पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी हें न ठेके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥ ७९ ॥ आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया वोला । वाहिरा नोहे ॥ ३८० ॥ जरी येतुलेनि चित्त स्थिरावे तरी काजा आलें स्वभावें । नाहीं तरी घालावें । मोकलुनी ॥ ८१ ॥ मग मोकलिलें जेथ जाईल । तेथूनि नियमृचि घेऊनि येईल | ऐसेनि स्थैर्यचि होईल । सावियांचि कीं ॥ ८२ ॥ I प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् । उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ २७ ॥ सम० - ऐशा प्रशांतचित्तातें योग्यातें सुख उत्तम । साधे रजतमातीत ब्रह्मरूप अकर्मक ॥। २७ ॥ आर्या - शांतारमा निष्पाप ब्रह्मीं कांहीं असे न अंतर ज्या । उत्तम सुख वरितें त्या जो हा योगी अखंड शांत रजा ॥२७॥ भवी—अंतःकरण ज्याचें शांत । त्या योगिया सुख अत्यंत । रजोगुणें मुक्त ब्रह्मभूत । ऐशिया प्रशांती ॥ २७ ॥ पाठीं केतुलेनि एके वेळे । तया स्थैर्याचेनि मेळें । आत्मस्वरूपाजवळें । येईल सहजें ।। ८३ ।। तयातें देखोनि आंग घडेलें । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥ ८४ ॥ आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे । तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥ ८५ ॥ तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये । ऐसी प्राप्ति सुखोपायें | आहे येणें ॥८६॥ युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः । सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ २८ ॥ सम० - योजी ऐसा सदा चित्त योगी ज्यास न वासना । ब्रह्मस्पर्शे अनायासें अत्यंत सुख भोगितो ॥ २८ ॥ आर्या - एवं संतत योगी योजी निष्पाप जो मना यास । ब्रह्मस्पर्शसुखातें पावे अत्यंत तो अनायास ॥ २८ ॥ ओवी - सदा आत्मचिंतन करितां । योगी किल्बिषे जिंती तत्वतां । सुखेचि ब्रह्मीं सायुज्यता । अनंत सुख पावतो ॥२८॥ या सोपिया योगस्थिती | उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥ ८७ ॥ ते सुखाचेनि सांगातें । आले परब्रह्मा आंतते । तें लवण जैसें जळातें । सांडूं नेणे ॥ ८८ ॥ तैसें होय तिये मेळीं । मग आपण मनापासून असा पण जर असें मन हा प्रकारही तुला साधत नसेल तर दुसराही सोपा मार्ग आहे, तो ऐक. ७९ एकच नियम करावा, कीं, केलेल्या निश्चयाच्या बोलाबाहेर पाऊलही पडणार नाहीं. ३८० जर एवढ्या नियमानें मन स्थिर झालें, तर तें आपल्या कामी पडलें म्हणून समजावें, स्थिर राहात नाहीं असें झाले, तर त्याला अगदीं मोकाट सोडून द्यावें. ८१ मग अशा रीतीनें उनाड सोडलेलें मन जेथें जाईल, तेथून त्याचे नियमन करून त्याला परतून आणावें, म्हणजे त्याला हळूहळू स्थिरपणाची संवय लांगेल. ८२ नंतर केव्हांतरी एकदा त्या स्थिरपणाच्या साह्यानें मन आपसूक आत्मस्वरूपाजवळ येऊन ठेपेल. ८३ मग त्या आत्मस्वरूपाला पाहून, तें त्याच्याशीं झगटेल, तेव्हां द्वैताला अद्वैतांत समाधि मिळेल, आणि या ऐक्याच्या प्रभावानं सर्व त्रैलोक्य उजळून जाईल. ८४ आकाशांत आकाशाहून भिन्न भासणारं अभ्र दिसतें, पण तें अभ्र जेव्हां विरून जाते, तेव्हां जसें केवट सर्वव्यापी आकाशच मागें राहतं, ८५ त्याचप्रमाणे चित्ताचा लय होतो, आणि सर्व कांहीं चैतन्यच होऊन राहते; अशा रीतीची फळप्राप्ति या सोप्या मार्गानं घडते. ८६ या सोप्या योगावस्थेने अनेकांनी, संकल्पाची संपत्ति टाकून, मोक्षाचें दर्शन मिळविलें आहे. ८७ मन सुखाच्या संगतीनं परब्रह्माच्या आंत येऊन ठेपलें, म्हणजे जसे मीठ पाण्याला सोडीत नाहीं. ८८. १ साधेल, २ सुलभ. ३ सहजच. ४ अंगास चिकटेल.