पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी गगनाचिये पाहाडीं । पैठी' होये ॥ २ ॥ ते ॐकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी । पश्यतीचिये पाउठी । मागां घाली || ३ || पुढे तन्मात्रा अर्धवरी | आकाशाच्या अंतरीं । भरती गमे सागरीं । सरिता जेवीं ॥ ४ ॥ मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी | सोहंभावाच्या वाह्या पसरुनी । परमात्मलिंगा धावोनी | आंगा घडे ॥ ५ ॥ तंव महाभूतांची जवनिकां फिटे । मग दोहींमि होय झटें | तेथ गगनासकट आटे। समरसीं तिये ॥ ६ ॥ पैं मेघाचेनि मुखी निवडला | समुटु कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपयां ॥ ७ ॥ तेवीं पिंडाचेनि मिलें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पांडुकुमरा ॥ ८ ॥ आतां दुजें हन होतें । कीं एकचि हैं आइतें । ऐशिये विवंचनेपुरतें | उरेचिना ॥ ९ ॥ गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥ ३१० ॥ म्हणोनि तेथींची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ॥ ११ ॥ अर्जुना एन्हीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्व धरी । ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ॥ १२ ॥ भ्रूलता मागलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग नडे । संडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥ १३ ॥ पाठीं तेथेंचि तो भेसळला । तैं शब्दाचा प्रवेश करिते. २ मग ती ओंकाराचे पाठीवर पाय देऊन झटपट पश्यंती वाचेची पायरी ओलांडून जाते. ३ पुढे, जशी नदी समुद्रांत शिरावी, तशी ती अर्धमात्रेपर्यंत (म्हणजे ॐकारांतील मकारापर्यंत) ब्रह्मरंधांत घुसते. ४ मग ती त्या ब्रह्मरंधांत स्थिर होते आणि आपल्या 'सोऽहं' भावनेच्या भुजा पसरून मोठ्या आवेशानें परब्रह्माला बिलगते. ५ मग पंचमहाभूतांचा पडदा दूर होतो; आणि त्या शक्तीची व परब्रह्माची अंगभेट होते, व ती आकाशासह त्या परब्रह्माशी एकजीव होऊन आटून जाते. ६ मेघाच्या द्वारें शुद्ध झालेले समुद्राचें पाणी जसें नदीनाल्यांत पडतें, पण शेवटीं समुद्राच्या पाण्यालाच पांचून मूळरूप पावते. ७ त्याचप्रमाणे देहाच्या साह्याने जीवात्म्याचा परमात्म्यांत प्रवेश झाल्याने त्यांचं ऐक्य होते. ८ आतां दुजेपण राहते, किंवा एकलग एकच वस्तू बनते, हा ऊहापोह करण्यास वावच राहात नाहीं. ९ अशा प्रकारें गगनांत लय होणें, ही जी कांहीं स्थिति आहे, तिचा अनुभव जेव्हां येतो, तेव्हांच ती बरोबर कळते. ३१० म्हणून, तिचं वर्णन ज्यांच्या योगाने संवादाच्या प्रांतात येऊ शकेल, असे शब्दच मुळीं सांपडत नाहींत. ११ अर्जुना, साधारणतां अभिप्राय व्यक्त करण्याच्या गुणाचा ज्या वैखरीवाणीला अभिमान आहे, ती या विषयांत दुर्बळ ठरून दूरच राहते. १२ भुवयांच्या मागल्या बाजूस केवळ 'मकाराची' (म्हणजे ओंकारांतील तिसऱ्या मात्रेची ) च काय ती नढ असते पण त्याने सड्या प्राणवायूलाही गगनाकडे येतांना प्रयास पडतात. १३ नंतर तो त्या ब्रह्मरंधांतील गगनांत मिसळून एकवटला, कीं शब्दाला वर्णन १ थाने. २ तत्क्षणी ३ चार वाणींपैकी तिसरी:- वैसरी शब्दनिष्पत्ति मध्यमा श्रुतिगोचरा । योतितार्था च पश्यन्ती सूक्ष्मा वाग् अनपायिनी ॥ ४ शब्दाच्या उत्पत्तीपूर्वीचें त्याचें अव्यक्त सूक्ष्म रूप ' तन्मात्रा' याच्याहूनही सूक्ष्मतर रूप तें तन्मात्रार्ध, ५ आडपडदा. ६ सज्या प्राणवायूलासुद्धा गगनांत प्रवेश करणें संकटाचें होतें.