पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अथवा ज्ञानामिहोत्री । जे परब्रह्म श्रोत्री । महासुखक्षेत्रीं । आदिवंत ॥४९॥ जे सिद्धांतांचिया सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं । जे कूजती कोकिल वनीं । संतोपाच्या ॥ ५० ॥ जे विवेकद्रुमाचे मुळीं । वैसले आहाति नित्यफळीं । तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥ ५१ ॥ मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पहांट फुटे । सूर्यापुढें प्रगटे | प्रकाशु जैसा ॥ ५२ ॥ तैसी देशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येतां । वाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥ ५३ ॥ तिये सिद्धप्रज्ञेचेनि लागें । मनचि सारस्वतें दुभे । मग सकळ शास्त्रे स्वयं में | निघती मुखें ॥ ५४ ॥ ऐसें जें जन्म | जयालागीं देव सकाम । स्वर्गी ठेले जपहोम । करिती सदा ।। ५५ ।। अमरीं भाट होइजे । मग मृत्युलोकातें वानिजे । ऐसें जन्म पार्था गा जें । तें तो पावे ॥५६॥ पूर्वाभ्यासेन तेनैव व्हियते ह्यवशोऽपि सः । जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४४ ॥ सम० - त्याला तत्पूर्व अभ्यास बळें योगींच योजितो । पूर्वी तो योगजिज्ञासु तरी वेदां अतिक्रमी ॥ ४४ ॥ आर्या-त्या पूर्वाभ्यासबळें परवश तो योग मागुता मांडी । जाणों इच्छी योगचि शब्दब्रह्मासि तोचि वोलांडी ॥ ४४ ॥ ओवी - पूर्वी अभ्यासाचा घडा । म्हणोनि योग स्मरला पुढां । योगाचा विचार गाढा । वेदातें अतिक्रमी ॥ ४४ ॥ आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि । मग तेचि पुढती निरवधि | नवी लाहे ॥ ५७ ॥ तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां । मग देखे जैसीं अवळीला | पाताळधनें ॥ ५८ ॥ तैसे दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाँय । तेथ सौरसेंवीणं जाय । किंवा जे ज्ञानरूपी अग्नीची सेवा करितात, जे परब्रह्माचा उपदेश देतात, जे आत्मानंदाचे वतनदार आहेत, ४९ जे महासिद्धांताचे रहस्य जाणून त्रिभुवनाचे राजे झाले आहेत, जे संतोषाच्या वनांत पंचम स्वरानें आलाप घेणारे कोकिलच भासतात, ४५० जे विवेकवृक्षाच्या निरंतर फळ देणाऱ्या मूळाशीं बसलेले असतात, अशा योग्यांच्या कुळांत तो योगभ्रष्ट पुरुष जन्म पावतो. ५१ लहानशी त्याची मूर्ति प्रकट होते, आणि तीबरोबरच आत्मज्ञानाचा उषःकाल होतो. ज्याप्रमाणें सूर्योदय होण्यापूर्वीच त्याचा प्रकाश प्रकट होतो, ५२ त्याचप्रमाणें प्रौढ दशा येण्याच्यापूर्वीच आणि पक्व वयाची अपेक्षा न धरतां, बाळपणामध्येंच त्याच्या अंगीं सर्वज्ञता संचारते. ५३ त्या पक्क बुद्धीच्या प्राप्तीनें त्याच्या मनाला सर्व विद्यांचा प्रसाद आपाओप मिळतो, आणि मग त्याच्या तोंडांतून सर्व शास्त्रे स्वभावतः प्रकट होतात. ५४ अशा प्रकारचा जो जन्म, ज्या जन्माकरितां स्वर्गात वसणारे देवसुद्धां ध्यास घेऊन जपहोमादि आचरतात, ५५ आणि मृत्युलोकाच्या या थोर वैभवाचें भाटासारखं स्तोत्र गातात, तो जन्म, बाबा अर्जुना, त्या योगभ्रष्टाला लाभतो. ५६ नंतर मागील जन्मांत ज्या मर्यादेपर्यंत त्याची सुबुद्धि पोंचून, त्याच्या आयुष्याची दोरी तुटली होती, त्याच मर्यादेपासून पुढे अमर्याद अशी नवी सुबुद्धि त्याला प्राप्त होते. ५७ असें झालें म्हणजे जसं एकाद्या दैवशाली आणि पायाळू माणसाच्या डोळ्यांत दिव्यांजन घातलें जावें, आणि मग तो जसा जमिनीच्या खोल पोटांतील गुप्त ठेवे सहज पाहू लागतो, ५८ त्याचप्रमाणें या पुरुषाची बुद्धि १ ज्ञानरूपी अमिहोत्र ज्यांनी घेतलें आहे असे. २ मूळचे रहिवाशी ३ लहान. ४ प्रौढपणाची ५ वाङ्मय प्रसवर्ते, ग्रंथ निर्माण करते. ६ केवळ गुरूपदेशानेच ज्यांचे ज्ञान होते अशी स्थळे, ७ खटपटीवांचून.