पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १७७ दिवो' मावळला । मग तयाहिवरी आटु भविनेला । आकाशाचा ॥ १४ ॥ आतां महाशुन्याचिया डोहीं । जेथ गगनासीचि धावो नाहीं । तेथ तांगा लागेल काई । बोलाचा इया ॥ १५ ॥ म्हणूनि आखरामाजि सांपडे । कीं कानवरी जोडे । हैं तैसें नव्हे फुडें । त्रिंशुद्धी गा || १६ || जें कहीं दैवें | अनुभविलें फावे । तैं आपणचि हैं ठाकावें । होऊनियां ॥ १७ ॥ पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणोनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥ १८ ॥ ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ।। १९ ॥ जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्त्व || ३२० || जें विश्वाचें मूळ । जें योग द्रुमाचें फळ । जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥ २१ ॥ जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनि गेले ॥ २२ ॥ जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज । स्वरूप माझें ॥। २३ ।। ते हे चतुर्भुज कोंभेली । जयाची शोभा रूपासि आली । देखोनि नास्तिकीं नोकिलीं | भक्तवृंदें ॥ २४ ॥ तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले ते पुरुख | जयांचे कां निष्कख । प्राप्तिवेरीं ॥ २५ ॥ आम्हीं साधन हें जें करण्याला कांहींच न राहिल्यामुळे शब्दाचें सामर्थ्य मावळते. यापुढची पायरी म्हणजे त्या गगनाचाही लय होणें. १४ तो झाला, म्हणजे त्या महाशून्याच्या अगाध डोहांत गगनाचाही ठाव लागत नाहीं, मग तेथे शब्दाची मात्रा कसची चालणार ? १५ म्हणून, बोलाच्या कक्षेत सांपडेल, किंवा श्रवणेंद्रियाला ज्याचें आकलन होईल, अशा प्रकारचें हें प्रकरण स्पष्ट व उघडें नाहीं, ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. १६ सुदैवाने साधलें तर याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व मग आत्मस्वरूप व्हावें, इतकेंच येथे सांगतां येतें. १७ यापुढें ज्ञेय कांहींच राहत नाहीं. मग, वीरश्रेष्ठा अर्जुना, हीच हीच पुनरुक्ति कशाला करावी ? १८ अशा रीतीनें जेथून शब्द माघारे फिरतात, ज्यांत संकल्प नष्ट होतो, जेथें विचाराचा नुसता वाराही शिरकाव करूं शकत नाहीं, १९ जें उन्मनी अवस्थेचें सौंदर्य, चतुर्थ अवस्थेचं म्हणजे ब्रह्मात्मक जीवन्मुक्तीचें भरदार वैभव, आणि जें आदिरहित, अपरिमित, व सर्वश्रेष्ठ असें तस्व गणलें जावें, ३२० ज्याला विश्वाचें आदिवीज, योगसाधनाचें अंतिम साध्य, व आनंदाचे केवल चैतन्य समजावें, २१ जेथें आकाराची मर्यादा, मोक्षाची एकरूप अवस्था, आणि प्रारंभ व शेवट या सीमा, अगदीं निर्मूळ होऊन जातात, २२ जें पंचमहाभूतांचें मूळकारण, जें महातेजाचेंही तेज, एकंदरीत, अर्जुना, जे माझें आत्मस्वरूप म्हणून जाणावें, २३ आणि ज्याला, भक्तजनसमूहाला नास्तिकांनीं छळल्यामुळेच सगुण होऊन हा चतुर्भुज आकाराचा स्वीकार करावा लागला, २४ तें महासुखात्मक परमात्मतत्त्व वर्णनाच्या पलीकडचें आहे. पण जे पुरुष आत्मस्वरूपाला पावले आहेत, अंतिम साध्य हाती येईपर्यंत ज्यांनीं दृढनिश्चयानें प्रयत्न केले आहेत, २५ आम्हीं आतां वर्णन 3 १ दिवस, २ झाला. ३ ठाव, स्थान. ४ दोरी. ५ अक्षरांत, शब्दांत. ६ तीनवार हडसून खडसून, ७ संपते. ८ निष्कर्ष, परिणाम, २३