पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी म्हणोनि आधीचि बोल वैहुडे । तयालागीं ।। ६९ ।। ऐसी ब्रह्मींची स्थिति । जे सकळां गतींसी गति । तया अमृतची मूर्ति । होऊनि ठाके ॥ ४७० ॥ तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांची पाणिवळें झाडिलीं । म्हणोनि उपजतखेवो बुडाली । लमघटिका ॥ ७१ ॥ आणि तदूपतेसी लम । लागोनि ठेलें अभिन्न । जैसें लोपलें अभ्रे गगन | होऊनि ठाके ।। ७२ ।। तैसें विश्व जेथें होये । मागौतें जेथ लया जाये । तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ॥ ७३ ॥ तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः । कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन४३ सम-तापसांहूनही थोर संमत ज्ञानियांहुनी । कर्मयोग्यांहुनी तस्मात् योगी तूं होय अर्जुना ॥ ४६ ॥ आर्या-अधिक तपस्व्यांहुनिही योगी ज्ञान्यांहुनी महा बाहो । आणि अधिक कर्मी हुनि यास्तव हो योगि तूं महाबाहो ४६ ओवी - तपस्वियांहून अधिक । ज्ञान्यांहूनि संमत असे एक । कर्मियांहून अधिक । यास्तव योगी होय तूं ॥ ४६ ॥ जया लाभाचिया आशा | करूनि धैर्यबाहूंचा भरवसा । घालीत पट्कर्माचा धारसा । कर्मनिष्ठ ॥ ७४ ॥ कां जिये एक वस्तूलागीं । वाणोनि ज्ञानाची वज्रांगी। जुझत प्रपंचेशी समरंगीं । ज्ञानिये गा ॥ ७५ ॥ अथवा निलागे निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा | जयाचिया ॥ ७६ ॥ जें भजतियां भज्य । याज्ञिकांचें याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदा ॥ ७७ ॥ तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाणं । जें साधकांचें कारण | सिद्ध तत्त्व ॥ ७८ ॥ म्हणोनि कर्मनिष्ठां वं । तो ज्ञानियांसि वे । तापसांचा आछु । तपोनाथु ॥ ७९ ॥ पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें भाषा मुरडून माघारी परतते. ६९ अशा प्रकारची जी ब्राह्मी स्थिति, जिला परमगति म्हणतात, त्या निराकार अवस्थेची तो मूर्तीच बनतो. ४७० त्यानें मागल्या अनेक जन्मांत विपरीतज्ञान हाच कोणी पाण्यांतला मळ तो साफ झाडून टाकला असल्यामुळे या अवस्थेजवळ जातांक्षणांच लग्नघटक पाण्यांत बुडते, ७२ आणि ब्रह्मस्थितीशीं सुलग्न होऊन, तो त्या स्थितीशीं मिसळून एकरूप होतो. ज्याप्रमाणे वितळलेले अभ्र गगनरूप होऊन जातें, ७२ त्याचप्रमाणे जेथून विश्व संभवतें व माघारें जेथें विलीन होतें तें ब्रह्मच तो, प्रस्तुतचें शरीर धारण करीत असतांही, बनून जातो. ७३ ज्या लाभाच्या आशेनें, धैर्याच्या हाताचा आधार घेऊन, कर्मकांडी लोक षट्कर्माच्या प्रवाहांत उडी घालतात, ७४ किंवा ज्या एका वस्तूसाठीं ज्ञानिजन ज्ञानाचं अभेद्य कवच चढवून संसाराबरोबर समरांगणांत दोन हात करतात, ७५ किंवा ज्याचा अभिलाष मनांत वागवून तपोनिष्ठ लोक तपांरूपी अवघड गडाचा तुटलेला, निसरडा, व दुर्गम कडा चढण्यास धडपड करितात, ७६ जें भक्तांचा भक्तिविषय व याजकांचें यज्ञदैवत आहे, एकंदरीत जे सर्वाना सर्वकाळ पूज्य आहे, ७७ तेंच परब्रह्म तो आपण स्वतः झालेला असतो; आणि ज्याअर्थी हें सिद्ध तत्त्वच सर्व साधकांचें साध्य असतें, ७८ त्याअर्थी तो कर्मनिष्ठांना वंदनीय होतो, ज्ञान्यांना ज्ञानविषय होतो, आणि तपस्व्यांना तपाची अधिदेवता होतो. ७९ ज्याच्या मनोधर्माला अशा प्रकारें जीवात्मा व १ मार्गे मुरडतो, माघारी वळतो. २ मायेच्या प्रभावाने होणारे विक्षेप म्हणजे मोक्षप्रतिबंधक कल्पनातरंग हेच घटकेतील पाण्यांतले मळ ३ परब्रह्म.