पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा ॥ १५ ॥ जें निरोधिलें घे उवावो । जया संयमुचि होय सावव । तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ॥ १६ ॥ म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांस साम्य येईल । हें विशेपेंही न घडेल । याचिलागीं ॥ १७ ॥ श्रीभगवानुवाच — असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ३५ ॥ सम॰—खरेंच हॅ महाबाहो मन चंचल दुर्जय । अभ्यासे आणि वैराग्यें तरी तें जिंकिजे तसें ॥ ३५ ॥ आर्या - चंचल धरवेना जें निःसंशय मन बहुत तापड तें । पार्था अभ्यासानें वैराग्याने परंतु सांपडतें ॥ ३५ ॥ ओंवी - खरेंचि सांगतों अर्जुना । मन चंचल आवरेना । अभ्यासवैराग्ये जाणा । जिंकिलें जातें ॥ ३५ ॥ तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि । यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥ १८ ॥ परि वैराग्याचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरें । तरि केतुलेनि एकें अवसरें । स्थिरावेल ॥ १९ ॥ कां जें यया मनाचें एक निकेँ । जें देखिले गोडीचिया ठाया सोर्के । म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें | दावीत जाइजे ॥ ४२० ॥ असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६ ॥ सम० - माझी हे बुद्धि कीं योग नव्हे जो मन नावरे । प्रयत्नशीळे स्ववरों तो पाव शकिजे मनें ॥ ३६ ॥ आर्या-वाटे मम मतिला जो अजितात्मा यासि योग दुष्प्राप । वश्यात्मा यरन करी पावाया शक्य त्यासि निष्पाप ॥ ३६ ॥ ओंवी – ज्याचें अंतःकरण स्थिर नाहीं । तो दुःखैकरूनि योगासि न पवे कांहीं । ज्यास आत्मा वश्य झाला पाहीं। तो उपायें योगासी पावे सत्य ॥ ३६ ॥ एहवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं । तयां ना कळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥ २१ ॥ परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विपयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥ २२ ॥ यया जालिया मानसा कहीं । युक्तीची कांवी लागली नाहीं । पाडतें, संतापालाही वासनेचा डाग लावतें, स्वस्थ बसावें असें वाटलें तरीही दाही दिशांना हिंडवतें, १५ जें दावलें असतांही जोराने उसळतें, निग्रह करण्याचा प्रयत्नच ज्याचा आवेश वाढवण्यास कारण होतो, तें हें मन आपला चंचल स्वभाव कसा बरें सोडील ? १६ म्हणून आमचें मन स्थिर होईल, आणि मग आम्ही साम्यावस्थेला पोचूं, हें बहुशां कधींच घडून येणार नाहीं " १७ यावर श्रीकृष्ण म्हणाले, “ अर्जुना, तूं म्हणतोस तें अगदीं खरें आहे. तें मन असेंच आहे. अरे, चंचळपणा हा या मनाचा स्वभावच आहे. १८ पण वैराग्याचा टेंका घेऊन, जर याला योगाभ्यासाच्या मार्गास लाविलें, तर कांहीं काळानें तें स्थिर होईल. १९ याचें कारण असें आहे, कीं, या मनाची एक अशी चांगली खोड आहे, कीं, यानें ज्याची गोडी चाखली, त्याची याला चट लागते; म्हणून याला कोडा कौतुकानें आत्मसुखाची गोडी लावावी. ४२० सामान्यतः जे विरक्त नाहींत व जे अभ्यासाचा प्रयत्न करीत नाहींत त्यांना हें मन आवरतां येत नाहीं, हें आम्हांलाही मान्य आहे. २१ परंतु जर यमनियमांच्या वाटेने आपण कधींच गेलां नाहीं, वैराग्याची कधीं आठवणही केली नाहीं, नुसते विषयसमुद्रांत बुडी देऊनच राहिलों, २२ १ उसळी, उडी. २ सोबती, मदतगार, ३ मार्गानें, ४ सवकतें ५ निग्रहाच्या चिवाटीत मन सांपडलें नाहीं.