पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १९३ बुद्धि तयाची ॥ ५९ ॥ वळिये इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना । पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥ ४६० ॥ ऐसें नेणों काय अपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें । समाधि घर पुसे । मानसाचें ॥ ६१ ॥ जाणिजे योगपीठींचा भैरवे । काय हा आरंभरंभेचा गौरवु । कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रूपों आलीं ॥ ६२ ॥ हा संसार उमाणितें माप । कां अष्टांग सामग्रीचे दीप । जैसें परिमळेंचि धरिजे रूप | चंदनाचें ।। ६३ ।। तैसा संतोषाचा काय घडिला । की सिद्धिभांडारांहूनि काढिला । दिसे तेणें मानें रूढला । साधकदशे ॥ ६४ ॥ प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्विषः । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ४५ ॥ सम० - प्रयत्नें साधितां योग जाते किल्बिषवासना । अनेक जन्मीं जो सिद्ध या जन्मीं मुक्ति पावतो ॥ ४५ ॥ आर्या-यत्नें योग करी तो होतो निष्पाप स्याउपर मग ती । बहु जन्में सिद्धाला योग्याला होय जाण परम गती ॥४५॥ ओवी - ज्ञानप्रयत्न करी । पापदोप होती दुरी । मग जन्मांतरीं । मुक्ति पावे ॥ ४५ ॥ जे वशतांचिया कोडी | जन्मसहस्रांचिया आडी । लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥ ६५ ॥ म्हणोनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें । मग आयतिये वैसे राणिवे । विवेकाचिये ॥ ६६ ॥ पाठीं विचारितया वेगां । तो विवेकुही ठाके मागां । मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय ॥६७॥ तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे । आपणां आपण मुरे । आकाशही ॥ ६८ ॥ प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे । आतां गूढ रहस्यें किंवा गुरूपदेशानें ज्यांचे ज्ञान होतें अशीं सिद्धांततत्वें अचूक जाणूं लागते. ५९ त्याची प्रबळ इंद्रिये मनाच्या आहारीं येतात, मन वायूशी एकजीव होते, आणि वायु आपोआप चिदाकाशाशी समरस होऊं लागतो. ४६० अभ्यास आपण होऊनच त्याला या अवस्थेला आणितो, आणि आत्मसमाधि त्याच्या मनाच्या घराची विचारपूस करीत स्वेच्छेनेंच येते कीं काय, तें समजत नाहीं ! ६१ असा पुरुष म्हणजे जणूं काय योगस्थळाची अधिदेवता, किंवा मूळस्वरूपाची थोरवी, किंवा वैराग्यबुद्धीची प्रतीति प्रत्यक्ष मूर्तिमंत अवतरली, असे समजावे. ६२ हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचं माप, किंवा अटांगयोगाच्या साहित्याचें बेट आहे, असं वाटतें. ज्याप्रमाणें सुगंध चंदनरूप धारण करितो, ६३ त्याचप्रमाणे संतोष या पुरुषाच्या रूपानें प्रकट होतो, किंवा हा साधक दर्शत रूढावून पुढारलेला पुरुष सिद्धीच्या जामदारखान्यांतूनच आला आहे, असे भासते; म्हणजे दिसण्यांत जरी तो साधक दिसला, तरी तो मूळचा सिद्धच आहे, असे स्पष्ट भासतें. ६४ ज्याअर्थी कोट्यावधि वर्षे आणि सहस्रावधि जन्माचे आडबांधारे ओलांडून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला पोचतो, ६५ त्याअर्थी मोक्षसिद्धीची सर्वच साधनं आपोआप त्याच्या पाठीमागे लागून येतात; आणि त्यामुळे तो सहजच विवेकसाम्राज्याचा धनी होतो. ६६ नंतर त्या विवेकाचाही विचार करण्याचा वेग कुंठित होतो, आणि मग विचाराच्या कक्षेत जे येऊंच शकत नाहीं, त्या परब्रह्माशीं तो एकरूप होतो. ६७ तेथें मनावरचें अभ्र वितळून जातें, वायूचें वायूपणही नाशतें, आणि चिदाकाशही आपल्या आपल्यांतच मुरून लोपते. ६८ ज्यांत ओंकाराचाही माथा गडप होतो, असं अगाध व शब्दातीत सुख त्याला लाभतें, म्हणून त्याचें वर्णन करीत असतां आधींच १ काशीक्षेत्राचें रक्षण करणारा जसा काळभैरव, तसा योगपीठाचें रक्षण करणारा. २ साकारला, मूर्तिमंत झाला. ३ मापणारें. ४ पातंजल योगाच्या आठी अंगांचे. ५ तशा प्रकारें, ६ मुरलेला. २५