पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः । सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ३१ ॥ सम - सर्वभूतस्थ त्या मातें भजे धरुनि एकता । मजमध्येच तो योगी प्रपंचीं जरि सर्वथा ॥ ३१ ॥ आर्या-सव भूर्ती मज जो एकवें भजत परम उद्योगी । आसोनी विश्वांतहि माझ्या ठाय असेचि सद्योगी ॥ ३१॥ ओवी - सर्वभूतीं जो आत्मस्वं भजत । तो सर्वथा संसारीं नाहीं वर्तत । मजवेगळे नाहीं होत । तोचि मी असे ॥३१॥ जेणें ऐक्याचिये दिली । सर्वत्र मातेंचि किरीटी । देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥ ९८ ॥ कां स्वरूपें तरी बहुतें आहाती । परी तैसीं सोनीं बहुवें न होती । ऐसी ऐक्याचळाची स्थिति । केली जेणें ॥ ९९ ॥ ना तरी वृक्षांची पानें जेतुलीं । तेतुली रोपें नाहीं लाविलीं । ऐसी अद्वैतदिवसें पोहाली । रात्री जया ॥ ४०० ॥ तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पां कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पांडें । मजसीं तुके ॥ १ ॥ माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें । तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला ॥ २ ॥ आतां शरीरीं तरी आहे । परी शरीराचा तो नोहे । ऐसें बोलवरी होये । तें करूं काई ॥ ३॥ आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन । सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ३२ ॥ सम०—सर्वभूर्ती स्वदृष्टांतें जो पाहे सम अर्जुना । सुखदुःखासही योगी तो थोर मज संमत ॥ ३२ आर्या - स्वानुभवें सुखदुःखीं ज्याची सर्वत्र दृष्टि सामान्य । परमश्रेष्ठ महात्मा पार्था योगी न तो कसा मान्य ॥३२॥ ओवी - आपले सुख दुःख सर्वत्र । जे देखती जीवमात्र । ते योगी परम पवित्र । ते थोर मम संमत ॥ ३२ ॥ म्हणोनि असो तें विशेखें । आपणपेंयासारिखें । तो चराचर देखे । अखंडित ॥ ४॥ सुखदुःखादि वर्मै । कां शुभाशुभ कर्मों । दोनी ऐसी मनोधर्मै । नेणेचि जो ॥ ५ ॥ हे समविषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व । तें मानी जैसे अवयव । आपुले होती ॥ ६ ॥ हें एकैक काय सांगावें । वस्त्रांत जसा तंतु, तसाच एकात्मतेच्या दृष्टीनें जो मला सर्वाभूतीं पाहातो, ९८ किंवा दागिने जरी बहुरूपी असले, तरी त्यांचे अधिप्रान जें सोनें तें एकरूपच असतें, या न्यायानें ज्याची स्थिति ऐक्यभावानें स्थिर झाली आहे, ९९ किंवा, झाडाचीं जेवढीं पानें दिसतात, तेवढीं मूळचीं लावलेलीं रोपे नसतात, तर पानें अनेक दिसलीं, तरी मूळ झाड एकच असतें, अशा प्रकारच्या अद्वैताच्या सूर्योदयानें ज्याची अज्ञानरात्रि निवळून गेली आहे, ४०० तो जरी या पंचमहाभूतात्मक शरीरांत सांपडला, तरी त्यांत अडकून कसा जाईल ? तो अनुभवाच्या थोरवीनं माझ्याशीं समतोल ठरतो. १ त्याला आत्मानुभवानं माझंच व्यापकपण सांपडतें, मग जरी तोंडाने हें सांगितलें नाहीं, तरी स्वभावतःच तो विश्वव्यापक होतो. २ आतां तो जरी शरीरधारी असला, तरी शरीराचा अभिमानी नसतो, ही गोष्ट शब्दांनीं स्पष्ट करून सांगणे शक्य असतें तर तसें करण्यांत आलें असतें. ३ म्हणून याचा पाल्हाळ नको. जो आपल्याचसारखें स्थावरजंगम विश्वाला पाहातो, ४ ज्याच्या मनाला सुखदुःखादि भावना किंवा शुभाशुभ कर्मों यांची भेदभावानें जाणीव होत नाहीं, ५ सम, विषम आणि विचित्र, असं सर्व वस्तुमात्र, जो आपल्या अवयवासारखं मानितो, ६ किंबहुना १ उजाडली, उजळली. २ प्रमाणे, मानानें,