पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १८३ तं विद्याद्दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् । स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३ ॥ सम० - दुःखसंयोगवृत्तीचा तद्वियोगांत आयता । चित्तात्मयोग तो यत्नं साधावा दृढनिश्चयें ॥ २३ ॥ आय - दुःखाचा लेश नसे ज्यांतहि तो योग पांडवा जाण । सुविरक्तें योजावा निःसंशय हाचि योग निर्वाण ॥ २३॥ ओंवी — जेथें दुःखसंबंध नाहीं । तोचि योग जाणावा निश्चित पाहीं । वैराग्ययुक्त अंतःकरण करूनि राहीं। योगाभ्यासीं २३ जया सुखाचिया गोडी । मन आतींची सेचि ' सोडी | संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ॥ ७२ ॥ जें योगाची वरव । संतोपाची राणिवं । ज्ञानाची जाणीव | जयालागीं ।। ७३ ।। तें अभ्यासिलेनि योगें । सावयव देखावें लागे । देखिलें तरी आंगें । होइजेल गा ॥ ७४ ॥ संकल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः । मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४ ॥ सम० - संकल्प करितां झाले काम ते सर्व टाकुनी । मनेंचि इंद्रियग्राम दंडूनि सकळां स्थळीं ॥ २४ ॥ आर्या-संकल्प जे उठती पार्था ते सर्व काम सांडावे । सर्वत्र इंद्रियांचा चित्तें गण दमुनि योग मांडावे ॥ २४ ॥ ओंवी — संकल्पमात्रेंचि झाले । काम ते सर्व टाकिले । मनें इंद्रियग्राम धरिले | दंडूनियां सर्वत्र ॥ २४ ॥ तरि तोचि योगु बापा। एके परी आहे सोपा । जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥७५॥ हा विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमा चिया धारणी देखे । तरी हियँ घालूनि मुके । जीवित्वासी ॥ ७६ ॥ ऐसें वैराग्य हैं करी | तरी संकल्पाची सैरे वारी । सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धि नांदे ॥ ७७ ॥ शनैः शनैरुपरमेद्बुद्धया धृतिगृहीतया । आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् ॥ २५ ॥ यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् । ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६ ॥ सम० - धारणायुक्त बुद्धीनें व्हावें स्थिर हळूहळू । योजूनि चित्त चिन्मात्रीं कांहीं चिंतूं नये मग ॥ २५ ॥ ज्या ज्या पदार्थी निघतें मन चंचल अस्थिर । तेथें तेथेंचि आत्मा हा करावें वश त्यांत तें ॥ २६ ॥ आर्या — धैर्ये वळवुनि मतिला हळूहळू उपरतीस जिंकावें । ब्रह्मीं स्थिर मन करुनी कांहीं मग पांडवा न चिंता २५ चंचळ मन अस्थिर हें ज्या ज्या विषयाकडेचि बा धांवे । त्या त्यापासुनि आणुनि सुतेँ हृदयीं हळूच बांधावें ॥२६॥ ओंग्या - बुद्धि करूनि धारणेनें । हळुहळु स्थिर करीं मन । चिन्मात्रीं योजीं चित्तालागून । मग कांहीं चिंतूं नये ॥२५॥ मन चंचल नाहीं स्थिर । धांवे सैराट न धरी धीर । तया आंवरोनि विचार । राहें आत्मतवीं ॥ २६ ॥ बुद्धि धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा | हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥ ७८ ॥ याही एके परी । प्राप्ति आहे विचारी । ज्या सुखाची गोडी चाखली म्हणजे संसाराच्या जबड्यांत अडकलेलें मन वासनेची आठवणही करीत नाहीं, ७२ जें सुख योगाची शोभा व संतोषाची राजसंपत्ति आहे, ज्या सुखाकरितांच ज्ञानाचा जाणतेपणा कामी येतो, ७३ तें सुख योगाभ्यासानें मूर्तिमंत दिसूं लागतें, आणि असें त्याचें दर्शन झाले, तर आपल्या स्वतःला तद्रूप होतां येईल. ७४ अर्जुना, हा जो योग तुला कठीण वाटतो, तो एका परीने अगदीं सुलभ आहे, मात्र संकल्पाची संतति जे कामक्रोधादिक त्यांना मारून, संकल्पाला पुत्रशोक होईल, असे केलें पाहिजे. ७५ विषय ठार झाले आहेत, ही वार्ता जर या संकल्पाच्या कानी आली, आणि इंद्रियांचा पूर्ण निग्रह झाला आहे, हेंही जर त्याच्या दृष्टीस पडलें, तर तो आपली छाती कुटून प्राणत्याग करील. ७६ अशा तुम्हे वैराग्य जर मनाला प्राप्त झाले, तर ही संकल्पाची यात्रा संपेल, आणि बुद्धि मोठ्या सुखानें धैर्याच्या वाड्यांत नांडूं लागेल. ७७ बुद्धीला जर धैर्याचा लाभ झाला, तर अनुभवाच्या वाटेने ती मनाला हळूहळू चालवून अखेर परमात्ममंदिरांत आणून बसवील. ७८ तेव्हां या प्रकारानेही आत्मप्राप्ति होते, हें तूं ध्यानीं घे. १ स्मरण. २ राज्यलक्ष्मी. ३ पकडत. ४ छाती फोडून. ५ येरझारा संपतात. ६ वाज्यांत.