावों सरलें ॥ ८७ ॥ कीं सोवियाचि मनीं संतोपला । जे बोला आरिसा जोडला । तेणें हरिखें आतां उपलवला । निरूपील ॥ ८८ ॥ तो प्रसंगु आहे पुढी । जेथ शांत दिसेल उघडा । तो पालविजेल मुडौं । प्रमेयवीजाचा परमात्मा यांचा संगम जडला, तो शरीरधारी असूनही या थोरवीला चढतो ४८० म्हणून, अर्जुना, माझा तुला असा सदाचा उपदेश आहे, कीं, तूं योगी हो. ८१ अरे, ज्याला योगी म्हणतात, तो देवाचा देव समजावा. तो माझें सुखसर्वस्व, किंबहुना प्राणच होय. ८२ त्या पुरुषाच्या ठायीं भक्त, भजन, व भजनीय, ही जी भक्तिसाधनांतील त्रिपुटी, ती मीच आहे, असा अखंड अनुभव असतो. ८३ मग त्या पुरुषाच्या आणि आमच्या परस्पर प्रीतीचें वाचेनें वर्णनच होऊ शकत नाहीं. ८४ त्या तन्मयतेच्या प्रेमाला साजेल अशी उपमा पाहिजे असेल, तर मी देह, आणि तो आत्मा, हीच ती उपमा होय. " ८५ अशा प्रकारें, भक्तचकोरांना आनंदविणारा चंद्र, सद्गुणांचा सागर, व त्रिभुवनांत नरश्रेष्ठ जे श्रीकृष्ण, ते अर्जुनाला बोलले, असें संजयानें धृतराष्ट्राला कथन केलें. ८६ त्या वेळीं, प्रथमपासूनच उपदेश ऐकण्याची जी श्रद्धायुक्त उत्कंठा अर्जुनाला झाली होती, ती आतां दुप्पट वाढली आहे, हें श्रीकृष्णांना कळून चुकलें. ८७ म्हणून कृष्णांना साहजिकच मनांत संतोष झाला. आरशांत जसें प्रतिबिंब दिसावें, तसा आपल्या भाषणाचा ठसा अर्जुनाच्या मुद्रेवर दिसत आहे, हें पाहून श्रीकृष्णांना वाटलेल्या आनंदाच्या भरांत, ते आतां च प्रकरण विस्तारपूर्वक सांगतील. ८८ तो प्रसंग पुढील अध्यायांत आहे. त्या प्रसंगांत शांतिरस इतक्या स्पट उत्कटतेला येईल, कीं, त्यानें महासिद्धान्तरूपी बीजांच्या मुड्याला अंकुर १ भक्त, भजन, व भजनीय है त्रिकूट, २ स्पष्ट वर्णिले जाते. ३ सहज. ४ विस्तृत ५ पुढील अध्यायांत ६ गा