पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा ૨૨ प्राप्य पुण्यकृताँल्लोकानुषित्वा शाश्वतीः समाः । शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१ ॥ सम० - पावोनि पुण्यलोकांतें वर्षे उमप राहुनी । शुची श्रीमंतसदन तो योगभ्रष्ट जन्मतो ॥ ४१ ॥ आर्या-जे पुण्यवंत त्यांच्या लोक चिरकाळ भोगुनी इष्ट । शुद्धा श्रीमंतांच्या सदनीं घे जन्म योगविभ्रष्ट ॥ ४१ ॥ ओवी - पुण्यश्लोक स्वर्गवासी । वर्षे बहुत स्वर्गवासी । शेवटीं श्रीमंताचे कुशी । जन्म घेणं ॥ ४१ ॥ ऐकें कवतिक हैं कैसें । जे शर्तमखा लोक सायासें । ते तो पावे अनायासें | कैवल्यका ॥ ४१ ॥ मग तेथींचे जे अमोघ । अलौकिक भोग । भोगिताही सांग | कांटाळे मन ॥ ४२ ॥ हा अंतरायो अवचितां । कां वोडवला श्रीभगवंता । ऐसा दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥ ४३ ॥ पाठीं जन्मे संसारीं । परी सकळ धर्माचिया माहेरी । लांब उगवे आगरीं । विभवश्रियेचां ॥ ४४॥ जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टी ॥ ४५ ॥ वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु । सारासारविचारू | मंत्री जया ॥ ४६ ॥ जयाच्या कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ॥ ४७ ॥ ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडीं । योगच्युतु ॥ ४८ ॥ अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् । एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥ ४९ ॥ तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्। यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३ ॥ सम॰—योगीयांचेच अथवा कुळ होतो भल्यांचिया । हा जन्म दुर्लभ बहु या लोकीं जो असे रिती ॥ ४२ ॥ त्या देहीं पूर्वदेहींचा बुद्धिसंयोग पावतो । मोक्ष मग बहू यत्न करितो कुरुनंदना ॥ ४३ ॥ आर्या — अथवा मतिमंतांच्या योग्यांच्या जन्म घे कुलोत्तंसीं । ऐसें अति दुर्लभ हैं या लोकीं जन्म जाण सद्वंशीं ॥ ४२ ॥ तेथे जन्मांतरिंचा पावे संयोग योगबुद्धीचा | योगी तो कौंतेया पुनरपि करितो प्रयत्न सिद्धीचा ॥ ४३ ॥ ओंष्या-योगियाचे कुळीं जन्मोन । आपुल्या पुण्येंकरून । लोकीं दुर्लभ होऊन । या लोकीं हे रीती ॥ ४२ ॥ तया जन्मीं पूर्वदेहबुद्धी । तो मोक्षप्रयत्न करी बोध । ज्ञानाध्यासबळें सिद्धी । साधी हे कुरुनंदना ॥ ४३ ॥ अशा पुरुषाचा चमत्कार ऐक. जे लोक साधण्याकरितां इंद्राला अनेक कष्ट करावे लागतात, ते तो मुमुक्षु अनायासानें मिळवितो. ४१ मग त्या त्या लोकांतील जे अवीट व दिव्य भोग असतील, ते सर्व भोगतां भोगतां त्याचें मन कंटाळून जातें. ४२ ते भोग भोगीत असतां, तो मनांत त्यांचा तिट्कारा करून म्हणत असतो, 'हाय, रे भगवंता, हें नसतें विघ्न माझ्या पाठीशीं कशाला लागलें आहे !' ४३ नंतर तो मृत्युलोकीं जन्म घेतो; पण अत्यंत धर्मशील अशा कुळांत जन्मून, जसा कापलेल्या पिकाच्या चुडांतून लांब अंकुर फुटावा, तसा तो ऐश्वर्याचा कोंभ जोरानें वाढतो. ४४ जो नेहमीं नीतिमार्गानें वागतो, सत्य वचन बोलतो, प्रत्येक गोष्ट शास्त्रदृष्टीने पाहतो, ४५ वेद हेंच ज्याचें जागतें दैवत, स्वधर्म हाच ज्याचा आचार, सारासारविचार हाच ज्याचा सल्लागार, ४६ ज्याच्या कुळांत ईश्वरावांचून दुसरा चिंतनाचा विषयच नसतो, आणि ज्याला आपल्या कुळांतील ' पूज्य दैवतें हीं सर्व ऐश्वर्य संपत्ति वाटतात, ४७ अशा प्रकारें आपल्या पुण्याची जोड लाभून आणि सर्व सुखाची वाढती संपत्ति भोगून, तो योगभ्रष्ट पुरुष त्या जन्मांत सुखी होतो. ४८ १ शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्राला २ कापलेल्या शेताच्या चुडातून फुटणारे कोंब. ३ जिंदगी.