पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १८७ जया त्रैलोक्यचि आघवें । मी ऐसें स्वभावें । वोधा आलें ॥ ७ ॥ तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती । परी आम्हांतें ऐसी प्रतीति । परब्रह्मचि हा ॥ ८ ॥ म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होइजे । ऐसें साम्यचि एक उपासिजे | पांडवा गा ॥ ९ ॥ हें तूतें बहुत प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं । जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ॥ ४१० ॥ अर्जुन उवाच- योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन । एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम्॥३३॥ चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ३४ ॥ सम० - जो योग हा बोलिलासी साम्यें श्लोकचतुष्टयें । त्याच्या स्थितीतें स्थिर मी न देखें मधुसूदना ॥ ३३ ॥ कीं कृष्णा चंचळ मन इंद्रियें जें मथी बळी । त्याचा निग्रह वाऱ्याची मोट जैसी न बांधवे ॥ ३४ ॥ आर्या- जो योग तुवां कथिला साम्यें जेणें घडे सदा स्वरती । परि त्या चंचलतेस्तव त्याची न दिसे मला स्थिती स्थिर ती ३३ चंचल है मन कृष्ण प्रमाथि दृढ सबळ विषय शुष्कर सें । वंची त्याचे भासे धारण वायूसमान दुष्करसें ॥ ३४ ॥ ओव्या-पार्थ म्हणे योग सांगितला । देवा नाहीं तो भ्यां पाहिला । चंचळ मन याला । निग्रह केंवि घडे ॥ ३३ ॥ मन चंचल बहु कृष्ण। इंद्रियांहूनि बळकट गहन। वायूचे परी जाय घेवोन । त्याचा निग्रह दुष्कर असे ॥ ३४ ॥ तंव अर्जुन म्हणे देवा | तुम्ही सांगा कीर आमुचिया कणैवा । परि न पुरों जी स्वभावा । मनाचिया || ११ || हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे । एन्हवीं राहांटावया थोडें । त्रैलोक्य राया ॥ १२ ॥ म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जें मर्कट समाधी येईल । कां राहा म्हणतलिया राहेल । महावातु ॥ १३ ॥ जें बुद्धीतें सळी | निश्चयातें टाळी । धैर्येसीं होतफळी । मिळऊनि जाय ॥ १४ ॥ जें विवेकातें भुलवी । संतोपासी चार्डे लावी । हे सर्व त्रैलोक्यच ज्याच्या बुद्धीला आत्मस्वरूप दिसून आलें आहे, ७ त्या पुरुषालाही शरीर असतेंच, आणि लोकव्यवहारांत त्याला प्रसंगानुसार सुखी अगर दुःखी म्हणण्यांत येतें, परंतु आमचा अनुभव असा आहे, कीं, असला पुरुष खरोखरीच ब्रह्मस्वरूपच असतो. ८ म्हणून, अर्जुना, अशा प्रकारचें साम्य आपण अंगीं मुरवावें, कीं, आपणा स्वतःत आपण विश्व पाहावें, आणि आपण विश्वरूप होऊन जावें. ९ हें आम्ही तुला वारंवार सांगत आहों याचा हेतु हाच, कीं, या साम्यापलीकडे जगांत मिळविण्याचें असें कांहींच नाहीं. हेंच परमश्रेष्ठ साध्य होय. " ४१० (6 तेव्हां अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही आमच्याविषयीं कळकळ वाटून हें सर्व सांगत आहां. परंतु हे मन स्वभावतः असें आहे, कीं, आम्ही याला पुरे पडूं शकत नाहीं. ११ हें मन कसें व केवढें आहे, हें पाहूं लागलों, तर पत्ताच लागत नाहीं. सामान्यतः याला वावर करण्याला हें त्रैलोक्यही थोडेंच होतें. १२ मग मनाचा आटोप कसा घडणार ? माकड कधीं शांत राहील का ? ' स्वस्थ रहा,' असे म्हटल्यानें वादळी वारा कधीं स्तब्ध राहतो का ? १३ जें मन बुद्धीचा छळ मांडतें, निश्चयाला डळमळवून टाकतें, धैर्याच्या हातावर हात देऊन निसटून जातें, १४ जें विवेकाला भूल १ रु. २ व्यवहार करण्यास. ३ हातावर हात मारून, हातोहात. ४ नादी लावतें.