पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १७३ लागे । येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धि ॥ २७० ॥ आइकें प्राणाचा हात धरुनी । गगनाची पाउठी करुनी । मध्यमेचेनि दादराहूनी | हृदया आली ॥ ७१ ॥ ते कुंडलिनी जगदंबा | जे चैतन्यचक्रवतींची शोभा । जया विश्ववीजाचिया कोंभा । साउली केली ॥ ७२ ॥ जे शून्यलिंगाची पिंडी | जे परमात्मया शिवाची करंडी । जे प्रणवाची उघडी । जन्मभूमी ॥७३॥ हें असो ते कुंडलिनीवाळी | हृदयाआंतु आली । अनुहताची वोली । चावळे ते ॥ ७४ ॥ शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें । तें तेणें आइकिलें । अळुमाळु ॥ ७५ ॥ घोपाच्या कुंडीं । नादचित्रांची रूपडीं । प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥ ७६ ॥ हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परी कल्पितें कैचें आणिजे । तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥७७॥ विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणऊनि घुमे ॥ ७८ ॥ तया अनाहताचेनि मेधें । आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानींचं वेगें । सहज फिटे ॥ ७९ ॥ आईके कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें । जेथ चैतन्यें आधातुरें | करूनि असिजे ॥ २८० ॥ तया हृदयाच्या परिवरीं । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥ ८१ ॥ गेला तर पावलाचा पाण्याला स्पर्शही होत नाहीं, अशा नानातन्हांच्या सिद्धि त्याला प्राप्त होतात ७० पार्था, आतां इकडे लक्ष दे. प्राणवायूचा आधार घेऊन, हृदयकोशाच्या तळाची पायरी करून, आणि सुषुम्नानामक मध्यमनाडीचा जिना चढून, जी कुंडलिनी हृदयाला पोंचली, ७१ ती जगाची जननी समजावी. हीच जीवात्म्याची शोभा, हीच ओंकाराच्या अंकुराला सावली होते. ७२ हीच शून्याची बैठक, परमात्मरूपी शिवप्रतिमेची समटी, किंवा ओंकाराची स्पष्ट जन्मभूमी होय. ७३ असो, अशा प्रकारची ही सुकुमार कुंडलिनी हृदयकोशांत प्रविष्ट झाली, की आपोआप उठणारे, दिव्य, 'अनाहत ध्वनीचे' नाद उर्दू लागतात. ७४ कुंडलिनी शक्तीच्या अंगालाच लागून बुद्धीचे चैतन्य आलेलें असतें, त्याला हे 'अनाहत' नाद थोडथोडे ऐकू येऊ लागतात. ७५ या अनाहत नादांत दहा प्रकार आहेत. त्यांतील पहिला नाद जो घोष, तो प्रथम ऐकूं येतो, आणि मग त्या घोषाच्या कुंडीतच ओंकाराच्या धाटणीवर रेखलेल्या नादचित्रांच्या आकृति उमटुं लागतात. ७६ हें सर्व कल्पनेनें जाणलें पाहिजे; किंवा कल्पकाला तरी हें कसें कळणार ? खरें म्हटलें म्हणजे त्या ठिकाणी कसले नाद होतात तेंच समजत नाहीं. ७७ पण, अर्जुना, या वर्णनाच्या भरांत मी अगदीच विसरलों. अरे, जांपर्यंत प्राणवायूचा नाश झाला नाहीं, तोपर्यंत हृदयाकाशांत आवाज आहेच, आणि तोच आवाज असा घुमत असतो. ७८ त्या अनाहताच्या मेघनादाने सर्व हृदयाकाश दुमदुमूं लागलें म्हणजे ब्रह्मरंधाची खिडकी साहजिक उघडते. ७९ अर्जुना, हृदयाकाशाच्या वर जें महदाकाश किंवा ब्रह्मरंध असतं, तेथे चैतन्य निराधार स्थितींत राहते. २८० त्या महदाकाशाच्या घरांत कुंडलिनी देवता शिरतांच, ती आपल्या तेजाचें भोजन चैतन्यास अर्पण करिते. ८१ १ भोवतालच्या प्रांतांत. २ अन्नाची मोटकळी,