पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १७५ युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः । शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ १५ ॥ सम० – ऐसे सदा चित्त योजी योगी आवरुनी मन । मोक्षासि साधन अशी माझी तो शांति पावतो ॥ १५ ॥ आर्या - नियमुनि चित्त ब्रह्मीं योजी ऐसा सदैव जो योगी । मद्विषया जे परमा ते हे निर्वाणशांति तो भोगी ॥१५॥ ओवी - चित्त ठेवीं माझे ठायीं । मी निजवस्तू पाहीं । समाधि होऊनि राहीं । मज तत्पर अर्जुना ॥ १५ ॥ ऐ शक्तीचें तेज जेव्हां लोपे । तेथ देहाचं रूप हारपे । मग तो डोळ्यांमाजीं लपे । जगाचिया ॥ ९३ ॥ एन्हवीं ओदिलाचि ऐसें । सावयव तरी दिसे । परी वायूचें कां जैसें । वैळिलें होय ॥ ९४ ॥ ना तरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा । कां अवयवचि नभा । उदयला तो ।। ९५ ।। तैसें होय शरीर । तें तें म्हणिजे खेचर । हें पद होतां चमत्कार । पिंडजनीं ॥ ९६ ॥ देखें साधक निघोनि जाये । मागां पाउलांची वोळं राहे । तेथ ठायीं ठायीं होये । अणिमादिक ॥९७॥ परि तेणें काय काज आपणपयां । अवधारीं ऐसा धनंजया । लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥ ९८ ॥ पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी । तेजातें पवनु हरवी | हृदयामाजीं ॥ ९९ ॥ पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अँनुकारें । मग तोही निगे अंतरें । गगना मिळे || ३०० || ते वेळी कुंडलिनी हे भाप जाये । मग मारुती ऐमें नाम होये । परि शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥ १ ॥ मग जालंधर सांडी | ककारांत फोडी । अर्जुना, ऐक; जेव्हां शक्ति निस्तेज होते, तेव्हां देहाचें रूपही लोपतें, आणि तो योगी जगाच्या डोळ्याला आपल्या खऱ्या स्थितींत दिसत नाहीं. ९३ वरून सामान्यतः तो पूर्वीप्रमाणेच शरीरधारी दिसतो, पण वस्तुतः तें शरीर जणूं काय वाऱ्याचेंच बनलेलें असतें. ९४ किंवा वरचीं सांपटें गळून जसा केळीचा गाभा उभा असावा, किंवा आकाशाला अवयय फुटावा, तसा तो योगी होतो. ९५ असें शरीर झालें, म्हणजे त्याला ' खेचर' ( आकाशांत संचार करणारें ) म्हणतात. ही योग्यता आली म्हणजे योग्याचें शरीर जगांत चमत्कार घडवून आणते. ९६ अर्जुना, असें योगसाधन करणारा पुरुष जेव्हां चालतो, तेव्हां त्याच्यापावला गणीक अणिमादि अट सिद्धि हात जोडून उभ्या असतात. ९७ पण, अर्जुना, या सिद्धींची कथा आपल्याला कशाला हवी ! मुख्य मुद्दा इतकाच कीं, योग्याच्या शरीरांतल्या शरीरांतच पृथ्वी, आप, व तेज, या तीन महाभूतांचा लोप झालेला असतो. ९८ पृथ्वीचा अंश आपांत विरतो, आपाचा अंश तेजांत जिरतो, आणि तेजाचा अंश हृदयांतील पवनांत शिरतो. ९९ मग शेवटीं एकटा पवनच राहतो, मात्र तो शरीराच्या देखाव्याने उरतो, मग कांहीं कालगतीनं तोही आकाशांत समरस होऊन लोप पावतो. ३०० त्या वेळीं त्या शक्तीचें 'कुंडलिनी ' हें नांव नाहींसें होतें, आणि 'मारुती ' ( म्हणजे वायु ) हे नवीन नांव तिला मिळते. तरीपण जोपर्यंत ती ब्रह्मस्वरूपांत मिसळत नाहीं, तोपर्यंत तिच्या ठिकाणीं शक्तिपण कायम असतें. मग ती मागें वर्णिलेला 'जालंधर बंध टाकून, व काकीमुखी जी सुषुम्ना नाडी, तिचं तोंड फोडून, ब्रह्मरंधांत १ पहिल्यासारखें. २ घडलेलें, ३ आकाशसंचारी. ४ योगी ५ पदचिन्हांची पंक्ति, रांग. ६ आठ सिद्धी. ७ आकृतीनें, ८ अतिल्या भागाशी ९ कंठस्थानांतील विशुद्ध चक्र, सुत्रुनेचें काकीमुख.