पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १८१ तैसा युक्तिमंतु कौतुकें | अभ्यासाचिया मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥ ५५ ॥ म्हणोनि युक्ति हे पांडवा | घडे जया सदैवा । तो अपवर्गीचिये राणिवां । अळंकरिजे ॥ ५६ ॥ यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता । योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९ ॥ सम० -- निवात सदर्मी दीप न हाले उपमा अशी । चित्तास योगियाच्या जो स्वात्मयोगासि योजितो ॥ १९ ॥ आर्या - जो आत्मयोग योजी जितमन ज्याचाहि कामरिपु मेला । तो सद्योगी पावे सुस्थिर निर्वातदीप उपमेला ॥ १९॥ ओंवी — चित्त नेमिलें असे । केवळ आत्माचि दिसे । निर्वात सदन दीप असे । तैसी उपमा योगियासी ॥ १९ ॥ युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग जेथ होय बरखें । तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावे । मानस जयाचें ॥ ५७ ॥ तयातें योगयुक्त तूं म्हण | ही प्रसंगें जाण । तें दीपाचें उपलक्षण । निर्वातींचिया ॥ ५८ ॥ आतां तुझें मनोगत जाणोनी । कांहींएक आम्ही म्हणोनि । तें निकं चित्त देउनी । परिसावें गा ॥ ५९ ॥ तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दक्षु न होसी । तें सांग पां काय विहिसी । दुवाडपणा ॥ ३६० ॥ तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें । वायां बागूल इयें दुर्जनें । इंद्रियें करिती ॥६१॥ पाहें पां आयुष्यातें अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ॥ ६२ ॥ ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुखे । एन्हवीं सोपें योगासारिखें । कांहीं आहे ॥ ६३ ॥ त्याप्रमाणेंच नेमस्त क्रिया आचरणारा सहजासहजी अभ्यासाच्या मार्गाला लागतो, आणि आत्मसिद्धीचा अनुभव त्याच्या पदरांत पडतो. ५५ म्हणून, अर्जुना, ज्या सुदैवी पुरुषाला हा नेमस्तपणाचा कर्मयोग साधला, तो मोक्षाच्या सिंहासनावर शोभतो. ५६ क्रियेचा नेमस्तपणा जेव्हां योगाशीं जुळतो, तेव्हां शरीर हें पवित्र प्रयागक्षेत्रच होतें; अशा शरीरांत ज्याचें मन शरीरपात होईपर्यंत हालावयाचें नाहीं, अशा निश्चयानें स्थिर होतें, ५७ त्याला, अर्जुना, तूं, 'योगयुक्त' हें नांव दे. प्रसंगानें तुला सांगतों कीं, अशा योगयुक्ताला निवात ठिकाणच्या दिव्याच्या ज्योतीची उपमा देण्यांत येते. ५८ आतां, तुझें मनोगत जाणून, तुला कांहींएक गोष्ट कथन करितों, ती नीट लक्ष देऊन ऐक. ५९ तूं कार्यसिद्धीची लालसा मनांत धरतोस, पण अभ्यासाचे कष्ट करण्याला सिद्ध होत नाहींस, तें कां ? यांत असें काय कठीण आहे, कीं तूं त्याला भ्यावेंस ? ३६० तेव्हां अर्जुना, तूं उगाच या गोष्टीची मनांत धास्ती घेऊं नकोस. अरे, हीं खोडकर इंद्रियें लहान गोष्टीचा उगीच मोठा बागुलबोवा करून दाखवितात. ६१ असें पहा, आयुष्याला थावरणारें, आणि जाणाऱ्या प्राणाला परत फिरविणारें, इतकें गुणकारी दिव्य औषध असले, तरी जीभ त्याला शत्रूच मानिते कीं नाहीं ? ६२ त्याचप्रमाणें आपल्या उच्च कल्याणाला जें अनुकूल, तें तें कर्म या इंद्रियांना नेहमींच त्रासदायक वाटतें. नाहींतर, या योगसाधनासारखें सोपें असें खरोखरच दुसरें कांहीं नाहीं. ६३ १ समोर. २ मोक्षाच्या. ३ राज्यपदावर, ४ नेमस्तपणा व योगसाधन यांचा मेळ झाला, ५ उपमा, ६ संपणारें,