पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० सार्थ श्रीज्ञानेश्वरी क्षुधा तृषा कोंडी । आहारातें तोडी । मारूनियां ॥ ४६ ॥ निद्रोचया वाटा न वचे' | ऐसा हैढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ॥४७॥ म्हणोनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु नोहावा । कां सर्वथा निरोधावा । हेंही नको ॥ ४८ ॥ युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥ सम०—विहार आहार चेष्टा कर्मी निद्रा प्रबोध हीं । युक्त ज्याचीं तया साधे योग जो दुःखनाशक ॥ १७ ॥ आर्या - आहार विहार नियत करितो कर्मीहि नेमिया चेष्टा । फार न जागे न निजे योग तथा सौख्य दे कुरुश्रेष्ठा ॥१७॥ ऑवी— अति आहार नसावा । कर्मी बोध असावा । बुद्धिवंतें साधावा । योग दुःखनाशक ॥ १७ ॥ आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें विजे । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥ ४९ ॥ मितला बोली बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥ ३५० ॥ जागणें जरी जाहलें । तरी व्हावें तें मितलें। येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सहजें ॥ ५१ ॥ ऐसें युक्तीचेनि हातें । जैं इंद्रियां वोपिजे भातें । तैं संतोषासी वाढतें । मनचि करी॥५२॥ यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते । निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ १८ ॥ सम० – आत्मस्वरूपींच चित्त राहे जेव्हां नियोजिलें । सर्वकामस्पृहा शून्य म्हणावा सिद्ध तेधवां ॥ १८ ॥ आर्या - जेव्हां ब्रह्मींच वसे ज्याचें नियमित सदैव अंतर तो । निस्पृह काम तेव्हां युक्त म्हणावा सुखा न अंतरतो ॥१८॥ ओवी - युक्त आहार स्वरुप | कर्मचेष्टा करी अल्प । सुपुप्ति असे नेमस्त । सिद्ध तेव्हां खरा ॥ १८ ॥ भडेसें । बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तंव आंत आंत सुख वाढे । तेथें सहजेंचि योग घडे । नाभ्यासितां ॥ ५३ ॥ जैसें भाग्याचिये उद्यमाचेनि मिसें । मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥ ५४ ॥ आपला आहार तोडतो. ४६ किंवा अशाच आग्रहानें झोंपेचें नांवही घेत नाहीं, अशा हट्टानें जो नाच घालतो, त्याच्या स्वाधीन स्वतःचें शरीरच नसतें, मग त्याला योग कसा साध्य होणार ? ४७ म्हणून विषयाचें अतिरिक्त सेवन हैं जसें नको, तसाच त्याचा द्वेष किंवा सर्वस्वीं कोंडमाराही नको. ४८ आहार सेवन करावा, परंतु तो उचित व बेताचा असावा. सर्वच कर्मों अशीं उचित व बेताचीं असावी. ४९ मोजकें बोलावें, बेतानें चालावें, आणि झोंपेलाही योग्य वेळीं मान द्यावा. ३५० कधी जागरण करणे अवश्य असलें, तर तेंही नियमित असावें; म्हणजे कफपित्तादि शरीरगत धातुरसांचें योग्य प्रमाण राहून, सुख होतें. ५१ अशा रीतीनें नियमितपणें इंद्रियांना विषयाचें अन्न दिलें, म्हणजे तें मनाला संतोषित करतें. ५२ जो जो बहिरंगक्रियेवर असा नेमस्तपणाचा ठसा उठत जातो, तों तों अंतरंगांत सुखाची वाढ होते, आणि अशा प्रकारें योगाभ्यास न करितांच योगाचें साधन होतें. ५३ ज्याप्रमाणें उद्योगाच्या निमित्तानें, पण वास्तविक सद्दीच्या जोरानें, सर्व तऱ्हेचें वैभव घरीं चालून येतें, ५४ १ वाटेस जात नाही. २ सामर्थ्याचा अवतार म्हणून. ३ बेतशीरपणाच्या ४ मापला जावा. ५ मोजक्या, नेमस्त. ६ शरीरगत धातु - रुधिरपित्तादि द्रव - योग्य प्रमाणांत राहतात. ७ खाद्य, खुराक, ८ ठसा, शिक्का. ९ उसळीनें,