पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० सार्थ श्रीज्ञानेश्वरी कवण एकु मोक्षपदा । झोंबत होता श्रद्धा । उपायेंविण ॥ ३१ ॥ इंद्रियग्रामोनि निगाला । आस्थेचिया वाटा लागला । आत्मसिद्धीचिया पुढिला । नगरा यावया ॥ ३२ ॥ तंव आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि । ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥ ३३ ॥ जैसें अकाळीं आभाळ | अळुमाळु सपातळ । विपायें आलें केवळ | वैसे ना वर्षे ॥ ३४ ॥ तैस दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ति तंव अलग ठेली । आणि अप्राप्तिही सांडवली | श्रद्धा तया ॥ ३५ ॥ ऐसा दोंलां अंतरला कां जी । जो श्रद्धेच्याचि समाजीं । बुडाला तया हो जी । कवण गति ॥ ३६ ॥ श्रीभगवानुवाच- पार्थ नैवह चामुत्र विनाशस्तस्य विद्यते । न हि कल्याणकृत्कश्चिद्दर्गतिं तात गच्छति ॥ ४० ॥ सम०-पार्था न येर्थे न स्वर्गी त्याचा नाश घडे कधीं । कल्याणमागीं या कोणी बापा जाय न दुर्गती ॥ ४० ॥ आर्या - इहलोकी परलोकीं नाश तयाचा कधीं नसे बापा । सुकृताचारें कोणी दुर्गति न पवे तसाचि संतापा ॥४०॥ ओंवी — देव म्हणे योगाभ्यासीं नाहीं । ऐसें कवणासी घडलें नाहीं । मोक्षमार्गी चालतां कांहीं । दुर्गती न जाय ॥४०॥ तंव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखी आस्था । तया मोक्षावांचूनि अन्यथा । गति आहे गा ॥ ३७ ॥ परि एतुलें हेंचि एक घडे । जें माझारीं विसवावें पडे । तेंही परि ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥ ३८ ॥ एन्हवीं अभ्यासाचां उचलतां । पाउलीं जरी चालता । तरि दिवसांआधीं ठाकिता | सोहंसिद्धीतें ॥ ३९ ॥ परि तेतुला वेग नव्हेचि । म्हणऊनि विसांवा तरी निकाचि । पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥ ४४० ॥ समाधान करा. समजा, कोणीएक पुरुष मोठ्या श्रद्धेनें, पण योगसाधनाचा उपाय न जाणतां, मोक्षपदाला गांठण्याकरितां झहूं लागला. ३१ इंद्रियांचा गांव टाकून, तो पुढें दूर असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणाला पोंचण्याच्या उद्देशानें श्रद्धेच्या मार्गाला लागला. ३२ परंतु आत्मस्वरूप तर गांठत नाहीं आणि मार्गे तर फिरवत नाहीं, या रीतीनें मधल्या मध्येच ताटकळत त्याच्या आयुष्याचा सूर्य मावळला. ३३ ज्याप्रमाणे सहज अकाळीं आलेला ढगाचा हलका पातळ पापुद्रा ध ठरत नाहीं, आणि वर्षावही करीत नाहीं, ३४ त्याचप्रमाणे त्या पुरुषालाही दोन्ही गोष्टी अंतरतात, कारण, आत्मस्वरूपाची प्राप्ति तर दूरच राहिली, आणि श्रद्धाबळानंच सोडलेल्या इंद्रियसुखालाही तो मुकलाच ! ३५ अशा रीतीनें श्रद्धेच्या नादी लागून जो दोहींकडे अंतरला, त्याला कोणती गति प्राप्त होते ? " ३६ तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, “ पार्था, ज्याला मोक्षसुखाविषयीं श्रद्धा आहे, त्याला मोक्षावांचून कोणती गति असणार ? ३७ परंतु या स्थितीत एक गोष्ट घडून येते, ती हीच, कीं, त्याला मध्यंतरीं कुचवावें लागतें, पण या कुचंबणींतही असें सुख आहे, कीं तें सुख देवांनाही लाभत नाहीं. ३८ परंतु तोच पुरुष जर अभ्यासाच्या उठत्या पावलानें मार्ग आक्रमीत गेला असता, तर आयुष्यभानु मावळण्यापूर्वीच दिवसाउजेडी सोहंसिद्धीच्या स्थळाला जाऊन पोचला असता. ३९ परंतु त्याच्या अंगीं तितका वेग नसल्यामुळे, जरा रेंगाळणी होणें साहजिकच आहे, पण तसें झालें तरी अखेरीला मोक्ष हा त्याच्या वांट्याला आंखलेलाच असतो. ४४० १ अकस्मात् २ टिकतें. ३ दोहोला. ४ थांबावे, अटकून राहावें. ५ आयुष्याचा दिवस मावळण्यापूर्वी.