पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा ૨૮૧ तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगें ॥ २३ ॥ म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभी मग नोहे । कैसा पाहीं ॥ २४ ॥ तरी योगसाधन जितुकें । तें अवघेंचि काय लटिकें । परि आपणपयां अभ्यासूं न ठाके । हेंचि म्हण ॥ २५ ॥ आंगीं योगाचें होय वळ | तरि मन केतुलें चपळ । काय महदादि हैं सकळ । आपु नोहे ॥ २६ ॥ तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके । साचचि योगवळेंसीं न तुके । मनोवळ ॥ २७ ॥ तरि तोचि योगु कैसा विं जाणों । आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणों । म्हणोनि मनातें जी म्हणों | अनावर || २८ || हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा । योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥२९॥ अर्जुन उवाच - अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७॥ कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । अप्रतिम्रो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ३८ ॥ एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः । त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ३९ ॥ सम० - निष्ठा असोनि अळसी मन योगांतुनी चळे । न मोक्ष पावतां कृष्ण जाय कोणे गतिप्रती ॥ ३७ ॥ तो काय उभयभ्रष्ट मेघाचें जेविं थीगळ । अपक्क पावला मोह ब्रह्ममार्गी महाभुजा ॥ ३८ ॥ निःशेष या संशयार्ते कृष्णा छेदिसि एक तूं । या संशयाचा संहर्ता न दिसे तुजवांचुनी ॥ ३९ ॥ आर्या- शिथिल श्रद्धा असतां ज्याचे योगांतुनीहि मन चळतें । पावुनि न योग सिद्धिस कोण गती व्यास है न मज कळते ३७ जो अप्रतिष्ठ कृष्णा ब्रह्मपथामाजिं मूढ न समाय । होउनि उभयभ्रष्ट च्छिन्नाभ्रापरि विरे न कीं काय ॥ ३८ ॥ या माझ्या संदेहा कृष्णा तूंची समर्थ वाराया । तुजवीण संशयाचा छेत्ता कोणी न यादवा राया ॥ ३९ ॥ व्या-पार्थ म्हणे कृष्णनाथा । भक्तियुक्त होवोनि प्रयत्न करितां । योगी चळोनि सिद्धि न पावतां । कोण गती पावे ॥३७॥ मूढपर्णे न पावतां । उभयभ्रष्ट तो तत्वतां । याची गती विचारितां । भासे जैसें अभ्र दिसे वितळे ॥ ३८ ॥ पार्थ म्हणे कृष्णा । हा संशय छेदेना । तुजवांचूनि दीनजना । न दिसे संशयपरिहरिता ॥ ३९ ॥ परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया । तो तूंवांचूनि फेडावया । समर्थ नाहीं ॥ ४३० ॥ म्हणोनि सांगें श्रीगोविंदा | 6 आणि या मनाला कधीही नियमनाची कैची घातली नाहीं, तर मग हें मन कां म्हणून निश्चळ होईल ? २३ म्हणून, ज्यायोगाने मनाचें नियमन घडेल, अशा साधनाला आधीं आरंभ कर, आणि मग पाहूं हें मन कसें तुझ्या आहारीं येत नाहीं तें ! २४ अरे, जर मन आहारीं येणारच नाहीं असें तूं म्हणशील, तर योगसाधन जें म्हणतात, तें काय सर्व खोटेंच आहे ? तें खोटें नाहीं; म्हणून मला अभ्यास साधत नाहीं, ' इतकेंच फार तर तूं म्हणावेंस. २५ अरे योगाचं सामर्थ्य अंगीं आलें तर या मनाच्या चंचळपणाची काय कथा आहे ? त्या सामर्थ्यानें महातत्त्वादि सर्वच मुठींत येत नाहीं का ?" २६ तेव्हां अर्जुन म्हणाला, “ देवा, तुम्ही बोलतां तें योग्य आहे; खरोखरच योगसामर्थ्यापुढें या मनाच्या बळाची मात्रा चालणार नाहीं. २७ पण हा योग कसा साधावा, याची आम्हांस इतके दिवस वार्ताही नव्हती, म्हणून तर आम्हीं या अनावर मनाचे अंकित होऊन राहिलों आहों. २८ या साऱ्या जन्मांत, श्रीकृष्णा, आज तुमच्या कृपेनेंच आम्हांला या योगाचें ज्ञान झाले आहे. २९ परंतु, हे गुरुराजा, माझ्या मनांत सहज एक शंका उद्भवली आहे, आणि तिचें समाधान करण्याला तुमच्यावांचून दुसरा कोणीही समर्थ नाहीं. ४३० म्हणून, हे श्रीगोविंदा, माझ्या शंकेचें १ साधते. २ गुरुमहाराज.