पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया । यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २० ॥ सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् । वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ ११ ॥ सम० - जेथे उपरमे चित्त योगमार्गे निरोधिलें । जेथें चित्तं आत्मयातें पाहे तोपे तयांतची ॥ २० ॥ तेथे अनंत सुख बुद्धिग्राह्य अतींद्रिय । जाणे त्यात मग न हा तवापासूनियां चक्रे ॥ २१ ॥ आर्या - जेथे उपरम पावे मन योगनिरुद्ध निजसुखं पुष्ट । जेथें आपण अपणां पाहुनि अपुल्याच ठायं संतुष्ट ॥ २० ॥ बुद्धि अर्तीद्वय आत्यंतिक सौख्य जे तथा जाणे । जेथें सुस्थिर होतां तवापासुन न होतसे जाणें ॥२१॥ ओव्या - चित्त नेमिलें असे । आत्मा केवळ दिसे । जेथें आत्मा वसे । संतोष पाहे ॥ २० ॥ अतिसुख जे अनुभवेंकरूनी । इंद्रियां अगोचर बुद्धिज्ञानं जाणोनी । जो स्थिर दृढ आपुले मनीं । तो न चळे कांहीं निश्चित ॥ २१ ॥ म्हणोनि आसनाचिया गाढिका। जो आम्हीं अभ्यासु सांगितला निका। तेणें होईल तरी हो कां । निरोध ययां ॥ ६४ ॥ एन्हवीं तरी येणें योगे । जैं इंद्रियां विंदाण लागे । तें चित्त भेटों रिगे । आपॅणयां ।। ६५ ।। परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांतें आपण देखे । देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व हैं मीचि ॥ ६६ ॥ तिये वोळखीचिसरिसं । सुखाचिया साम्राज्यों वैसे । मग आपणां समरसें । विरोनि जाय ।। ६७ ॥ जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रिये नेणती कंहीं । तें आपणचि आपुल्या ठायीं । होऊनि ठाके ॥ ६८ ॥ यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते २२ सम० न मानी लाभ अधिक त्या सुखाहुनि आणखी । न चळे थोर दुःखंही पावतां ज्या सुखीं स्थिती ॥ २२ ॥ आर्या-ज्या लाभात पावुनि लाभ न मानी दुजा अधिक मग तो । जेथें स्थिर मन करितां मोठ्या दुःखंहि तो न डगमगतो ओवी—यापरता आणिक लाभ नाहीं । त्याहून अधिक न मानी कांहीं । राहूनि सुखाचे वाहीं । अत्यंत दुःख न चळे २२ मग मेरूपासूनि थोरें । देहदुःखाचेनि डोंगरें । दाटिजो पां पडिभरें । चित्त न दटे ॥ ६९ ॥ कां शस्त्रे वरी तोडिलिया । देह अनीमाजीं पडलिया । चित्त महासुखीं पहुडलिया। चेवोचि नये ॥ ३७० ॥ ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वौसु न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥ ७१ ॥ म्हणून, बळकट आसन घालून करण्याचा आम्हीं जो योगाभ्यास सांगितला, त्यानें या इंद्रियांना चांगली आटक बसेल. ६४ कारण, खरें पाहिलें असतां योगसाधनानें जेव्हां इंद्रियांचा निग्रह होतो, तेव्हांच चित्त आत्मस्वरूपांत प्रवेश करतें. ६५ मग तेथून तें परतल्यावर पुन्हां पाठमोरें होतें, आणि आपल्या केवलात्मस्वरूपाला पाहतें आणि पाहताक्षणीच त्याची ओळख पटून, ' मी स्वतः हेंच तत्त्व आहें, ' असें तें चित्त म्हणतं. ६६ ही ओळख पटतांच, तें सुखाचें साम्राज्य भोगूं लागतें, आणि मग आपोआप त्या परमात्मतत्त्वाशी एकरूप होऊन जाते. ६७ ज्याच्या पलीकडे कांहींच नाहीं, आणि ज्याचें सत्यज्ञान इंद्रियांना मुळींच होत नाहीं, त्याच्याशीं तें तन्मय होऊन आपल्याच ठिकाणीं आत्मसुखांत राहाते. ६८ मग मेरुपर्वतापेक्षांही मोठे असे दुःखाचे डोंगर जरी देहावर कोसळले, तरी तें चित्त डगमगत नाहीं. ६९ किंवा शस्त्रांनीं छेद केला, किंवा विस्तवांत देह पडला, तरीही त्या आत्मतत्त्वाच्या महासुखांत निजलेल्या चित्ताला जागृतीचा दमही होत नाहीं. ३७० अशा प्रकारें चित्त आत्मतत्त्वांत विलीन झाले, म्हणजे तें या देहाच्या वाटेकडे ढुंकूनही पहात नाहीं; त्याला अलौकिक आत्मसुख लाभल्यामुळे तें देहाच्या सुखदुःखाचें भान विसरतें. ७१ १ वेध, नियंत्रण, २ आत्मस्वरूपास, ३ वाद.