पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा ૮૧ सामरस्याचिया राउळीं । महासुखाची दिवाळी | जगेंसि दिसे ॥ ८९ ॥ ऐसें आपले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकं ॥ ३९० ॥ सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ २९ ॥ यो मां पश्यति सर्वत्र सर्व च मयि पश्यति । तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ३० ॥ सम० – सर्व भूतांमधें आत्मा भूतें तीं आत्मयामधें । नित्य योग चित्त असे तो पाहे समदर्शनी ॥ २९ ॥ मातें सर्वत्र जो पाहे पाहे सर्व मदंतरीं । मी त्याचा त्यास सोडीना तो माझा सोडिना मला ॥ ३० ॥ आर्या - भात्म्यामार्जी भूर्ते पाहे भूतांत आत्मयास महा । दृढयोगयुक्त आरमा ज्याचा तो पाहणार जग सम हा ॥ २९ ॥ पाहे सर्वत्र मला माझ्या ठायींहि सर्व लोकांस । माझा त्यासीं मजसीं त्याचा न विनाश एकएकास ॥ ३० ॥ ओवी - आत्म सर्व भूतें देखे । सर्वारमा आपण कौतुकें । योगयुक्त आत्मा देखे । सर्वत्र समान तथा ॥ २९ ॥ मज सर्वांठाय ओळखे । मी सर्वत्र त्यास देखें । माझे निमित्ते सुखें । मी त्याचा तो माझा पैं ॥ ३० ॥ तर मी तंव सकळ देहीं । असें एथ विचारू नाहीं । आणि तैसेंचि माझ्या ठायीं । सकळ असे ॥ ९१ ॥ हें ऐसेंचि संचैलें । परस्परें मिसळलें । बुद्धि घेपे ऐतुलें । होआवें गा ॥ ९२ ॥ एन्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना । सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ॥ ९३ ॥ भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें । केवळ एकत्वचि माझें जाणें । सर्वत्र जो ॥ ९४ ॥ मग तो एक हा मियां । वोलतां दिसतसे वायां । एन्हवीं न बोलिजे तरि धनंजया । तो मीचि आहें ।। ९५ ।। दीपा आणि प्रकाशा । rhiकीचा पाडु जैसा । तो माझ्या ठायीं तैसा । मी तयामाजीं ॥ ९६ ॥ जैसा उदकाचेनि आयुष्ये रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु । तैसा माझेनि रूपें रूपसु । पुरुपु तो गा ॥ ९७ ॥ तसेंच मनही त्या भेटींत समरसत्वाच्या मंदिरांत जगासह सुखाची दिवाळी करीत राहातें. ८९ अशा प्रकारें आपल्याच पायांनी आपल्या मूळस्वरूपाकडे उलट मागें चालत गेलें पाहिजे. पण हाही मार्ग तुला गांठत नसेल, तर दुसरें एक साधन ऐक. ३९० मीच सर्व देहांत आहे, या तत्त्वाविषयीं भ्रांति नाहीं; आणि तसेंच माझ्या ठिकाणीं है सर्व विश्व आहे. ९१ अशा प्रकारें एकवटून विश्व व आपण मिसळलेले आहों, असें आपली बुद्धि समजेल, इतकी तयारी करावी. ९२ खरें म्हटलें तर, अर्जुना, जो ऐक्यभावनेनें मला सर्व भूतांत समत्वानें पाहून भजतो, ९३ भूतमात्राच्या दिखाऊ भेदानें ज्याच्या अंतःकरणांत भेदभाव संभवत नाहीं, जो सर्वत्र माझें एकस्वरूपच पाहतो, ९४ तो पुरुष हाच मी आहें ही भाषाच निरर्थक होते. बाकी, मी जरी बोललों नाहीं, तरी, अर्जुना, तो पुरुष म्हणजे मीच. ९५ दिवा आणि प्रकाश, यांच्यामध्यें ज्या तऱ्हेचा एकभाव असतो, तसाच तो माझ्या ठिकाणीं असतो, आणि मीही त्याच्या ठिकाणी असतों. ९६ जसा उदकाच्या अस्तित्वानें रस असतो, किंवा गगनाच्या मापानें पोकळी असते, तसाच माझ्या रूपानें तो पुरुष साकार राहातो. ९७ १ वाड्यांत २ रेलचेल, ३ जुळलेले, ४ बुद्धीला घेता येईल एवढे ५ एकात्मतेचा, सारूप्याचा. ६ रूपवान. २४