पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी बुद्धचेनि शाकें । हातेोनें निकें । द्वैत तेथ न देखे | तैसें केलें ॥ ८२ ॥ निजकांति हारविली । मग प्राणुचि केवळ जाहली । ते वेळी कैसी गमली । म्हणावी पां ॥ ८३॥ हो कां जे पवनाची पुतळी । पांधुरली होती सोनसळी । ते फेडूनियां वेगळी | ठेविली तिया || ८४ ॥ ना तरी वायूचेनि आंगें झगटली | दीपाची दिठी निवटली । कां लखलखोनि हारपली | वीजु गगनीं ॥ ८५ ॥ तैसी हृदयकमळवेन्हीं । दिसे जैसी सोनियाची सरी । ना तरी प्रकाशजळाची झरी | वाहत आली ॥ ८६ ॥ मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे । तैसें शक्तीचें रूप मावळे | शक्तीचिमाजीं ॥८७॥ तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एन्हवीं तो प्राणु केवळ जाणिजे । आतां नादबिंदु नेणिजे । कळाज्योति ॥ ८८ ॥ मनाचा हन मारुं । कां पवनाचा आधारु । ध्यानाचा आदरु | नाहीं परी ॥ ८९ ॥ हे कल्पना मेें सांडीं । ते नाहीं इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी देखा ॥ २९० ॥ पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशुं । परि दाऊन गेला उद्देशु | महाविष्णु ॥ ९१ ॥ तया ध्वनीताचें केणें सोडुनी । यथार्थाची घडी झाडुनी । उपलविली म्यां जाणुनि ग्राहीक श्रोते ॥ ९२ ॥ बुद्धीच्या शाकेसह ह्या शुद्ध भोजनाचा नैवेद्य झाला म्हणजे द्वैताचें नांवही उरत नाहीं असें होतें. ८२ मग कुंडलिनीची स्वतःची कांति नष्ट होऊन, ती केवळ प्राणवायूच्या स्वरूपाला येते; त्या वेळीं तिचें रूप कसें दिसतें म्हणशील, तर ऐक. ८३ जणूं काय ही वायूची पुतळी आतांपर्यंत सोनसळा-पीतांबर वेढून होती, परंतु तो पीतांवर आतां दूर सारून ती उघडी आहे, असें वाटतें. ८४ किंवा वाऱ्याच्या अंगलटीस गेलेली दिव्याची ज्योत मालवते, किंवा आकाशांत चकाकून जशी वीज अदृश्य होते, ८५ तशी, हृदयकमळापर्यंत सोन्याच्या सरीसारखी दिसणारी अथवा प्रकाशाच्या झयासारखी वाहात आलेली, ती कुंडलिनी हृदयप्रांताच्या पोकळींत एकाएकीं जिरून जाते, आणि तत्काळ शक्तीचा शक्तीमध्ये लय होतो. ८६,८७, अशा स्थितीत तिला शक्तीच म्हणावें, पण खरें पाहिलें असतां ती प्राणवायुच असते, मात्र तिच्यांतील नाद, कांति व तेज, हीं दिसून येत नाहींत. ८८ मग या अवस्थेत मनाला जिंकणें, किंवा वायूला कांडणें, किंवा ध्यानाचा आदर करणं, हेंही उरत नाहीं. ८९ मग संकल्पविकल्पाचे प्रकारही घडून येत नाहींत. ही स्थिति म्हणजे खरोखर पंचमहाभूतांची आटणी करण्याची मूसच समजावी. २९० योगसाधनाच्या द्वारे अशा रीतीनें पिंडाने पिंडाला ग्रासणं, हे नाथसंप्रदायाचं रहस्य आहे, परंतु श्रीकृष्णांनी त्याची नुसती दिशा दाखविली आहे. ९१ म्हणून, येथे चांगले गिन्हाईक श्रवणाला बसले आहे, हें पाहून, श्रीकृष्णांच्या वनितार्थाचे वासन सोडून, खऱ्या भावार्थाची घडी झाडून उघडी केली आहे. ९२ १ खाद्य, २ पिंपळी पीतांबरी. ३ मार, जोर. ४ धरणे व सोडणे, ५ ध्वनि, सूचना, ६ उकलून. ७ उघडली, पसरली.