पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा 1 १७९ चित्त देइजो ॥ ३६ ॥ हां हो जी अवधारिलें । जें हैं साधन तुम्हीं निरूपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें | फावों शके ॥ ३७ ॥ कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं । तेथ श्रीकृष्ण म्हणती काई । धनुर्धरा ॥ ३८ ॥ हैं काज कीर निर्वाण । परि आणिकही जें कांहीं साधारण । तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धी जाय ॥ ३९ ॥ पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची अधीन जाणिजे । कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभिले फळे ॥ ३४० ॥ तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केंणी नाहीं । आणि योग्यतेची काई । खाणी असे ॥ ४१ ॥ नावेक विरक्तु । जाहला देहधर्मी नियतु । तरि तोचि नव्हे व्यवस्थित | अधिकारिया ।। ४२ ।। येतुलालिये आयणीमाजीं येवढें । योग्यपण तूतेंही जोडे । ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ॥ ४३ ॥ मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥ ४४ ॥ नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः । न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६ ॥ सम०—न योग बहु खातांही न एकाग्रस्व लंघनीं । न बहू निजतां नित्य जागतांही न अर्जुना ॥ १६ ॥ आर्या — केवळ उपवाश्याला योग नको आणि फार खात्याला । जागे फार निजेही कौंतेया योग पारखा त्याला ॥ १६ ॥ ओवी - सदा मन लक्ष्यीं असतां । नये बहु खातां । उपोषण न करितां । न जागतां अर्जुना ॥ १६ ॥ जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला । तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ।। ४५ ।। अथवा आग्रहाचिये वांदोडी | अर्जुन पुढें म्हणाला, “ देवा, लक्ष द्या. ३६ तुम्हीं जें साधन सांगितलेंत, तें मी सर्व ऐकलें. पण, तें वाटेल त्याला अभ्यासतां येतें, कीं कांहींएक योग्यता आल्याशिवाय तें प्राप्त होत नाहीं, असा कांहीं प्रकार आहे ? " तेव्हां श्रीकृष्ण पार्थाला काय बोलले, तें ऐका. ३७, ३८ ते म्हणाले, “हें तर परमार्थाच्या आणीबाणीचें कार्य आहे, पण, अर्जुना, एकादें सामान्य कार्य असले, तरी तें कर्त्याच्या योग्यतेवांचून कधीं सिद्धीस जातें काय ? ३९ पण जिला योग्यता म्हणतात, ती कार्यसिद्धीवरून ठरत असते, कारण योग्यता अंगीं अमृनच जें कार्य आरंभावें, तेंच सिद्धीला जाते. ३४० पण अशा प्रकारची योग्यतेसंबंधें येथें मुळींच अडचण नाहीं. शिवाय, मी असें विचारतों, कीं, योग्यतेची काय एकादी खाण असते ? कीं ती सांपडली, म्हणजे वाटेल तेवढी योग्यता अंगी यावी ? ४१ एकादा जरासा विरक्त होऊन, जर देहाचीं विहित कर्मे नेमानें करूं लागला, तर तोच! पुरुष अधिकारी ठरणार नाहीं का ? ४२ वासनारहित होऊन विहितकर्मे करण्याच्या या युक्तीनं इतकी योग्यता तुलाही आपल्या अंगीं आणितां येईल. " असें श्रीकृष्णांनीं सांगून अर्जुनाच्या मनांतलें संकट दूर केलं. ४३ मग ते अर्जुनाला म्हणाले, " या प्रकरणांत असा नियम आहे, कीं, जो विहितकर्मै विरक्त होऊन करीत नाहीं, त्याला मात्र ही योग्यता मुळींच येत नाहीं. ४४ जो जिभेच्या चोंचल्याचा दास बनला, किंवा जो सर्वस्वी झोपेच्या अधीन झाला, तो या साधनाचा अधिकारी होत नाहीं. ४५ किंवा जो दुराग्रहाच्या वंदिशाळेंत तहानभुकेला कोंडून १ प्राप्तीवांचून, २ अडचण, नड. ३ दास झाला, ४ बेडी, तुरुंगांत,