पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 सार्थ श्रीज्ञानेश्वरी सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें । ते आमुचेनि पांडे आले । निर्वाळलेया ॥ २६ ॥ परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचियेनि मुझे । बोतींव जाहले तैसे | दिसती आंगें ॥ २७ ॥ जरि हे प्रतीति हन अंतरी फांके | तरी विश्वचि हैं अवघें झांके । तंव अर्जुन म्हणे निकं । साचचि जी हें ॥ २८ ॥ कां जे आपण आतां देवो । हा वोलिले जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥ २९ ॥ इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती । हें सांगतियाची रीती । कळलें मज ॥ ३३० ॥ देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नोहेल केवीं ॥ ३१ ॥ म्हणऊनि एथ कांहीं । अनौरिसें नाहीं । परी नॉवभरी चित्त देई । बोला एका ॥ ३२ ॥ आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शके करूं पांगु । योग्यतेचा ॥ ३३ ॥ सहजें आंगिक जेतुलें आहे । तेतुलियाचि जरी सिद्धी जाये । तरी हाचि मार्ग सुखोपायें | अभ्यासीन ॥ ३४ ॥ ना तरी देव जैसें सांगतील । तैसें आपण जरी न ठेकेल | तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ॥ ३५ ॥ जीवींची ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण । मग म्हणे तरी आपण । केल्याप्रमाणे ज्यांनी शरीराचे सार्थक केलें आहे, ते शुद्ध होऊन आमच्याच योग्यतेचे होतात. २६ ते परब्रह्माचाच रस शरीररूपी मुशींत ओतून परब्रह्माचे ओतीव पुतळे बनले आहेत, असें त्यांच्या शरीरकांतीवरून दिसतें. २७ जर असा अनुभव अंतर्यामीं भरला, तर मग हें विश्व नव्हे, तर प्रत्यक्ष परब्रह्मच आहे, असें होतें. " हे ऐकून अर्जुन मध्येच म्हणाला, "देवा, तुम्ही म्हणतां तें अगदी खरं आहे; २८ कारण, देवा, आपण आतां जें साधन सांगितलें, त्यानें परब्रह्माची प्राति स्पष्टपणें होते. २९ जे हा योगाभ्यास दृढ निश्चयाने करतात, ते निःसंशय ब्रह्मत्वाला पोचतात, हे आपल्या वर्णनावरूनच मला कळले आहे. ३३० देवा, तुम्हीं नुसतें वर्णन केलेंत, तें ऐकूनही माझ्या मनाला बोध झाला आहे. मग याचा ज्याला प्रत्यक्ष अनुभव आला आहे, तो तल्लीन झाला, तर त्यांत नवल कसले ? ३१ म्हणून, आतां या विषयासंबंधं मला कांहीं निराळें विचारावयाचें राहिलें नाहीं; परंतु मी एक गोष्ट बोलतों; तिकडे क्षणभर लक्ष द्यावे. ३२ देवा, तुम्ही जो योग सांगितला, तो माझ्या मनाला नीट पटला आहे; परंतु मी सामर्थ्यानें पंगु असल्यामुळें मला हें योगसाधन घडणें शक्य नाहीं. ३३ माझ्या अंगीं जेवढे वळ आहे, तेवढ्याच बळाने जर हा योग सिद्ध होत असेल, तर या मार्गाचा मी सहज अभ्यास करीन. ३४ किंवा, तुम्ही जें सांगतां तें करण्याची जर माझ्या अंगीं योग्यताच नाहीं, तर आपल्या दुर्बळपणास साजेल, असेंच कांहीं तरी विचारावें, असें म्हणतों. ३५ अशी माझी मनींची इच्छा असल्यामुळें हें विचारीत आहे. " नंतर १ मायाहीन, शुद्ध होऊन २ सांगितलेल्या रीतीनें ३ विलक्षण, अशक्य ४ क्षणभर ५ पांगळा. ६ अंगबळ. समजूत, कल्पना.